भुईक
"नाकाला नुसती धार लागली हुती, रगात नुसतं ठिबकत हुतं" बापुराव घुश्श्यातचं बोलला.
"आरं पण यवढं झालचं कसं?, लिंब्यानं कायचं कसं न्हाय क्येलं" पाटील पानाचा तोबरा भरत बोललं.
"यका बुक्कीत कुठं येवढं रगात येतं व्हयं, गणा बिना फुटला आसल" चवढ्यावर बसलेला मारुती घाऱ्या डोळ्यांनी बघत बोलला.
"ते काय नाय पाटील पोराचा जीव बीव गेला आसता तर, केवढ्याला पडलं आसतं बोला" बापुराव पेटला.
"येका बुक्कीत जीव जायला त्येच्यात काय आवसानच न्हाय वयं, उग काय बी बोलू नगु , घ्या मिटवा मिटवी करुन" पाटील सामोपचाराचं बोललं.
"आसं कसं मिटवायचं, ह्येच्या नाग्याचं डोस्कं बिस्क फुटलं आसतं तर घीतली आसती का ह्यनं मिटवामिटवी करुन?" बापु
मिसळपाव