Skip to main content

धोनीच्या निवृत्ती निमित्ताने

लेखक शेखर काळे यांनी शनिवार, 03/01/2015 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही क्रिकेट खेळाडुंच्या निवृत्तीनंतर असे लेख आणि प्रतिक्रिया वाचण्यात आल्या की झाले .. आता क्रिकेट जग बुडले. क्रिकेट बघण्यात काही राम राहिलेला नाही. अरेरे, माझा प्रियतम खेळाडू त्याचे नाव इथे टाका> कसोटी / एक दिवसिय /व-वीस (टी-ट्वेंटीचे मराठी रुपांतर) सोडून आता निवृत्त्त जीवन जगणार. आपले इतके दिवस कमावलेले पैसे मनसोक्त भोगणार, आपल्या कुटुंबासमवेत, मुलांबरोबर, मित्रांसमवेत मजा करणार. माझे काय व्हायचे आता ? कोणाला दूरचित्रवाणीवर मी रात्र रात्र जागून, (दिवसा सामना असेल तर) हातातले काम बाजूला टाकून क्रिकेट खेळतांना पाहणार ?

मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 03/01/2015 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
गाढवाला सांगतो, गीता... असा मी बावळा दांभिकांची कैद ज्ञाना, ज्ञानवंता कोहळा धर्म नामे सर्प डसतो, मानवी वेडेपणा भूक घेते प्राण येथे, पिंड मागे कावळा भाव नाही जाणलेला वरलिया रंगा भुले वर्ण वाटे गोरटा मनरंग काळा सावळा करपलेल्या भाकरीचे पदर घेतो वाटुनी घास उदरी पोचला तो, होय मोठा सोहळा मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला भ्रष्ट म्हणती लोक आम्हा, कोण येथे सोवळा? घाबरावे या जगां इतका नसे कमजोर तू सांग त्यांना ठासुनी, समजू नका मी कोवळा ! वृत्त : कालगंगा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा (इतरत्र पूर्वप्रकाशित) विशाल
काव्यरस

रक्तदाब!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 03/01/2015 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
एक अस्तो उच्च रक्तदाब्,आणि एक असतो हुच्च रक्तदाब! उच्च साधा सरळ असतो ,जसा आत..तसाच बाहेर! आणि हुच्च..?? अबबं!!! आम्ही काय बोलावे?... (वरच्या ओळित ,सगळच नै का आलं? ;-) ) उच्च रक्तदाबाला निच्च रक्तदाब पण असतो. पण हुच्च असेल तोच तर तो, फ़क्त हुच्चच असतो! ( ;-) ) उच्च रक्तदाब वाढलेला,चढलेला...कसाही! पण हुच्च मात्र..वाढवलेला,चढवलेला...असाही! उच्चरक्तदाबवाली माणसं..एकदम जातात...सिरियस-वगैरे होत नाहीत.. पण हुच्चवाली..???

आजोळच्या गोष्टी १ आणि २

लेखक गुळाचा गणपती यांनी शनिवार, 03/01/2015 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
आईचं गाव औदुंबर. चांगला तासभर धुरळा उडवला कि बस पोचवायची ते औदुंबर फाट्यावर. लाडका मामा गाडी घेऊन बराच वेळ उन्हात, पावसात वाट पाहत असायचा. मोजकीच घरे असल्याने गावातील हरेक गृहस्थ माझ्या घरच्यांना माहितीच असायचा. अगदीच न्यायला कोणी आले नसल्यास लिफ्ट मागणे आणि लिफ्ट मिळाल्यावरचा आनंद म्हणजे....! एखाद्या बैलगाडीतून जायला मिळणे म्हणजे पर्वणी असायची. उगाचच चक-चक आवाज काढत घरापर्यंत पोचायचे ते म्हणजे जणू मी गाडी हाकत आणली अशा आविर्भावात. आम्ही येत असल्याची वार्ता मिळताच आजी खास रव्याचे लाडू वळायला घ्यायची.

अमृतसर ३ - लखलखतं सुवर्णमंदीर

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 02/01/2015 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
इथुन पाय निघत नव्हता हे खरं. फारच त्रोटक दर्शन झालं. अर्थात मी पुन्हा येण्याची तजवीज करुन ठेवली होती. "झाल ते दर्शन दिवसाचं, पण रात्रीचं दर्शन म्हणजे खरं सुवर्णमंदीर पाहणं" असं सांगुन मी दुसर्‍या फेरीला आलो. दुसरी फेरी मिळावी म्हणुन मी पहिल्या फेरीत 'आता बघुन घेउया, दर्शन रात्रीच्या फेरीते घेउ, गर्दीही कमी असेल" असं सांगुन मंडळींना बाहेर काढलं होतं. म्हणजे दुसरी भेट नकी! यावेळी टाउन हॉलवरुन चालत निघालो आणि अकाल तख्तालगतच्या रस्त्याने दाखल झालो. गर्दी कमी असेल हा भ्रम दूर झाला. मात्र कोलाहल नव्हता. लोक पादत्राणं जमा करुन मंदिराच्या दिशेने जात होते.

हुरड्याचे थालीपीठ

लेखक आरोही यांनी शुक्रवार, 02/01/2015 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या हिवाळ्यात गावी जाऊन मस्त हुरडा खाऊन झालाय ,आणि आता येथे मुंबईत परत आल्यावर नवऱ्याला एका ठिकाणी ताजा कोवळा हुरडा दिसला मग तो घेऊन आला ,आता नुसताच भाजून खाण्यापेक्षा त्याचे काहीतरी वेगळे बनवावे असा विचार आला .मग थोडी शोधमोहीम केली आणि त्याचे थालीपीठ बनवले .अप्रतिम चव होती .पहिल्यांदाच बनवले आणि चांगले झाले .पुन्हा बनवते वेळी यात आवश्यकतेप्रमाणे काही बदल करू शकते असे वाटले .तूर्तास आज बनवले त्याची रेसिपी बघूया . साहित्य : २ वाट्या हुरडा , घरात असलेली भाजणी एक दीड वाटी,कोथिम्बिर ,मीठ, आवडीप्रमाणे ,चीलीफ्लेक्स एक चमचा ,लसुन मिरची ची भरड एक चमचा .तेल ,पाणी

पत्रकारीतेची ऐशीतैशी

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 02/01/2015 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल विविध वर्तमानपत्रे, दूरदर्शन वाहिन्यांचा भारतात सुळसुळाट झालाय. कित्येक लोकांना रोजगारही मिळाला आहे. पण हे पत्रकार, संपादक, उपसंपादक काय म्हणून त्या पदांवर बसलेत असा सवाल पडतो. पूर्वी काही चुका या उपसंपादकाच्या डुलक्या (उसंडु) या नावाखाली चेष्टेचा भाग मानला जायचा. पण आता मात्र या डुलक्यांची वाढती वारंवारीता बघून क्लेश होतात. वानगीदाखल हे एक उदाहरण १. दै. लोकमत (पुणे आवृत्ती) दि.

प्रशिक्षण आयोजीत करण्यासाठी संगणक संस्थांशी संपर्क करून हवा आहे.

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 02/01/2015 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मला गेल्या दहा एक वर्षात सर्वसाधारण आंतरजालासोबतच मराठी आंतरजाल, तसेच ज्ञानकोशीय लेखनाचा प्रशिक्षण देण्याचा बर्‍यापैकी अनुभव आहे. सोबतच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात ते उपयूक्त पडेल अशापद्धतीने प्रशिक्षण वर्ग/ कार्यशाळा आणि सुट्टीतील वर्ग आयोजीत करण्याची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने प्रशिक्षण आयोजीत करण्यासाठी आंतरजाल सुविधा उपलब्ध असलेल्या संगणक संस्थांशी संपर्क करून हवा आहे.