जिजामाता समाधी पूजन-मातृशक्ती पूजन
लेखनप्रकार
छत्रपती शिवरायांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत कायम पेटती ठेवणा-या राजमाता जिजाऊंचे पाचाड येथील समाधीस्थळ आजही दुर्लक्षितच आहे. या समाधीस्थळाचे पूजन व्हावे , राजमातांच्या समाधीस्थळी दिवा लावला जावा या उद्देशाने महाड येथील विष्णू केंजळे यांनी जिजामाता समाधी पूजन-मातृशक्ती पूजन हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक कुटुंबांने अथवा दाम्पत्याने येथे येऊन मनोभावे पूजा करावी हा या मागील उद्देश आहे. यामुळे ३६५ हून अधिक कुटुंबांनी या ठिकाणी येऊन समाधीस्थळाचे पूजन केले आहे.
शिवप्रमी विष्णू केंजळे यांनी सुरू केलेला उपक्रम सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. महाडमधील एका फार्मास्युटीकल कंपनीत नोकरीला असलेले विष्णू केंजळे रायगड व पाचाड येथे सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होतात. किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊंची समाधी आहे. या समाधीस्थळाची दुरावस्थाच आहे. ज्या जिजाऊंनी शिवराय घडविले त्यांचे समाधीस्थळ उपेक्षित राहू नये या उद्देशाने विष्णू केंजळे यांनी स्वखर्चातून तेलाचा डबा देऊन येथे दिवा लावला जावा यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु पैसे देऊन आपण जबाबदारीतून मोकळे झालो हे शल्य त्यांना बोचत होते. त्यापेक्षा आपण प्रत्येकाला यात सहभागी करून घेतले तर राजमातेच्या पूजनाचे महत्व, गरज सर्वांना लक्षात येईल. यासाठी त्यांनी समाधीस्थळाच्या पूजनाचा उपक्रम ३१ जानेवारी २०१४ माघ प्रतिपदेपासून सुरू केला. सर्वप्रथम सपत्नीक जाऊन त्यांनी पूजा केली. व त्यानंतर प्रत्येक कुटुंबाने, नवविवाहीत अथवा दाम्पत्यांने एक दिवस येथे येऊन पूजा करावी यासाठी प्रयत्न केले. या निमित्ताने लोक समाधीस्थळी जातील असाही त्यांचा प्रयत्न होता. सुरूवातीला केंजळे यांनी पत्रके छापून ओळखीतील कुटुंबांशी, मित्रांशी संपर्क साधला. विनंती करून पूजनाचे महत्व पटवून त्यांनी हळूहळू हा उपक्रम सुरू ठेवला. महा़डमधील डॉक्टर्स, नगरसेवक, नगराध्यक्ष असे अनेक जण कुटुंबासह येथे जाऊन पूजन करून आले. आत्तापर्यंत ३६५ हून अधिक कुटुंबांनी येथे जाऊन पूजा केली आहे.
पूजेसाठी या कुटुंबांनी हार, फुले, प्रसाद , तेल वात , अगरबत्ती एवढेच साहित्य नेऊन सकाळच्या वेळेत पूजा करायची आहे. यासाठी इतर कोणतेही आर्थिक सहकार्य विष्णू केंजळे घेत नाहीत. त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला आता चांगले यश येऊ लागले आहे.
एकदा पूजा करून आलेले अनेकजण पुन्हा पूजेसाठी जाण्याची इच्छा व्यक्त करत असतात. अनेकवेळा काही अडचणींमुळे ठरलेल्या कुटुंबांकडून पूजा होत नाही. अशावेळी स्वतः किंवा पाचाडमधील एखाद्या कुटुंबाकडून पूजा करून घेतली जाते
ज्या कुटुंबाला, दाम्पत्याला जिजाऊंच्या समाधीस्थळाची पूजा करायची असेल त्यांनी विष्णू केंजळे (९४२१२५९६५५) यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाला सहकार्य करावे.
वाचने
3398
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वन मोअर दुकान इन मेकींग..
In reply to वन मोअर दुकान इन मेकींग.. by हाडक्या
अगदी सहमत आहे. या केंजळयांना
In reply to अगदी सहमत आहे. या केंजळयांना by आदूबाळ
इथे विचारायलाच हवा आदूभौ.
In reply to वन मोअर दुकान इन मेकींग.. by हाडक्या
गड किल्ल्यांवर गवत माजलं तरी
In reply to वन मोअर दुकान इन मेकींग.. by हाडक्या
सहमत
समाधीस्थळ दुर्लक्षित आहे, हे
In reply to समाधीस्थळ दुर्लक्षित आहे, हे by विशाखा पाटील
+१११११११११११११
.
In reply to . by hitesh
घरवापसी कधी करताय सांगितलं
त्यांचा उद्देश खूप चांगला आहे
In reply to त्यांचा उद्देश खूप चांगला आहे by अबोली२१५
ताई.. आम्ही आमच्या परीने
खरेतर "समाधीची पूजा-अर्चा" हा
खरेतर "समाधीची पूजा-अर्चा" हा संस्कृती जपण्याचा मार्गच नव्हे.तीव्र सहमती. पूजा-अर्चेच्या खर्चाऐवजी, पूज्य जिजामातेपासून स्फुर्ती घेऊन, एकाने/समुहाने (आधुनिक शिवबा नाही तरी) एक एक सबळ मावळा तयार करण्यासाठी एखाद्या गरजू मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलावा... हे आवाहन जास्त आवडले असते.In reply to खरेतर "समाधीची पूजा-अर्चा" हा by डॉ सुहास म्हात्रे
+१