Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] खाणांखुणा

लेखक कपिलमुनी यांनी शुक्रवार, 14/08/2015 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
शहरभर दंगलीचा वणवा पेटला होता. त्या रात्री तो कसाबसा जीव मुठीत धरून घरी जायचा प्रयत्नात होता. रस्त्यावरून एक सशस्त्र घोळका त्याच्या दिशेने आरोळ्या देत येताना दिसला, ते लाल गुंजासारखे डोळे त्याच्यावर रोखले गेले आणि गळ्यामधल्या लॉकेटकडे नजर जाताच तो बोलला,"अपना है ,साथ आयेगा ?" , 'नाही' म्हणताच तिरस्काराची पिंक टाकून ते पुढचा सावज शोधू लागले .सहज म्हणून घातलेल्या त्या लॉकेटचे तो हजारवेळा चुंबन घेत होता,जन्मताच मारलेले शिक्के आज कामी आले. आपल्याकडे असलेल्या इतर खुणासुद्धा सहज दिसतील अशा ठेवल्या आणि २ गल्ली सोडून स्टेशनकडे वळला आणि अचानक समोर आलेल्या जमावाकडे बघताच त्याचे पाय थिजले आणि वेगाने तो शरीरावरच्या खुणा मिटवू लागला

वाचने 4749
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

बॉम्बे चित्रपट आठवला ....

In reply to by पगला गजोधर

@बॉम्बे चित्रपट आठवला ...>> अगदी हेच मनात येत होतं वाचता वाचता +१

+१

+१

+१

+१

+१

+१

दुसर्‍या जमावाचा दुसरा भाग....

+१

+१ खासच

+१

+१

+१ असिफ - नंत सिताराम डकेचा चावट जोक आठवला ;)

+१

+१

आवडली...+१

+१

+१ वास्तववादी चित्रण.

+१

+१

+१

+1

+१