Skip to main content

फोडणीचे खमंग डोसे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 05/12/2014 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
मिठ १ वाटी तांदळाचे पिठ अर्धी वाटी रवा पाऊणवाटी दही फोडणीसाठी : १ चमचा राई/मोहरी १ चमचा जीरं २ मिरच्यांचे तुकडे थोड कढीपत्ता फोडणीच्या गरजेनुसार तेल पाककृती: १) प्रथम तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे. २) डोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून घ्यावे. ३) वरील फोडणी करून ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे. ४) आता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत. हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा. अधिक टिपा: फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात. दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले. तेल वाटत तेवढ जास्त होत नाही. फ्रायपॅनला नाही लावले तरी चालेल तेल.

वाचने 15598
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

डोसा का धिरडं म्हणावं ? या बाबतीत जरा कणफ्युज झालो आहे ! बाकी पाकॄ झकास ! आणि मी पहिला बरं का ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)

In reply to by मदनबाण

डोसा माझ्या माहितीप्रमाणे आंबवलेला असतो. आणि धिरडं नाही.

In reply to by मदनबाण

चण्याच्या डाळीच्या पीठाची, धिरडी बनवल्या जातात. पण ही एका विशिष्ट वेळेलाच अप्रतिम लागतात.

राहिलेच. कट झाले. इथे पुन्हा संपादीत करायची सोय नाही. आता मी इथे लिहीते. प्लिज जे बदल करू शकतात त्यांनी मुळ धाग्यात करून द्या. १ वाटी तांदळाचे पिठ अर्धी वाटी रवा पाऊणवाटी दही

तू प्रमाण दिलं नाहीस चुकून तरी बाउल मध्ये घेतलेले पदार्थ किती ते सहज कळताहेत :)

मस्त प्रकार आहे! यासोबत टोम्याटो चटणी लै जबराट लागेल असे आपले एक वैयक्तिक मत. खोबरेवाली अन टोम्याटोवाली अशा दोन्ही चटण्या लै जबर्‍या.

In reply to by अत्रुप्त आत्मा

डोसे आणि टोमॅटो+कांदा+हिरव्या मिरच्या+थोडेसे किसलेले आले+मिरपूड+आणि जहाल तिखट, अप्रतिम कॉम्बिनेशन.

आम्ही याला रवा उत्तपा म्हणतो. नावे वेगळी असली तरी चव छान असते यात वाद नाही. ;) फोटू आवडले जागुतै!

ह्म्म्म! हे झटपट डोसे करून पाहिले/खाल्ले पाहिजेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

दह्याच्या जागी ताक घाला. हाकानाका.

डोश्याला लागेल एवढे पाणी
हे प्रमाण नवशिक्यांचा घात करतं हा सततचा स्वानुभव.. ;) डोश्यांच्या आकारात तव्यावरून यशस्वीपणे खाली आल्यावर सुंदरच लागत असणार हे..

In reply to by पिशी अबोली

जागुताईंच्या रेशिपीच्या जोरावर कुटुंबासमोर फुशारकी मारली. शेवटी डोसे काही जमेनात तेव्हा एसओएस मॅसेज पाठवावाच लागला. मग उरलेले डोसे आयते बनवून मिळाले, पण परत असला काही उद्योग करायचा नाही अशी तंबीपण! काय जागुताई!!!

In reply to by एस

तुम्ही नॉनस्टीक पॅन वापरलात की साधा? मी बर्‍याचदा करते पण नाही फसत. झाकण दिले होते ना पिठ टाकल्या टाकल्या तव्यावर?

In reply to by पिशी अबोली

हा हा हा, सर्व नवशिक्या स्वयंपाक्यांच्या मनातले बोललात. =)) (नव'थरथर' स्वयंपाकी) बॅटमॅन.

मी असेच घावन बनवतो. त्यात ७०% रवा व बाकी इतर पीठ [ ज्वारी, बाजरी, तांदूळ, बेसन, कणीक] घालतो. त्यात बारीक कांदा, हिरवी मिरचा बारीक चिरून टाकतो. चवी साठी जिरे टाकतो.