कर्मयोगी ली कुआन यू
ब्रिटीशांनी मलाया म्हणून एक राष्ट्र स्वतंत्र करून दिले होते. त्यांत सिंगापूर देखील होते. भारत पाकिस्थानच्या पेक्षा अगदी वेगळे घडले येथे. पाकिस्थान ला फुटून वेगळे व्हायचे होते. पण इथे, त्यावेळचे पंतप्रधान टुंकू अब्दूल रहमान ह्यांना अशी भिती होती की चायनिजपुढे मलेय लोकांचा निभाव लागणे कठीण आहे. भविष्यात कदाचित हे लोक आपल्याला दाबून टाकतील. म्हणून स्वतंत्र मलायाने चायनिजला सांगितले की सिंगापूर हा तुमचा देश वेगळा करून तुम्ही -हावा ! टुंकूला वाटले होते की हा टिचभर देश काय टिकतोय! हा आपलाच आश्रित बनेल!
ली यांना मुळीच वेगळे व्हायचे नव्ह्ते. त्यांनी एकत्र रहाण्यासाठी खूप समजावले.
मिसळपाव