Skip to main content

चुलीमध्ये घाल

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 22/09/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीमध्ये घाल

मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल
नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल

जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद
या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?

बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार
असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल

कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग
येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल
काव्यरस

आपला दिनु( थोडं भय)

लेखक दिनु गवळी यांनी मंगळवार, 22/09/2015 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशात स्वच्छ चांदणे पसरले होते, दिनू आज खूपच अस्वस्थ होता. आता तूम्हाला वाटल असेल की आपला दिनु का बरं अस्वस्थ होता अहो तस काही मोठ कारण नव्हत ! कालपासून त्याला थोडे जुलाब होत होते म्हणून आज सकाळीच बसने तो तालूक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात गेला होता दवाखान्यात खुपच गर्दि असल्यान खुप उशीरा त्याचा नंबर लागला इंजक्शन ,गोळ्या घेउन तो तातडीन स्टँडवर आला दुपारची तर बस निघुन गेली होती. आता उरली ती शेवटची ६ वाजेची बस तोपर्यँत काय करायचे तेवढ्यात त्याला समोरच पेपरच दूकान दिसल तिथून एक पेपर घेऊन तो कोडी सोडवत बसला बघता बघता कसा वेळ गेला दिनूला कळलेच नाही.

हाथ बढा ए ज़िंदगी

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 22/09/2015 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी घरी एकटा होतो. उन्हं उतरली होती. सुटीची कामं, वाचन, टीव्ही पहाणं सगळं करून झालं तरी रविवारचा संधिकाल सरता सरत नव्हता. असं बर्‍याच दिवसांनी घडलं होतं. वेळ घालवायला मागच्या अंगणात गेलो. नेहेमीप्रमाणेच मावळत्या दिवसाला आणखी थोडं लांबवत, एकमेकांचा पाठलाग करत पक्षी झाडांवरून, विजेच्या तारांवरून झेपावत होते. एकदम लक्षात आलं, खारी दिसत नाहीयेत आज. गेल्या महिन्यात तर कितीतरी होत्या.

श्रीगणेश लेखमाला ५ : माझी पत्रकारिता

लेखक pradnya deshpande यांनी मंगळवार, 22/09/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पत्रकारिता राष्ट्रीय वाहिनीवरील सलमा सुलतान, मराठी दूरदर्शनवरील प्रदीप भिडे, स्मिता तळवलकर, ज्योस्त्ना किरपेकर, नलिनी सिंग यांच्यानंतर ९०च्या दशकातील बरखा दत्तपर्यंत तमाम पत्रकारांचे आणि वृत्तनिवेदकांचे लहानपणापासून प्रचंड आकर्षण होते. ३१ डिसेंबरला दिल्ली दूरदर्शनवरून सादर होणारा 'अराऊंड द वर्ल्ड' कार्यक्रम असो वा साप्ताहिकी, प्रत्येक कार्यक्रम लहानपणापासून मनावर नकळत पत्रकारितेचे संस्कार घडवत होता.

तेवढं म्हसरावर लक्ष ठेवा

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 21/09/2015 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी, डोळ्यात जरा पेंग याय लागलीय. तरीबी तुमाला सांगतुच. व्हय, बांधावरच घडलं आसं. मी दारं धरत बसलू होतू. म्हशी लिंबाखाली बांधल्या व्हत्या. कालवाडाचं दावं जरा लांब ठिवूनच बांधलं व्हतं, न्हायतरं म्हशी त्येला ढोसरतात. रानात चिटपाखरु नव्हतं. ह्यो ऊनाचा कार. तेवढ्यात लाईट गीली. कटाळा करत उठलू, आन हीरीवर मोटर चालु कराय चाललू. जाताना वाटत शितली दिसली.बहुतेक खुरपाय चालली व्हती. घट्ट साडी नेसली व्हती, आंग कसं एकदम भरल्यालं वाटत हुतं.

अंबाडा

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 21/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला? प्रतिमा मोहक ती अर्पण पाण्याचे त्या होई दर्पण स्पर्शाविना शिरशिरीचा कुणी तरंग लहरता सोडला? दवांसोबत हलके निजेतून बाग पाहते डोकावून दहादिशांना बहकवणारा कुणी गंध नाशिला सोडला? ना अजून भैरवी निजली ना अजून भूपाळी उठली क्षितीजावर सकवार सुरांचा कुणी राग मारवा सोडला? अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला? - संदीप चांदणे

कुमाऊं – बिन्सर-चौकोरी

लेखक के.के. यांनी सोमवार, 21/09/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
==================== भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ ==================== कुमाऊं – बिन्सर-चौकोरी आमच्या प्रवासातला पहिला टप्पा ‘बिन्सर’ होता. बिन्सर हे मुख्यत: अभयारण्य म्हणुन प्रसिद्ध आहे. हे उत्तरांचल राज्यातील ‘अल्मोडा’ जिल्ह्यात आहे.

बाप्पाचा नैवेद्य : चॉकलेट मोदक

लेखक इशा१२३ यांनी सोमवार, 21/09/2015 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!गणेशउत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! घरोघरी गणपतीबाप्पाचे आगमन झाले आहेच.रोज छान छान नविन नैवेद्य दाखवताय ना?माझ्याकडेहि उकडीचे मोदक,तळणीचे मोदक,खवा मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवुन झालेच.पण मुलांना काहि समाधान होईना.कारण चॉकलेट मोदक काही अजुन झाले नव्हते.गणपती बसुन तीन दिवस झालेले आणि चॉकलेट मोदक नाहित म्हणजे बाप्पा रागवेल ना अशी धमकी शेवटि छोट्या लेकीकडुन देण्यात आली.आता मोदक करणे आलेच.बर बाप्पाही पूर्ण १० दिवस असल्याने रोज नैवेद्यात विविधता हवीच नाहितर गणपती बाप्पा कंटाळेल हे हि लेकीकडुन सांगण्यात आले.असो. घरी नेहेमी चॉकलेट बनवले जातातच त्यामुळे साहित्य घरात होतेच.अगदी थोड

एक तारा विझताना ("राजेश खन्ना: द डार्क स्टार")

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 21/09/2015 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
(काही दिवसापूर्वी नसीरुद्दिन शाहच्या आत्मचरित्रावर इथे लिहिलं होतं. त्याला बरेच प्रोत्साहनपर प्रतिसाद मिळाले. त्यामुळे आणखी एक पुस्तक-परिचय लिहिण्याचे धारिष्ट्य करीत आहे. हेही पुस्तक सिनेमाबद्दल आहे, हा केवळ योगायोग.) सत्तरदशकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या आम्हाला सिनेमा या पदार्थाची लज्जत हळूहळू समजायला लागली, तेव्हा अमिताभ बच्चन त्रिखंड व्यापून राहिल्यागत होता. इतर अभिनेते खिजगणतीत नव्हते. प्राथमिक शाळासोबत्यांमध्ये पंखे फक्त आणि फक्त अमिताभ बच्चनचे असत.