वडा पाव रे........!!!
ती म्हणे : प्रत्येक जन्मी
हाच नवरा मिळावा
तो म्हणे : देवा ,
नविन चॉइस तरी कळावा.....!!
ती म्हणे : बरा असतो
एकच एक गडी
माहीत होऊन गेलेल्या
सार्या त्याच्या खोडी .....!!
तो म्हणे : चांगली असे
अंबाड्या ची भाजी
तरीही खावी वाटे
कधी तरी कांदाभजी ....!!
नाठाळाला वठणी वर
आणावयाचा त्रास
हरेक जन्मात वाचेल बाई
आमचा तो ख़ास....!!
ताटाखालचे मांजर मी
होणार असेल तर होवू दे
प्रत्येक जन्मात देवा
ताट तरी नविन दे ....!!
जायचे तर जा नाथा
नाजुक धागे तोडून
हात तिने जोडले
डोळे आले भरुन ....!!
इथ
काव्यरस
मिसळपाव
हिंदी चित्रपटसृष्टीला ज्या अनेक संगीतकारांनी सजविले त्या प्रत्येकाची शैली स्वतंत्र होती. मदनमोहन यांचे वेगळेपण अगदी ठळकपणे डोळ्यात भरते. मदनमोहन हे आर्मीमध्ये काही वर्षे सर्विस केल्यामुळे शिस्तप्रिय आणि अचूक कामासाठी प्रसिद्ध होते. गजलसम्राट म्हणून ते ओळखले जायचे. अनेक नितांतसुंदर अजरामर गाणी विशेषत गजल्स त्यांनी आपल्याला दिलीत.
हिंदी चित्रपट गीते आवडत नाहीत असे म्हणणारा विरळाच. जसे मला आंबा आवडत नाही असे म्हणणारा असेल इतकी ही गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग होऊन बसलेली असतात.