नमस्का मित्रहो,
मिपावर (किंवा कुठेही) लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. काही चूका असल्यास गोड मानुन घ्या आणि काही सूचना असल्यास अवश्य करा.
========================
भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६
========================
कुमाऊं - पूर्वतयारी
यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीमधे कुठे जायचे ह्याची चर्चा नविन वर्ष सुरु झाल्यावर लगेच सुरु झाली. एप्रिलमधे साधारण एक आठवड्याची ट्रीप करावी असा विचार होता. उन्हाळा जोरदार असणार म्हणुन एखाद्या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध घेत होतो. पूर्वी एकदा दिल्लीच्या मित्राबरोबर बोलत असताना त्याने “कुमाऊं परिसर बघ” असा सल्ला दिला होता. तो अजुन डोक्यात घुटमळत होता. म्हणुन तोच भाग बघायचे ठरवले. बायकोचीही कुठली ठरविकच ट्रीप करायची अशी मागणी नव्हती त्यामुळे ही जरा वेगळी ट्रीप करायचे ठरले. अर्थात, हा परिसर पुणे-मुंबईकरांसाठी वेगळा असला तरी दिल्ली/NCRवाल्यांसाठी मात्र महाबळेश्वर सारखाच जवळचा आहे.
एप्रिलमधे कुमाऊंचे हवामान आल्हाददायक असते. थंडी नुकतीच संपलेली असते आणि उन्हाळ्याची तीव्रता फारशी नसते. साधारण महाराष्ट्रात जसे वातावरण थंडीत असते तसेच काहीसे तिथे एप्रिलमधे असते. पर्यटनाचा मुख्य काळ हा मे व जून असा असल्याने एप्रिलमधे पर्यटकांची फारशी वर्दळ नसते. उत्तरेत शाळांच्या सुट्ट्यादेखिल उशीराच असतात ते देखिल एप्रिलमध्ये पर्यटक कमी असण्याचे कारण असू शकते. ह्या सगळ्या कारणास्तव आम्ही एप्रिलमध्येच जायचे ठरवले.
हा परिसर खुणावण्याचे अजुन एक कारण म्हणजे साक्षात ‘हिमालय’ पहायला मिळणार होता!!
आता एकदा कुठे जायचे हे ठरले की पुढचे नियोजन करणे सोपे पडते. त्या परिसरात काय काय पहायला आहे ह्याची कल्पना मित्राने दिलेलीच होती. तरी मी माहिती गोळा करायचे काम सुरु केले. त्यासाठी मला नेहमी ऊपयोगी पडणारे साधन म्हणजे Tripadvisor चा वापर सुरु केला. उत्तराखंडच्या फोरमवर ८ दिवसांच्या ट्रीपमधे काय काय पहाता येईल ह्याची चौकशी केली. यथावकाश मला त्यावर योग्य प्रतिसाद मिळाले. Google Maps तर सोबतीला होताच. मग साधारणपणे काय बघायचे आणि त्याचा काय मार्गक्रम असेल हे निश्चित झाले.
पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रवासाचे आरक्षण. प्रवास लांबचा असल्यामुळे दिल्लीपर्यंत विमान आणि पुढे रेल्वेने प्रवास करायचे ठरवले. रेल्वेने दिल्लीपासुन काठगोदामपर्यंत जाता येते. तिथुन पुढे अर्थात टॅक्सी/बस शिवाय पर्याय नाही. रेल्वे आरक्षण मिळायला काहीच अडचण आली नाही. (हे सर्वात महत्त्वाचे... IRCTCचा काहीच भरवसा नसतो). अणि रेल्वे आरक्षण झाल्यावर मगच विमान तिकिट बुक केले.
कुमाऊंमधे पहायला बरेच काही आहे. Tripadvisor वर मिळणारे पर्याय, मित्र सुचवत असलेले पर्याय, मला बघायची असलेली ठिकाणे ह्यावरुन मी बरेच वेगवेगळे प्लॅन बनवत होतो आणि बायकोला “मेरे नये पिलॅन के मुताबिक...” सांगत होतो. तरी आम्ही उपलब्ध दिवस, प्रवासाला लागणारा वेळ आणि बरोबर असलेला ५ वर्षाचा मुलगा ह्या सगळ्याचा विचार करून खालील प्लॅन बनवला.
काठगोदाम --> बिन्सर (१रात्र) --> चौकोरी (१रात्र) --> मुन्स्यारी (२रात्र) --> कौसानी (१रात्र) --> रानीखेत (१रात्र) --> नैनिताल (२रात्र) --> काठगोदाम.
Kumaon Route Map
आता वेळ आली होती हॉटेल शोधायची. इथेदेखिल अर्थात Tripadvisor चीच मदत घेतली. आम्हा दोघांच्या हॉटेलच्या बाबतीत फार अवास्तव अपेक्षा नसतात. ४/५ चांदण्यावालेच पाहिजे असे काही नाही. पण मूलभूत सुविधा व्यवस्थित असायलाच हव्या हा आग्रह मात्र नक्कीच असतो. आता कुमाऊं परिसरात काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत तर काही ह्या सगळ्या कोलाहलापासुन मैलोन् मैल दूर असलेली. त्यामुळे हॉटेलपण ठिकाणाप्रमाणे वेगवेगळी होती.
अशातच एके दिवशी कार सर्व्हिसिंगला द्यायला गेलो असताना सहज सर्व्हिस स्टेशनच्या समोर पाहिले असता ‘कुमाऊं मंडल विकास निगम' (KMVN) चे ऑफिस दिसले! म्हटले अरे वा! ज्याचा शोध घेत आहे ते तर समोरच आहे. ऑफिसमधे जाउन सरकारी हॉटेलची चौकशी केली. KMVNनी जवळपास सर्वच पर्यटन स्थळांपाशी त्यांची रेस्ट हाउस (TRH) उभारलेली आहेत. मुख्य म्हणजे आपल्या MTDC सारखे त्यांची पण सर्व हॉटेल मोक्याच्या ठिकाणीच आहेत. Tripadvisorवर सुद्धा लोकांनी बरेच बरे रिव्ह्यू लिहिलेले होते. म्हणुन सरतेशेवटी बिन्सर, चौकोरी, मुन्स्यारी व कौसानी येथे KMVNची हॉटेल बुक केली. रानीखेत आणि नैनितालला मात्र दुसरे पर्याय शोधले.
कुमाऊं मधल्या संपुर्ण प्रवासासाठी एक कार बुक केली जी आम्हाला पहिल्या दिवशी काठगोदामला उचलुन सगळे कुमाऊं दाखवुन शेवटच्या दिवशी परत काठगोदामलाच सोडणार होती.
अशा प्रकारे सर्व बुकींग्ज करुन आम्ही ट्रीपसाठी सज्ज झालो.
क्रमश:...
========================
भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६
========================
वाचने
9488
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुमाउंचा नरभक्षक म्हणून
अजून पण असतात का म्हणे हे
In reply to कुमाउंचा नरभक्षक म्हणून by द-बाहुबली
याबाबत पुस्तके उपलब्ध्द नाहीत
In reply to अजून पण असतात का म्हणे हे by असंका
लोकहो, "मॅन इटर्स ऑफ कुमाऊं"
In reply to अजून पण असतात का म्हणे हे by असंका
=))
In reply to लोकहो, "मॅन इटर्स ऑफ कुमाऊं" by डॉ सुहास म्हात्रे
हे लिहितायत ना काय काय.
In reply to =)) by द-बाहुबली
नाही
In reply to हे लिहितायत ना काय काय. by असंका
झक्कास.
छान
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड
के. के.
झक्कास सुरुवात!
छान सुरूवात. पुभाप्र
सुरवात तर चांगली झालीये....
झकास
आत्ता वाचले!