Skip to main content

पंख जेधवां फुटतील तेव्हा निर्भय तुम्ही व्हावे

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 20/11/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
आर्किटेक्ट बाप साईटवर कामात गुंग आहे. पदवीधर होऊन नुकतीच इंटर्नशिप संपलेल्या मोठ्या मुलीचा फोन येतो. "बाबा, तुम्हाला आठवतंय का मी पुण्याच्या त्या मल्टीनॅशनल कंपनीत अ‍ॅप्लाय केलं होतं?" "हो, हो," गवंड्याच्या हातातल्या ओळंब्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवत बाबा, "त्याचं काय झालं?" "बाबा, त्यांचं कॉल लेटर आलंय इंटरव्ह्यूसाठी, उघडून पाहिलं तर इंटरव्ह्यू उद्याच सकाळी आहे!" "अरे वा! काँग्रॅट्स! पण बेटा आज तर मी दिवसभर साईटवर अडकलेलो असेन आणि आई तर उद्या रात्रीपर्यंत परत येणार नाहीये नागपूरहून! आज रात्री उशीरा निघुयात आपण दोघे?" "नाही.

इशकजादे – १

लेखक मांत्रिक यांनी शुक्रवार, 20/11/2015 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
जूनचा पहिला आठवडा. पावसाची अजून सुरुवात झालेली नव्हती. गुलमोहराचा बहर देखील ओसरत आलेला होता. तलवारीसारख्या लांब शेंगा कुठे कुठे लटकलेल्या दिसत होत्या. रस्त्यावर देखील ओसरत्या बहरातील लालभडक आणि पांढ-या पाकळ्यांचा सडा पडलेला होता. तो सर्व रस्ताच आता कॉलेजच्या मुलामुलींच्या घोळक्यांनी भरुन गेलेला होता. त्या जिल्ह्याच्या शहरातील हाच काय तो एकमेव हिरवळीचा रस्ता. मुख्य पेठेपासून शहराच्या बाहेरील कॉलेजला जोडणारा. दिवसभर तरुणाईचा उत्साही वावर या रस्त्यावर दिसून येई. कॉलेज सुरु होण्याची वेळ झाली होती. मुलामुलींचे घोळके भराभर पाय उचलू लागले.

यक्षप्रश्न

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 20/11/2015 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
१. गर्द जंगलात निरुद्देश भटकताना पाणी दिसले, तेव्हा त्याच्या काठाशी नकळत विसावले मी. पापणीच्या आतल्या पाण्याला अचानक बाहेरच्या पाण्याची ओढ. मी ओंजळ पुढे करताच कोठूनसा धारदार आवाज आला: “माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याविना पाण्याला स्पर्श करू नकोस. अन्यथा प्राण गमवावे लागतील.” २. महाभारतातील कूटप्रश्न विचारणाऱ्या यक्षाची कथा वाचली होती मी फार पूर्वी, बहुधा त्याचाच वंशज असणार हा! पण आता अशा या सैलावलेल्या क्षणी कोण माथेफोड करणार? आणि ते करून ना काही सिद्ध करायचे होते, ना काही साधायचे होते. प्राण, जीवन क्षणभंगुर आहे हे खरे, पण ते उगाच दुसरे कोणी म्हणते म्हणून विनाकारण उधळून देणेही शहाणपणाचे नाही.

एक मनस्वी अद्वैत

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/11/2015 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक मनस्वी अद्वैत अनुराग कंपनीत कामाला जाताना रोज त्या घड्याळाच्या शो रूम वरून जायचा . काहीवेळा क्षणभर थांबायचाही. ती चकचकीत फॅशनेबल चुटूकशी शोकेसमध्ये ठेवलेली लेडीज घड्याळं त्याला मोहवायची.रागीणीच्या हातावर कुठलं जास्त खुलून दिसेल याचा विचारहि तो करत रहायचा. उद्या त्यांच्या लग्नाला पांच वर्ष होतायतायात. अजून तेच लग्ना आधीचं जूनं घड्याळ ती वापरते . उद्या कोणत्याहि परिस्थितीत लग्नाच्या वाढदिवसाला तिला सरप्राइज द्यायचंच तो मनोमन ठरवतो.

चहावाल्याचे पंख.....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 19/11/2015 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
चहावाल्याचे पंख..... काय करतो? ......... चहा विकतो. किती वर्षे झाली?........ चाळीसेक. वय?...... साठीपार. कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय. कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी. चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला अज्जिबात न पेलवणारा हा परिचय आहे श्री. हरि एम. मोहनन आणि त्यांची पत्नी मोहना यांचा! केरळातल्या एर्नाकुलम् येथे गेली चाळीसेक वर्षे चहाचे दुकान चालविणाऱ्या या दाम्पत्याचे भटकंतीचे वेड कुणालाही आश्चर्य चकित करते. हातात पैसे असूनही कधीही आपल्या गावाशहराची वेस न ओलांडणारे लोक आहेतच!

प्रेम रतन धन पायो

लेखक समीर_happy go lucky यांनी गुरुवार, 19/11/2015 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
करिष्माई निर्माते-दिग्दर्शक सुरज बडजात्या हे नवीन चित्रपट त्यांची आवडती व्यक्तिरेखा "प्रेम" आणि या वेळेस प्रेम च्या भूमिकेत सलमान खान दुहेरी भूमिकेत असल्या तिकीट बारीवर गाजण्याच्या दृष्टीने परिपूर्ण मसाल्या सहित आलेले आहेत. पहिल्या विकेंडलाच गाठलेला शंभर कोटींचा आकडा हा दाखवतो कि जनता आधीपासूनच फक्त बडजात्याच्या करिष्म्यावर विश्वास ठेवून आहे. पण कितीही नाकारले तरी रिपीट ऑडीयंस हि सुरज बडजात्या फिल्मची मागील काहीवेळची बनलेली खासियत या वेळेस कितपत चालते यावर या सिनेमाचे यश अवलंबून असेल.

शिंद्री

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 19/11/2015 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
वाजत गाजत छबिना भाईर आला. तालासुरात अगडबंब ढोल बडवले जाऊ लागले. गुरवानं आईराजाचा जोरदार ऊदोऊदो केला. एका हातानं घंटी वाजवत आन दुसऱ्या हातात पंचारतीचं ताट घीऊन गुरव एकएक पाऊल पुढे टाकत चालला. एवढ्या गर्दीत कोपऱ्या कोपऱ्यातनं कुणाच्याना कुणाच्या अंगात यीव लागलं. हाताची घट्ट तिढी मारुन डोळं गच्च मिटुन नानाप्रकारे थयाथया नाचत गुरवाच्या पुढं ते भर अंधारात जाऊ लागले. त्यांनी ना दगड बघीतला ना धोंडा. आप्तगण त्यांच्यावर फुलं ऊधळत ऊदोऊदो करत राहीले. पालखी जेव्हा पायऱ्यांवरुन खाली मोकळ्या पटांगणात आली तवा आधीच जाळावर शेकलेल्या हलग्या तडातडा बडवल्या जाऊ लागल्या.

शालेय अभ्यासातील आवडता विषय

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 19/11/2015 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा आणि काॅलेजमधे असताना प्रत्येकाचा कुठलातरी एक आवडता विषय असतोच. मला दहावी पर्यंत इंग्रजी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल हे विषय आवडायचे तर ज्युनिअर काॅलेजमधे ईंग्रजीबरोबर अर्थशास्त्र, इतिहास हे विषयही आवडु लागले. गणिताची फारशी आवड केव्हाच नव्हती. संस्कृत हो स्कोअरींग विषय होता. दहावीपर्यंत विज्ञानातही बर्‍यापैकी गुण मिळायचे. तुमचे आवडते विषय कोणते होते / आहेत???

टेडी (भाग-3)

लेखक एकजटा अघोरी यांनी गुरुवार, 19/11/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणार्धात वीणा आणि चव्हाण आवाजाच्या दिशेनं पळत सुटले. हॉलच्या डाव्या बाजूच्या बेडरूममधून आलेला होता आवाज. वीणा झटकन खोलीत शिरली. डाव्या कोप-यात एक जुनं लाकडी कपाट होतं. त्याच्या दरवाज्याशी आतून कुणीतरी झटत होतं. बाहेर यायचा प्रयत्न करत होतं. वीणाने पटकन दरवाजा अगदी जीव खाऊन ओढला. त्यासरशी दिया एकदम बाहेर येऊन फरशीवर पडली. आता तर ती अगदी जोरजोरात रडत होती. अगदी फ्रॅंटिकच झालेली होती. वीणानं तिला उचलून घेऊन थोपटायला सुरुवात केली, तशी ती थोडी शांत झाली. काय झालं असावं ते आता त्यांच्या लक्षात आलं. त्या कपाटात एका कोप-यात एक मळकट टेडी बेअर ठेवलेला होता.

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 19/11/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.