Skip to main content

एक संवाद - २

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 19/03/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक संवाद - 1 ती - काय रे ? कुठे होतास इतका वेळ ? ऑन लाईन दिसत नव्हतास… तो - उशीरा आलो आज. ती - ओके, काय विशेष? उशीर का झाला? तो - आता तूपण बायको सारखे प्रश्न विचारायला लागलीस ती - नाही सांगायचं तर नको सांगूस. तो - अरे लाँग ड्राईव ला गेलो होतो ना. ती - ओह्ह. तो - तुला बोलावलं होतं, नाही आलीस. ती - कुठे गेला होतास तो - असं काही ठरवून नव्हतो गेलो ती - म्हणजे ? तो - नाशिकरोड ला चालवत राहिलो ती - ओके, आणि मग तो - एक रिपोर्ट बनवतो आणि देतो तुला मग वाचत बस.

नवीन कॅमेरा घेणे आहे...

लेखक मेघनाद यांनी गुरुवार, 19/03/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा मंडळी, तसा मी आजपर्यंत हौशी छायाचित्रकार आहे. आजपर्यंत जे काही टिपण्यासारख दिसेल ते भ्रमणध्वनी संचातून टिपायचा प्रयत्न केला...आणि मिपा वर प्रदर्शित केला. त्याला संमिश्र प्रतिसाद पण मिळाले. आता मात्र जरा मोठा कॅमेरा म्हणजेच DSLR घेण्याची अतीव इच्छा झाली आहे. तर मग आता मार्गदर्शनासाठी मिपा करांकडे आलो आहे. मी स्वतः अजून एकदाही DSLR वापरला नाहीये पण तांत्रिक माहिती आणि काय आणि कस वापरायाच याची बर्यापैकी माहिती मिळवली आहे. सध्या हौशी आणि सराव करून कुशलता मिळाली कि व्यवसायिक छायाचित्रकार (लग्न आणि इतर छोटे-मोठे कार्यक्रम) म्हणून प्रयत्न करायची फार इच्छा आहे.

भाव तिथे देव

लेखक निनाद जोशी यांनी गुरुवार, 19/03/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
काय हो वर्णावा त्या नराचा स्वभाव घेतला ज्याने देव विकत बाजारी चार मोजले रोकडे अन म्हणे आता धाव तुच मला वाचव संकटा पासून तुला मी रे दिले माझ्याकडले हे धन आता सोडव ह्यातुन मजला देवा अरे वेड्या त्याच्या लेखी तू आहेस कंगाल त्याला पाहिजे जो माल तुझ्याकडे नाही संत सांगती सज्जना मनी असुदेत भाव तोच करेल बचाव स्वता: हून
काव्यरस

स्मारक बांधून काय होतं ?

लेखक चिनार यांनी गुरुवार, 19/03/2015 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पात छत्रपती श्री शिवाजी महाराज, स्व. श्री बाळासाहेब ठाकरे ,स्व. श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे स्मारक बांधण्यासाठी ४००-५०० कोटींची तरतूद करण्यात आली. गुजरात मध्ये सुद्धा स्व. श्री वल्लभभाई पटेल याचं स्मारक बांधण्यात येणार आहे. खर्च जवळपास ४००० कोटी. या स्माराकांद्वारे काय साध्य होते ? जनतेच्या पैशांनी स्मारक बांधणे या महापुरुषांना तरी आवडेल का ? याद्वारे पर्यटनाला थोडीफार मदत होते हे मान्य ! पण पण हेच पैसे योग्य ठिकाणी वापरून पर्यटन आणी अन्य व्यवसाय जास्त वृद्धिंगत करता येणार नाही का ?

एका जत्रेची सत्यकथा ! (ज्यांच्या धार्मिक भावना वगैरे पटकन दुखावल्या जातात त्यांनी हा लेख वाचू नये . )

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 19/03/2015 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही एका देवळा मागची गोष्ट . एका छोट्या गावातले हे देऊळ. दरवर्षी इथे जत्रा भरते. तिथे लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी ज्यादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली आहे .त्यात आजकाल अनेक वीवीआयपी भाविक असतात . त्या देवळाची तुलना आता थेट पंढरपूराशी केली जाते . तर या देवळाची किंवा जत्रेची ही सत्यकथा . सुमारे १८५० नंतरचा काळ. (नक्की साल माहित नाही ). ब्रिटीश राजवटीत अनेक छोटेमोठे संस्थानिक होते . त्यातील एका छोट्याश्या संस्थानिकाच्या पदरी एक सरदार होता . आजूबाजूच्या गावातील सारा वसुलीचे काम त्याच्याकडे होते.

मोरूचा मिपासंन्यास...!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 19/03/2015 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा आला. सकाळ झाली . पूर्वी मोरूचा बाप मोरूला म्हणे - ''अरे मोरू, उठ ! आज गुढीपाडवा आहे. आटपून तयार हो लवकर. वगैरे '' लहानपणापासून मोरूला सवयच तशी होती. मोरूची हालचाल झाली पण डोळे मुळीच उघडेनात. बाबांनी उठवल्याशिवाय मोरूला मुळीच जाग येत नसे- गजराने तर नाहीच नाही . पण आताचा हा आवाज वेगळाच अन नाजूक होता , ''अरे मोरू, उठ ना ! चहा घे -गार होईल …'' '' हे काय भलतंच ! बाबा चहा घेऊन आले कि काय? अन त्यांचा आवाज असा बायकी का झालाय? '' थांबा जरा '' म्हणून कुशीवर वळला , तेव्हढ्यात ''अरे आता उs s ठ ना ! '' असा दीर्घ पुकारा झाल्यावर उठून बसणं भाग होतं.

आग्रऱ्याहून सुटका भाग 3

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 18/03/2015 22:58 या दिवशी प्रकाशित केले.

आग्रऱ्याहून सुटका भाग 3

शिवाजीमहाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून 1666च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते. 1. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्या अभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती. 2. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता. त्यामुळे राजे रामसिंहाला दिलेल्या वचनातून मुक्त झाले होते.

घाटवाटांवरची सायकल राईड - (भाग २- समाप्त)

लेखक मोदक यांनी बुधवार, 18/03/2015 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
...सकाळपासून १८० किमी सायकल चालवली होती... कात्रज, खंबाटकी, पसरणी व आंबेनळी हे चार घाट पार केले होते. एक झकास दिवस चविष्ट भोजनासमवेत संपत होता... दुसर्‍या दिवशी संपूर्ण चढ उतारांचा वरंधा घाट आणि भोर ते पुणे हे फारसा चढ नसलेले तुलनेने अगदीच सवयीचे असणारे अंतर पार करावयाचे असल्याने दोघेही निवांत होतो.

ह्या कॅन्सरवर इलाज आहे का?

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 18/03/2015 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी महिनाभर राहून मनसोक्त हुंदडायचे,मामेभाऊ व त्याच्या मित्रांबरोबर खेळायचे , टिंगलटवाळ्या करायच्या व सुट्टी संपली की ही आठवणींची शिदोरी घेवून आपल्या घरी परतायचे हा माझा दरवर्षीचा कार्यक्रम असे. अकरावीची वार्षिक परिक्षा संपल्यावर दरवर्षीप्रमाणे आजोळी गेलो. दुपारची वेळ असूनही घरात आजी आजोबांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. मामेभाऊ-बहीण कोणीही घरात नव्ह्ते, प्रत्येकाने स्वतःला अभ्यासापासून ते पोहण्यापर्यंतच्या क्लासेसमध्ये गुंतवून घेतले होते. हातपाय धूवून फ्रेश होवून आजी-आजोंबांबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या व बाहेर सटकलो.

आमच्या विवाहाची कहाणी - ३

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 18/03/2015 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या विवाहाची कहाणी १ - http://www.misalpav.com/node/30588 आमच्या विवाहाची कहाणी - २- http://www.misalpav.com/node/30631 सर्व जण जाईपर्यंत साडे सहा वाजलेले होते. घरचे पाच जण आता थोडा वेळ आहे म्हणून शांत बसलो होतो. मला रात्री नउच्या चेन्नई एक्स्प्रेसने पुण्याला जायचे होते. पहिल्यांदा वडिलांनी विचारले कि मग आता काय विचार आहे. मी पहिल्यांदा मत देण्यास का कू करत होतो पण वडिलांनी सांगितले प्रथम तुझे मत हवे आहे त्यानंतर आम्ही आमची मते सांगू.