Skip to main content

अस्वस्थ!!

लेखक VINOD J. BEDGE यांनी मंगळवार, 24/02/2015 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी असं कुणासाठी का वेडं व्हावं ?? कुणासाठी कुणाचं जगणं अस थोडं व्हावं …. धरणीने पावसाची इतकी वाट पहावी भरभरून कोसळण्याची त्यालासुद्धा इच्छा व्हावी … एकटं आकाश पसरत जातं निळ्याशार पाण्यावर तुझी आठवण वाहत येते कातरवेळी वाऱ्यावर …। तू म्हणतेस कोण आहे असं आयुष्याला पुरणारं आहे कुणीतरी तुझ्यासाठी जळून पुन्हा उरणारं

प्रवास - अनुभव, वर्णन, वाचन आणि दर्शन!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 24/02/2015 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी आत्तापर्यंत लंडन, माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग, गणपतीपुळे, कोल्हापूर, अजिंठा, कार्ला, मुंबई एवढी ठिकाणे फक्त बघितली आहेत. ही चर्चा प्रवास वर्णन आणि संबंधित पुस्तके, मासिके, चॅनेल्स यासंदर्भात आहे. यापूर्वी मी प्रवास वर्णने कधी वाचली नव्हती.पण नुकतीच मीना प्रभूंची दक्षिणरंग (द्क्षिण अमेरिकेवर आधारित) आणि मेक्सिको पर्व ही लायब्ररीतली पुस्तके हाती लागली आणि मला प्रवासवर्णन वाचनाची आवड निर्माण झाली. मीना प्रभूंच्या इतर देशांवरील आणि इतर अनेक लेखकांची प्रवास वर्णनाची पुस्तके मी शोधून विकत घेतली आणि जसा वेळ मिळाला तसा वाचायला लागलो.

भारत माझा देश आहे??? सारे भारतीय माझे,,,,,,,,,???

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी मंगळवार, 24/02/2015 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पेर्णास्त्रोत आमच्या पेर्णास्त्रोतामधे बर्‍याचं गोष्टींचा उहापोह केलेला दिसतोयं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया लिहिण्यापेक्षा हा आख्खा लेख पाडणं मला जास्तं सोईस्कर वाटलं. शाळेमधे प्रत्येक दिवशीची सुरुवात राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञेनी होते. रोजचा "प्रोटोकॉल" म्हणुन हा सोपस्कार उरकला जातो. किती जणं त्या राष्ट्रगीतामधल्या किंवा प्रतिज्ञेमधल्या गर्भितार्थ समजुन उमजुन त्याचा वापर रोजच्या जीवनात करतात?

मोबाइल रिचार्ज

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 24/02/2015 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
 'बघ तो नबंर ...नाइन. .टू. .थ्री फोर...सेवन' 'बरोबर  अगदीच बरोबर, हे तीच्या चुकीचा नबंर ?', 'छे हो मी आसे करणारच नाही..', 'होतात हो चुका होतात. ..काका. .पण आसे घाबरू नका', 'घाबरू नका काय?

भारतीय अर्थव्यवस्था आणि बँकांच्या मुदत ठेवींचे व्याजदर

लेखक टवाळ कार्टा यांनी मंगळवार, 24/02/2015 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझा अर्थव्यवस्था अथवा वित्तव्यवस्था याबाबतची माहिती जवळपास शून्य आहे. बरेच मिपाकर अर्थ-वित्त व्यवस्थापन संबंधीत शिक्षण/नोकरी/व्यवसाय करत असतील. त्या सर्वांना या धाग्यावर त्यांचे विचार मांडण्याची विनंती. मी बर्याचदा खालील वाक्य ऐकले आहे bank FD rates drop as economy matures १. हे वाक्य किती बरोबर आहे? २. जर हे सरसकटीकरण (generalization) केलेले वाक्य असेल तर याला काही अपवाद होते/आहेत? ३. भारताची पुढील १० वर्षांची वाटचाल जर समाधानकारक असेल असे मानले (सरकार कोणत्याही पक्षाचे असो) तर भारतातील बँकांचे १० वर्षांनंतरचे मुदत ठेवींवरील व्याजदर आत्तापेक्षा जास्त असतील की कमी?

राँग नंबर : अंतीम

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 24/02/2015 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
रॉंग नंबर : मागील कथानक तीने फार मोठी घोडचुक केली होती. अर्थात चुक टकल्याची होती, चैतन्यबद्दलची सगळी माहिती तिला द्यायला हवी होती. पण चैतन्य अविवाहीत आहे हे तिला माहीत नव्हते आणि फोनवर पलिकडच्या बाजुला मुंबई पोलीसांचा एक अतिशय धुर्त आणि चाणाक्ष पोलीस अधिकारी आहे याचा तिला संशय येणेही शक्य नव्हते. चैतन्यचा फोन चालु ठेवणे ही टकल्याची मोठी चुक होती.

मेरा भारत महान

लेखक बाप्पू यांनी मंगळवार, 24/02/2015 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख वाचल्यावर कदाचित माझ्याबद्दल तुम्ही मला नकारात्मक विचार करणारा म्हणून हिनवाल. काही लोक मला देशद्रोही असल्याचा शिक्का मारून देश सोडायला देखील सांगतील. पण खरच मित्रांनो मला कधी कधी खूप राग येतो या देशाचा, या देशाचा म्हणण्यापेक्षा या देशातील लोकांचा आणि त्यांच्या मानसिकतेचा. राग येतो या देशातील राज्यकर्त्यांचा आणि सिस्टीम चा. नुकतीच घडलेली एक घटना. माझ्या एका मित्राच्या घरी चोरी झाली. जवळपास १ लाख रुपयांचा ऐवज घरातून चोरी झाला. मित्राने पोलिसांकडे मदत मागितली तेव्हा पोलिसांनी ती तक्रार नोंदवून न घेता त्याला २ दिवसांनी ये, तोपर्यंत आम्ही तपास करू असे सांगितले.

रुसलेले शब्द

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 23/02/2015 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द माझ्यावर रुसलेत... बहुतेक कोप-यात लपलेत. शोधून त्यांना दामले; मीच फ़ुरगटुन बसले! वाटल येतील सोबतीला... फुगा फोडतील मनातला... वाट पाहून थकले; ते अजुनही लपले. लिहायची होती एक शायरी... निदान एक इटकुली नज्म तरी.. बहुतेक त्यांना वाटल... हिला जमणार कुठल? त्यांच ही बरोबरच आहे; नज्म-शायरी... अपना बस कुठे? नाद मी सोडून दिला... शब्दांनी परत हात दिला!

खुशबू (भाग ५)

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 23/02/2015 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ 'अरे हरदीप आज नयी बाइक' 'हा पाजी, आज वो कनद्दा से आई सुसान, मेरे नाल आई, अपनी बाइकको ग्राउंड पे छोड, उपरसे अपनी टीशार्ट, जीन्स, सारे कपडे उतार कर ग्राउंड पे फेक देके, बोली, हरदीप- I am offering you ANYTHING you want !' 'तो तुने क्या किया' 'क्या करता पाजी, बाइक उठाके चला आया ' 'अच्छा किया हरदीप, वैसेभी वो जीन

वृक्षारोपण माहिती हवी आहे

लेखक देवांग यांनी सोमवार, 23/02/2015 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करतो. आम्हाला सिंहगडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यायचा आहे(प्रती वर्षी १५०० ) ज्या द्वारे तिथे जास्तीत जास्त घनदाट झाडी करता येईल. परंतु आम्हाला ह्याबाबत जास्त माहिती नाही. कृपया तुम्हास ह्या विषयाची माहिती असल्यास ती शेअर करावी. १. कुठल्या महिन्यात कार्यक्रम हाती घ्यावा २. कुठल्या प्रकारची झाडे लावावीत ज्यासाठी कमी पाणी लागेल आणि त्यांची वाढ जास्त काळजी न घेत होऊ शकेल ? ३. छोटी रोपे लावावीत कि मध्यम आकाराची रोपांची लागवड करावी ? अजून काय काळजी घ्वावी ?