Skip to main content

(लेखणीने)

लेखक सूड यांनी गुरुवार, 08/01/2015 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
काथ्याकुटास व्हावे तय्यार लेखणीने भक्षण घटीपळांचे करण्यास लेखणीने स्वविरोधी बोलण्याला मातीत लोळवावे माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने मसीहा चितारण्याची अवगत कला करावी औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने अफवादि निर्मितेला जेथे उभार तेथे पेरुन बीज यावे रुजण्यास लेखणीने भाकड-वृथा कथांच्या कक्षेमध्ये फिरावे अभिजात सृजनाला डसण्यास लेखणीने वाणी अरण्यरुदनि शिरजोर होई तेव्हा संपादकांनी यावे धरण्यास लेखणीने जेव्हा सदस्य करिति वादळ विराट तेव्हा द्यावे अभय म्हणावे पळण्यास लेखणीने -अंगावर उठे 'शबय शबय'

जडण-घडण १७

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 08/01/2015 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस मुंबईच्या पावसाच्या लौकीकाला साजेसा कोसळत होता. आम्ही दोघांनी ठरलेल्या भागापर्यंत प्रवास केला आणि स्वतंत्रपणे कामाला सुरूवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळी भेट झाली, तेव्हा आणखी कोणीच ठरलेल्या ठिकाणी आलं नसल्याचं समजलं. आमचं जेवण झालं आणि त्यानंतर मित्राने बाहेरून ऑफीसमध्ये फोन केला. बरेच जण पावसामुळे आलेच नसल्याचं समजलं आणि दुपारनंतर आम्ही घरी गेलो तरी चालेल, असंही सांगण्यात आलं. तासभर सोबत काम करून परतायचं ठरवलं आम्ही दोघांनी. दिवसभरातल्या आणि इतर फुटकळ गोष्टींबद्दल बोलताना तास भरकन गेला.

श्री ग्रंथराज दासबोध अभ्यास

लेखक विटेकर यांनी गुरुवार, 08/01/2015 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य, आंतरिक समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजवत नाही आणि ते शक्य ही होत नाही. अशावेळी काही व्यावहारीक विचार सांगणाऱ्या आणि आचरणात आणण्यासारख्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे. दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात नैराश्य प्रसंगी मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बल देतात. आत्मविश्वास वाढवतात.

लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 08/01/2015 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने

अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने

वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने

भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने

लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने

मिक्स व्हेज सूप (सध्या उपलब्ध भाज्यांचे)

लेखक माहितगार यांनी बुधवार, 07/01/2015 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
मेथी कोथींबीर इत्यादी काही भाज्यांचे बाजारभाव उत्पादन खर्चा पेक्षा खाली पडताहेत हि बातमी दै सकाळमध्ये वाचली. अशा बातम्या सहसा वाचून सोडून द्यावयाच्या असतात तशी मी वाचून सोडून दिली होती, कारण शेतकर्‍याला किंमत कोसळते पण शहरातील ग्राहकाला त्याचा लाभ होतो असे नाही. पण काल जवळच्या भाजीमंडईतील एक भाजीवाला पावला आणि बातमीतल्या भाज्या अपेक्षेपेक्षा बकळ रिझनेबल मिळाल्या. आज या भाज्यांचे मिक्स व्हेज सूप बनवले. या पुर्वी मी केवळ फळ भाज्यांचे मिक्सव्हेज सूप बनविले होते.

मोगरा फुलला

लेखक दिलिप भोसले यांनी बुधवार, 07/01/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
II मोगरा फुलला मोगरा फुलला II माझे शालेय शिक्षण ज्या शाळेत झाले, तिथे माझावर उत्तम संस्कार झाले. शाळेची इमारत चारी बाजुनी व मधे मोकळी जागा, या मोकळ्या जागेच्या बाजुनी उंचावर लाऊड स्पीकर लावले होते. प्रार्थना, सूचना देण्यासाठी याचा उपयोग होत असे, मात्र दुपारच्या सुट्टी मधे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम रचित गीतांचे प्रसारण केले जाई. ओम नमोजी आद्या, अवचित परिमळू, आजी सोनियाचा दिनु, पैल तो गे काऊ कोकताहे, धनु वाजे घुणघुणा, अरे अरे ज्ञाना, अशा सुंदर गीतांनी माझ्या मनात घर केले ते बालपणी, पण मनावरती कोरले गेले ते मोगरा फुलला.

ह..ह..ह..ह. हरिश्चंद्रगड

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 07/01/2015 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार.... २०१५ ची पहिली ट्रेकमोहीम हरिश्चंद्रगडावर करून झालेली आहे. त्याचा सचित्र वृत्तांत सादर आहे. ब्लॉगचा दुवा हा. आजवर ट्रेकिंग करणा-या कुणालाही भेटलो आणि लोहगड, तिकोना, राजगड, रायगड, नाणेघाट इत्यादी नावं मी घेतली, की 'अरे! तू हरिश्चंद्रगड ला जा; वेडा होशील.' असं तो म्हणणार हे अगदी निश्चित होतं. त्यामुळे हरिश्चंद्रगड हा काहीतरी भारी प्रकार आहे हे मला पक्कं कळलेलं होतं. जालावर, ब्लॉग्सवर जेवढं त्याबद्दल वाचत गेलो, तेवढी तिथे जायची उत्कंठा वाढत गेली.

अर्घ्य

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 07/01/2015 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
झळ उन्हाची येते लेवून गतकाळातील 'आठवकळा' ते दिवस नेटके होते अन रात्री उलगडलेल्या... मी तुला, तू मजला ... हलकेच पुन्हा आठवतो विस्मृतीच्या क्षणांसाठी कण कण साठवतो .... हळुवार पुन्हा मी हसतो त्या हसण्यावर ती रुसते बट केसांची नकळत, त्या गालावर रस्ता चुकते तो थेंब चिंब ओलेता ... हलकेच चुकार ओघळतो मी शुष्क कोरडासा, तो मला भिजवूनी जातो प्राजक्त कधी परसातला खांद्यावर ठेवतो डोके दरवळताना जाई-जूई, हळुच घेती व्याकुळ झोके तो स्पर्श चंदनी स्पंदनांचा हृदयाशी गुजगोष्टी करतो विसरताना मी तूला, आठवांचे 'अर्घ्य' देतो . विशाल
काव्यरस

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 07/01/2015 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे . एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे . आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते .