Skip to main content

दिवाळीच्या शुभेच्‍छा नकोत

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/11/2015 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे तुम्ही एखाद्या मित्राला दिवाळीच्या शुभेच्‍छा पाठवल्या आणि पलिकडून उत्तर आले की, ‘मला तुमच्या दिवाळीच्या शुभेच्‍छा नकोत’, तर तुमच्या मनाची अवस्था काय होईल? माझ्या मनाची अवस्थाही तशीच झाली. दिवाळीच्या दिवशी मी माझ्या एका मित्राशी संवाद साधण्यासाठी काहीतरी निमित्त म्हणून दिवाळीच्या शुभेच्छांचा एसेमेस इतरांसोबत त्यालाही पाठवला. मित्राचे तिकडून जे उत्तर आले ते वाचून मी हादरलोच. त्याने उत्तराच्या संदेशात म्हटले होते, मी हिंदू नाही. दिवाळी हा हिंदूचा सण आहे. म्हणून मला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ नयेत. बाप रे!

खेळून येतो परत… तेव्हढा नशीबवान आहे अजूनही!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 15/11/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
ये तारा वो तारा हर तारा… देखो जिसे भी लगे प्यारा ये सब हो साथ मे, तो जगमगाया आसमां सारा! जगमग तारे, दो तारे, नौ तारे, सौ तारे, हर तारा ही शरारा… ये तारा वो तारा... अन्वयाला (माझी मुलगी) ऐकवत होतो हे स्वदेस मधलं गाणं... शहारे आले ऐकून आणि बघून ही! त्यात एक पडदा आहे ज्याच्या समोर शारुख नाचत असतो, तोच ज्यावर चित्रपट दाखवतात तो, २ बाजुनी एकच चित्र, पण एक 'मिरर-इमेज' वालं! त्याचवेळी चटकन एक आठवलं, अगदी तसाच प्रकार, लहानपणी गावातल्या शाळेत… सगळे जमायचे, चिंटर-पिंटर पासून आज्या-आजोबा!

२ कविता

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 15/11/2015 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
१...जाताना ऑफिस ला जाताना ऑफिस ला गडबड झाली. घाईत शर्ट ची वरची गुंडी तुटली . सिनेमासारखी सिच्युएशन झाली सुईत ओवत दोरा हि धावत आली . शिवताना गुंडी हि फार जवळ आली. मित्रानो सिच्युएशन रोम्यांटीक झाली. तशीच तिला बाहुपाशात घेतली हाय.....बायको ऐवजी सुई हृदयात घुसली अविनाश .............. २...नाजुक नासिका..गौर गुलाबी वर्ण तेजस्वि नेत्र..लालचुटुक अधर प्रमाणबद्ध बांधा..मोहक चेहरा.. बघताच खुदकन हसली . अन "खट्याळ काळजात घुसली"
काव्यरस

घरच्यांपुरतं वसुधैव कुटुंबकम(?)

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 15/11/2015 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
घरच्यांपुरतं वसुधैव कुटुंबकम(?) " साहेब, आम्ही अोळखतो तुम्हाला. पण मिडियाने व्हायरल केलयं ना..एफ आय आर करावा लागेल. पण काळजी नका करु. अपघात दाखवून हातावेगळं करु. तुम्ही तशी साक्ष द्या आणि मोकळ व्हा. बरयाच वर्षापासुन तुम्ही हे अनाथालय चालवताय. ठिकठिकाणाहुन मिळण्यारया देणगींचा विचार करा. " आवाजाची पट्टी वाढवत तो इन्स्पेक्टर बोलतच राहिला " माझ्यावरही दबाब आहे. रोजच आहे हे माझ्यासाठी. " पवन समोरच्या अनाथालयाच्या पाटीकडे पाहत होता. ज्या रोहितसोबत हे सुरु केलं होतं त्याच्याच आधार अचानक हरपला होता. समोरची पाटी पवनला दिसेनाशी झाली.

पाश - कथा - भाग २

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 15/11/2015 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
पाश - कथा - भाग १ --भाग १ पाश - कथा - भाग २ ---------------------------- -- सदुला यायला अजुन निदान दीड तास तरी लागेल हे ऐकुन राजाभाउंना चांगलाच घाम फुटला .--- राजाभाउ संचित होऊन डोक्याला हात लावुन बसले. तेवढयात त्यांच्या कानावर एक अपरिचित घोगरा आवाज ऐकू आला . " नमस्कार साहेब , या टुरिंग टॉकीजचे मालक आपणच आहात ना ? आपल्याशी थोडं कामाचं बोलायचं होतं " राजाभाऊंनी चमकुन प्रश्नार्थक मुद्रेने मान वर करुन पाहिले . त्यांच्यासमोर एक डार्क शेडचा सुट, बुट , ओव्हरकोट आणि हॅट असा पुर्ण साहेबी पोषाख केलेला एक अनोळखी मनुष्य उभा होता .

"वैनी, पोरगं रडतयं"

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 14/11/2015 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
"वैनी, पोरगं रडतयं" "आरं बसकी थोडं खेळवत त्येला, यीवढी भांडी घासुन हु दी माजी" "आवं पण म्या कायचं क्येलं नाय, तरीबी रडतयं" "तसच करतयं रं, आण की थोडं फिरवुन" "बाला, खुलकुला दीव का तुला" "ई~या, ई~या" "मोठ्या आय पशी न्हीवुन दी रय" "मोठ्या आयं, बाळ रडतयं" "हा~ड, तेव्हड कुत्रं हाण रं, मगाधरनं दारात बसलयं" "च्तु च्तु च्तु, छौ छौ" 'काय जालं आमच्या बालाला, आगं व्हयं, आगं व्हयं, पाजलयं कागं ह्येला?

मिपावर मोबाइलवरून फोटोज कसे प्रकाशित करावेत?

लेखक कंजूस यांनी शनिवार, 14/11/2015 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाइलवरून फोटो अपलोड करणे--- A) गाभा आता अधिकाधिक लोक स्मार्टफोन्स वापरत आहेत आणि त्यातल्या कॅम्र्याने फोटो चांगले येऊ लागल्याने तेच फोटो सोशल साइट्सवर टाकू लागले आहेत.घरातल्या कंम्प्युटरला केबलनेट असली तरी मोबाइल बाहेर नेल्यावर त्याचा वाइफाइ वापरता येत नाही.वाट्सपच्या प्रसारामुळे मोबाइलमध्ये नेट असतेच.फेसबुक अथवा वाट्सपवर आपण फोनच्या मेमरीमधले फोटो थेटच अपलोड करतो.मिसळपाव वगैरे वेबसाइटवर फोटो असे अपलोड करता येत नाहीत.

आदूमामा

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 14/11/2015 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुला म्हणून सांगतो बे आभ्याs, या दारूच्या व्यसनात दोनच स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये आपण दारू पितो, तर दुसर्‍या स्टेजमध्ये दारू आपल्याला. या आदूची पहिली स्टेज तर केव्हाच पार झालीये. आता हि दुसरी कुठवर नेते हे बघायचय." .. कालपरवाच बोलल्यासारखे आदूचे हे शब्द कानात घोळत होते, अन इतक्यात दादरावरचा कोलाहल अचानक शांत झाला. कल्पना असूनही काळजात धस्स झाले. पाहिले तर चार टाळकी आदूच्या घराबाहेर जमताना दिसली. मी काय ते समजून चुकलो. आदू दुसरी स्टेज ओलांडून तिसर्‍या स्टेजला गेला होता. कधीही न परतण्यासाठी, कायमचाच! ***** आदूस !

२२-११-२०१५.....नुलकरां बरोबर ओरिगामी कट्टा...पुणे...

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 14/11/2015 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, दिनांक २२-११-२०१५ रोजी, टिळक-स्मारक-मंदिर,टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे, इथे ओरिगामी कट्टा आयोजीत केला आहे. वेळ सकाळी ११-३० ते दुपारी ४-१५. काही अपरिहार्य कारणामुळे मी येवू शकत नाही. प्रथे प्रमाणे, पुण्यातल्या कट्ट्याबाबत ३-३ धागे काढावे, असे वाटत नसल्याने, वेळ, तारीख आणि ठिकाण सांगीतलेले आहेच.

जंटलमन्स गेम - २ - विझी, लाला आणि सीके

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 14/11/2015 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि भारतीय उपखंडात क्रिकेटचा खेळ आणला तो ईस्ट इंडीया कंपनीच्या गोर्‍या इंग्रज साहेबांनी! भारतीय उपखंडात खेळल्या गेलेल्या क्रिकेटचा पहिला संदर्भ सापडतो तो ईस्ट इंडीया कंपनीच्याच एका रिपोर्टमध्ये. १७३७ मधल्या या रिपोर्टात बडोद्याजवळ कॅम्बे इथे १७२१ पासून इंग्रज अधिकारी क्रिकेट खेळत असल्याचा स्पष्टं उल्लेख आढळतो. पुढे १७८२ मध्ये कलकत्ता फुटबॉल आणि क्रिकेट क्लबची स्थापना झाली. काही वर्षांनीच मद्रासलाही क्रिकेट खेळलं गेल्याचा उल्लेख आढळतो.