Skip to main content

६५ क्रॉमवेल अ‍ॅवेन्यु, हायगेट, लंडन.

लेखक पद्मावति यांनी शनिवार, 15/08/2015 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन च्या आर्चवे ट्यूब स्टेशन च्या बाहेर येताच हायगेट हिल रोड ने सरळ सरळ चालत आलं की उजव्या हाताला एक रस्ता वळतो हा रस्ता आहे क्रॉमवेल अ‍ॅवेन्यु. एका मध्यमवर्गीय वसाहतीतला हा साधारणसा रस्ता. मुख्य रहदारीपासून जरा आतल्या भागाला असल्यामुळे इथे ट्रॅफिक सुद्धा कमीच असतो. या रस्त्याला वळून उजवीकडे आठ-दहा घरे सोडली की आपण उभे राहतो एका अगदी साध्या सुध्या रूपाच्या एका विक्टोरियन पद्धतीच्या घरासमोर. हे सर्वसामान्य दिसणारे घर मात्र इथल्या बाकीच्या घरांपेक्षा फार वेगळं आहे. या घराला इतिहास आहे तो भारतीय स्वातंत्र्य लढयाचा.

द स्केअरक्रो भाग १७

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 15/08/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १६ द स्केअरक्रो भाग १७ (मूळ लेखक मायकेल काॅनेली) कार्व्हर त्याच्या गाडीत, अंधारात बसला होता आणि समोर असलेल्या घराकडे पाहात होता. तो जे काही करायला इथे आला होता, ते करायला अजून वेळ होता. त्याला थोडं थांबावं लागणार होतं. पण त्याने त्याला काहीही फरक पडत नव्हता. तसंही त्याला अंधारात एकटं राहायला आवडायचं. त्याच्या आयपॉडवर असलेलं त्याचं आवडतं गाणं – लिझार्ड किंगचं I am a changeling, see me change – तो ऐकत होता. या गाण्याने त्याला आयुष्यभर साथ दिलेली होती.

[शतशब्दकथा स्पर्धा] दोष कुणाचा?

लेखक नीलांबरी यांनी शुक्रवार, 14/08/2015 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
घरात आज आनंदीआनंद होता. बर्‍याच प्रयत्नांनंतर कुलदीपकाला परदेशी जायची संधी मिळाली होती. जाण्याच्या तयारीबरोबरच रोजच्यारोज मेजवान्या झडत होत्या. नुकत्याच लग्न करून आलेल्या सूनबाईचा हा पायगुण असल्याचं काही नातेवाईक बोलत होते. सूनबाईही सगळ्यांच्या आनंदात सहभागी होती. नुकतीच होऊ घातलेली तिच्या नोकरीतली पदोन्नती सोडून ती कायमची परदेशी जायला विनसायास तयार झाली होती.

[शतशब्दकथा स्पर्धा] पित्रुत्व...

लेखक द-बाहुबली यांनी शुक्रवार, 14/08/2015 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय व्यथीत अंतकरणाने तो घरी निघाला... डॉक्टरांचे शब्द घुमत होते, सॉरी रवी पण वैज्ञानीक प्रगती तुला वडील बनवण्यास असमर्थ आहे. त्याने अश्विनीला विश्वासात न घेता आयुष्यात प्रथमच एक निर्णय घेतला होता. परस्पर डॉ़क्टकडे जाण्याचा. सुयोगला नाकरुन अश्विनीने त्याचा स्विकार केला व सुयोगने ते खिलाडुपणे स्विकारलेही होते. आजही तो त्यांचा मित्रच होता. पण आपण मात्र अश्विनीसाठी पात्र नाही ही भावना आता छळु लागली होती. जडपावलानी तो घरात शिरला अन अश्वीनी त्याच्याकडे धावत आली अन बिलगली...

(चरस गांजा अता मिळाल्या)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 14/08/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
चरस गांजा अता मिळाल्या देई चिलम तुला आजपासुनी घ्यावे अधिक तू ताज्या गवताला* करुन रोल कागदाला त्यात सोडी तू अफिमा आग पेटवून आणि घे तू शांत उरात धुमा लपून कश ते मारुन कर या निर्मल दाहि दिशा रात्री ऐशा अमर करुनि घे तव दिन शयनाला दारु जशी गुत्त्यात, नस जशी राहे बटव्यात बीडि जशी ओठांत, गुटखा हा बघ या गालांत पाल जशी कच्चीत, रसाळ किमाम माव्यात हृदयी तू साठवी ही नशा डोइत कश भिनला --(निर्व्यसनी) स्वामी संकेतानंद *गवत*= ग्रास

घर एकटे बागेसह......

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/08/2015 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
घर एकटे बागेसह ........... घर एकटे बागेसह वाट श्रावणाची पाहते, एकेक झाडमाड अंतरीचे गुज येथे सांगते. पुसट लाल संकासूर बोलतो न काही उचलूनी फांद्या परी आकाशाकडे पाहतो कोण आले, कोण गेले, राहिले न कोणी तरी दाराशी स्तब्धसा, वाट कुणाची पाहतो? सरताना बहर तसा, कळ्या दोन हासल्या 'मोगराच मी सुगंधी, जरा अजून बहरतो पावसाची वाट पाहण्या, कळ्यांतून झुरतो श्रावणाची झड येता, मी पानांतून मिटतो!' शुभ्र अनंताचे कसे, विरागीच अडसर उचलेना पाऊल पुढे, वा मागेही अधिरे मौनात त्याच्या, प्रश्न किती साधेसुधे! उत्तरे खरीखुरी, तरी का मन बावरे? तुळस एकटी अकारण,रोखुनिया बघते पावलांचे ठसे माझ्या, मोजूनिया पाहते जुन्याखोल ओळख
काव्यरस

[शतशब्दकथा स्पर्धा] खाणांखुणा

लेखक कपिलमुनी यांनी शुक्रवार, 14/08/2015 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
शहरभर दंगलीचा वणवा पेटला होता. त्या रात्री तो कसाबसा जीव मुठीत धरून घरी जायचा प्रयत्नात होता. रस्त्यावरून एक सशस्त्र घोळका त्याच्या दिशेने आरोळ्या देत येताना दिसला, ते लाल गुंजासारखे डोळे त्याच्यावर रोखले गेले आणि गळ्यामधल्या लॉकेटकडे नजर जाताच तो बोलला,"अपना है ,साथ आयेगा ?" , 'नाही' म्हणताच तिरस्काराची पिंक टाकून ते पुढचा सावज शोधू लागले .सहज म्हणून घातलेल्या त्या लॉकेटचे तो हजारवेळा चुंबन घेत होता,जन्मताच मारलेले शिक्के आज कामी आले.

[शतशब्दकथा स्पर्धा] सामक्षा

लेखक सूड यांनी शुक्रवार, 14/08/2015 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं गाव काय हे न्हवे. ते तिते तळकोकणात!! किनार्‍यावरना गोरे आले, धर्मांतरं सुरु केल्यानी. भरीसभर शाहाची माणसा होतीच. मग आमच्या सासर्‍यांच्या पणजोबांनी सगळा बाडबिस्तारा उचलल्यानी नि आले हिकडे आडगावात!! चांगली जागा बघून घर बांधू म्हटले, गावकरी सांगत जागा बरी नाय. दुसर्‍या कुटंव्ह बांदा पण हिते नको. पणजोबा पण खमके, घर बांधून दाखवलंनी. सगळं नीट झालं, घर बांधून गाठीस पयशे र्‍हायले. म्हयन्याभरान घरभरणीचा मुहूर्त काढल्यानी. पणजीबाई पंगतीसाठीचे तांदूळ सडायला म्हणून उभ्या र्‍हायल्या नि दोन घाव घातले नाय की लकाटल्या.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस: मतदान

लेखक संपादक मंडळ यांनी शुक्रवार, 14/08/2015 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी नाही म्हणून टाकलेली विशाल कुलकर्णी, किल्लेदार यांची छायाचित्रे उल्लेखनीय होती. तशीच इतर अनेकजणांची छायाचित्रे खूप छान होती. या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १,२,३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबदलही जरूर लिहा. कोणाचेही छायाचित्र मतदानासाठी घ्यायचे राहिले असेल तर ते त्वरित लक्षात आणून द्यावे. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे २४ तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती.

[शतशब्दकथा स्पर्धा] "व्हॉटसअप "

लेखक जगप्रवासी यांनी शुक्रवार, 14/08/2015 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
कानात इअर फोन कोंबून बाईक बुंगवत जायचं इतकच त्याला माहीत, रस्त्यावर गर्दी दिसली म्हणून उत्सुकतेने याने पण बाईकचा वेग कमी करून काय दिसतंय ते बघायला गेला. एका बाईकचा अपघात झाला होता, कुठल्यातरी गाडीच्या धडकीने त्या बाईकची अवस्था वाईट केली होती. आणि त्यावरचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात तिथेच अस्ताव्यस्त आडवा पडला होता. "अरेरे तो गाडी वाला ठोकून गेला" जमावाची कुजबुज, पण मदतीला कोणीच आलं नाही.