Skip to main content

२०१५ बृहन्महाराष्ट्र मंडळ १७वे अधिवेशन : लवकर नावनोंदणी करा

लेखक बीएमएम२०१५ यांनी बुधवार, 14/01/2015 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे. जगप्रसिद्ध डिस्नीलँडच्या जवळच असलेल्या प्रशस्त कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे अधिवेशन होणार आहे. जगभरातील मराठी मंडळींना लॉस एंजलिस परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी ही एक आगळी वेगळी संधी चालून आली आहे. या अधिवेशनात भारतातील व उत्तर अमेरिकेतील अनेक प्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम एका ठिकाणी पहायची संधी मिळणार आहे.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २०

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 14/01/2015 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. मी मात्र आता अत्यंत दाटलेल्या गळ्यानी, "काका...येताना क्याटबरी नक्को..गाण्याची पुस्तकंsssss!!!!" असं उंबर्‍यातून ओरडलो, आणि टच्च भरलेल्या डोळ्यांनी ..काका दिसेनासा झाल्यावर गप्प चेहेरा करून ..गुरुजिं समोर त्या लालमातिच्या ग्गार भिंतीला पाठ टेकवून बसलो! पुढे चालू... ======================= माझा चेहेरा पाहून काहि विद्यार्थी गालातल्या गालात हसत,तर काहि जणं चेहेर्‍यानीच माझ्याशी सहमत होत होते. पहिलाच दिवस असल्यामुळे गुरुजिंनी मला लगेच शिकवायला घेतले नाही.

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे....हेच खरे तर जास्त धोकादायक

लेखक प्रसाद भागवत यांनी बुधवार, 14/01/2015 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी सुदर्शन केमिकल्स (पुणे) मध्ये नोकरीला असतानाची गोष्ट....तेंव्हा मी कंपनीतील सर्व कर्मचारी व अधिका-यांच्या पगारावर भराव्या लागणा-या आयकराचे हिशोब ठेवण्याचे काम करीत असे. सहाजिकच, भरावा लागणारा टॅक्स वाचविणेकरिता करावयाच्या गुंतवणुकीकरिता असे अधिकारी नेहमीच माझा सल्ला विचारीत असत. तो 1999 सालचा मार्च महिना होता. मी आमच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे कर्मचा-यांच्या गुंतवणुकीचे अंतिम तपशील घ्यायला सुरवात केली होती. आजही ‘टॅक्स वाचवणे म्हणजे NSC, PPF आणि LIC मघ्ये गुंतवणुक करणे’ या पलिकडे काही पर्याय असतात याची जाणिवही बहुतेकांना नसते, तेव्हा तर ती नव्हतीच नव्हती.

देव तिळीं आला

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 14/01/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सण साजरे करतो ते केव्हा? सण विशीष्ठ दिवशी साजरे केले जातात. त्याचा संबंध कालगणनेशी आहे. वर्षाची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढी पाडवा, फाल्गुन पौर्णिमेला होळी, आश्विन शुद्ध दशमीला दसरा, आश्विन अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. पण संतांच्या घरचे सण काही वेगळेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरिजन भेटतील ॥ सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण.

भिगवण - भुलेश्वर - उरुळीकांचन

लेखक कंजूस यांनी बुधवार, 14/01/2015 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यनगरीजवळचे भिगवण येथील पक्षीतिर्थ आणि भुलेश्वर या शिल्पसृष्टी विषयी बरेच ऐकून होतो. माझा आवडीचा विषय असल्याने "काय अजून तिथे गेला नाहीत?" अशी सारखी विचारणा व्हायची. मागच्या महिन्यात रेल्वे रेज॰ न मिळाल्याने हुकमी एक्का, चौकटराजा, सावंतकाकांसोबत भिगवणला जायची नामी संधी या बिनहुकमाच्या किलवरच्या दुर्रीची हुकली. उरुळीकांचन येथे एका गांधीवादी संस्थेचे निसर्गोपचार केंद्र आहे. त्याविषयीचीही माहिती काढायची होती. ही तिन्ही ठिकाणे पुणे सोलापूर रस्त्यावर शंभरेक किमीच्या अंतरात आहेत.

शेअर बाजार- विचार बदला......नशिब बदलेल !!!

लेखक प्रसाद भागवत यांनी बुधवार, 14/01/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
शेअरबाजार आणि धोका (Risk) या दोन शब्दांचे नाते सत्यनारायण आणि महापुजा या शब्दांइतकेच जवळचे आहे. आज मात्र या बाबतीत नक्की खरे काय ?? ह्याचा उहापोह करायचा, आणि जमलेच तर सर्वसामान्य माणसाच्या मानगुटीवर बसलेल्या 'धोका' या भुताला बाटलीबंद् करुन गुंतवणुकीच्या समुद्रात सोडुन द्यावयाचे, ह्या ईराद्याने हा लेख लिहितो आहे. असे म्हणतात की एक चित्र हे हजार शब्दांपेक्षा अधिक बोलके असते...

मी आणि ते

लेखक स्पा यांनी बुधवार, 14/01/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
"ते" असतातच तुमच्या आजूबाजूला, लहानपणी माहित नसतं, हळू हळू मोठे होत जातो तसे त्यांची व्याप्ती लक्षात यायला लागते,तरीही तसा त्यांचा त्रास नसतो तुमचे शिक्षण पूर्ण होते,मग तुम्हाला नोकरी लागते.वय तिशी कडे झुकायला लागले कि तुमच्याच घरातले घात करतात, आणि त्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतात.मग कधीही दिवसा ढवळ्या रात्री अपरात्री ते तुम्हाला दर्शन द्य्याला लागतात,तुम्हाला त्यांच्यात ओढायचा त्यांचा बेत असतो,जणू तेच त्यांचे जीवितकार्य असते.साम दाम दंड भेद सगळे मार्ग अवलंबिले जातात.या मध्ये काही मध्यस्त आणि तुमचे नातेवाईक सुद्धा असतात,कुठूनही ते तुम्हाला शोधू शकतात,लपायचा काहीच चान्स नाही अस्मादिक हि याला क

सांज

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 14/01/2015 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
saanj सांज बावरी, सांजेला कळते ना काही शांत बाह्यतः, आतुन ही घोंगावत राही सांज बोचरी, काळोखाची पूर्वकल्पना वर केशरिया, अंतरात दडल्यात वेदना सांज विरहिणी अडखळलेली मावळतीशी नेत्र पश्चिमी, मन पूर्वेच्या क्षितिजापाशी सांज हरीच्या बाहूंमधली राधा भोळी मोहनरंगी रंगुन बनते रात्र सावळी... अदिती जोशी

जिजामाता समाधी पूजन-मातृशक्ती पूजन

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 13/01/2015 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवरायांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत कायम पेटती ठेवणा-या राजमाता जिजाऊंचे पाचाड येथील समाधीस्थळ आजही दुर्लक्षितच आहे. या समाधीस्थळाचे पूजन व्हावे , राजमातांच्या समाधीस्थळी दिवा लावला जावा या उद्देशाने महाड येथील विष्णू केंजळे यांनी जिजामाता समाधी पूजन-मातृशक्ती पूजन हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक कुटुंबांने अथवा दाम्पत्याने येथे येऊन मनोभावे पूजा करावी हा या मागील उद्देश आहे. यामुळे ३६५ हून अधिक कुटुंबांनी या ठिकाणी येऊन समाधीस्थळाचे पूजन केले आहे. शिवप्रमी विष्णू केंजळे यांनी सुरू केलेला उपक्रम सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.