[शतशब्दकथा स्पर्धा] दैवी शक्ती
आजुबाजुला मिट्ट काळोख होता. पक्या अजुनही पळतच होता शेताच्या बांधावरुन पळायला नीट जमतही नव्हते , पण जीव वाचवायचा होता , म्हणुन पळावे तर लागणारच होते. पायातील चप्पल अचानक तुटली पण चपलेची पर्वा न करता तो अनवाणी पायानी पळत होता ,गावातील दिवे अजुनही दुरवर दिसत होते , कधी एकदा गाव येते असे पक्याला झाले होते.
मिसळपाव