प्रेम रतन धन पायो
करिष्माई निर्माते-दिग्दर्शक सुरज बडजात्या हे नवीन चित्रपट त्यांची आवडती व्यक्तिरेखा "प्रेम" आणि या वेळेस प्रेम च्या भूमिकेत सलमान खान दुहेरी भूमिकेत असल्या तिकीट बारीवर गाजण्याच्या दृष्टीने परिपूर्ण मसाल्या सहित आलेले आहेत. पहिल्या विकेंडलाच गाठलेला शंभर कोटींचा आकडा हा दाखवतो कि जनता आधीपासूनच फक्त बडजात्याच्या करिष्म्यावर विश्वास ठेवून आहे. पण कितीही नाकारले तरी रिपीट ऑडीयंस हि सुरज बडजात्या फिल्मची मागील काहीवेळची बनलेली खासियत या वेळेस कितपत चालते यावर या सिनेमाचे यश अवलंबून असेल. दिग्दर्शकाचे आणि मुख्य अभिनेत्याच्या जोडीचे प्री-इम्प्रेशनच इतके जबरदस्त कि पहिल्या तीन दिवसातच हिटचा दर्जा चित्रपटाने मिळवला पण यशस्वी होण्याचा दर्जा या नंतर सुरु होईल, आणि तो मिळेल का हे अनुभवणे मजेशीर राहील !!!!
सुरज बडजात्याचा सिनेमा म्हणजे पूर्ण शाकाहारी थोडक्यात पूर्ण कुटुंबाला सोबत नेउन देखील कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला आवडेल असे काही ना काही सापडणारा एक दुर्मिळ सिनेमा असे आजवर इम्प्रेशन होते. मैने प्यार किया, हम आप के है कौन, हम साथ साथ है आणि विवाह असल्या एक से एक उत्तम कलाकृती सादर करणारा हा गडी. अर्थात मै प्रेम कि दिवानी हु सारखा अपवाद पण या केस मध्ये हा अपवाद देखील "सन्माननीय अपवाद" आपोआप बनतो.
सलमान खान दुहेरी भूमिकेत आणि त्यातही एक भूमिका राजाची आणि एक त्याच राज्यातल्या प्रजाजनाची. या दोन भूमिकांचा आपसात-सहकलाकारांशी मेळ जमवताना लेखक स्वत:च कन्फ्युज झालाय का अशी शंका प्रेक्षकांना येते. या दोन पैकी एक भूमिका जवळपास तीनही तासभर कहाणीच्या बाहेर असूनही हे विशेष. कहाणीलेखक-पटकथा लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता या चारही महत्वाच्या भूमिकांत सुरज बडजात्याच असल्यामुळे जसे विवाहच्या केसमध्ये उत्कंठावर्धक आणि तारुण्यपिटिकेला गवसणी घालणारी आगळी- वेगळी कथा असली वाहवा त्याने सगळ्या वयोगटातून त्याने मिळवली त्याचप्रमाणे या वेळेस रिपीट ऑडीयंस तर सोडा पण मागील पुण्याईमुळे मिळालेला ऑडीयंसहि छी-थु करेल अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.
लेखकाने cinematic लिबर्टी इत्यादी इत्यादी संकल्पनांचा आधार घेत प्रेक्षकांना गृहीत धरणे हे हिंदी प्रेक्षकांसाठी नवीन नाही पण सुरज बडजात्या सारख्या प्रथितयश (!!!!!!) लेखक-दिग्दर्शकाने प्रेक्षकांना मूर्ख समजण्या इतपत कमतरता ठेवाव्यात याचा धक्का बसल्याशिवाय राहात नाही. जास्त नाही आपण एकंच छोट उदाहरण घेऊ एक राजाच्या कुटुंबातल्या आंतरिक बाबी भलेही बाहेरचा व्यक्ती राजवाड्यात त्यांचा आत्मज म्हणून शिरला तरीही इतक्या सहजा-सहजी बाहेरपर्यंत झिरपाव्यात?? बाकी प्रसंग हि सांगता येतील गृहीत धरल्याचे पण आधीची पुण्याई बघता इतकच सध्या पुरे बाकी बघणाऱ्या प्रेक्षकांनी आपापले ठरवावे.
आलोक नाथ हा सुरज बडजात्याचा लकी चार्म वाटायचा मला कारण त्याच्या गाजलेल्या प्रत्येक सिनेमात तो एक महत्वपूर्ण भूमिकेत होता."मै प्रेम कि दिवानी हु" मध्ये नव्हता आणि असा सिनेमा होता हे कोणाला आठवते का या प्रश्नाच्या उत्तरातच मला असे का वाटते याचे उत्तर आहे का?? या सिनेमातही आलोक नाथ नाही !!!! वास्तविक बघता अनुपम खेरच्या जागी त्याला बसवता आल असत पण.........
मुख्य अभिनेत्री म्हणून सोनम कपूर आहे पण तिला प्रोमोसाठी वापरलेल्या गाण्यात कंबर हलवणे सोडून इतर काही महत्व नाही. सहाय्यक भूमिकेत नील नितीन मुकेशहि आहे पण त्याला तोंडी लावण्यापुरतेही महत्व नाही.
२००६ सालच्या विवाह मध्ये स्व.रवींद्र जैन यांचा म्हणजेच एका मेन स्ट्रीम चित्रपट क्षेत्रात नवीन संगीतकाराचा वापर करून त्यांनी दिलेल्या संगीताच्या बळावर चित्रपट यशस्वी करून दाखवल्या नंतर सुरज बडजात्याची हिंमत वाढली अन या वेळेस त्याने संगीतासाठी चक्क हिमेश रेशमियाचा वापर केला. पण ज्याप्रमाणे रवींद्र जडेजा कितीही फुगला तरी कसोटीत त्रिशतक मारू शकेल का?? यातच जाणकारांना रेशमिया महाशयांना वापरणे योग्य कि अयोग्य समजून जायला हवे.
चित्रपटाला मी अर्धा स्टार देईन अभिनेत्यांच्या मेहनतीसाठी आणि दिग्दर्शकाच्या पूर्वपुण्याईसाठी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
याद्या
7560
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
तो अर्धा स्टार नक्की कशासाठी
राव पदरचे पैसे खर्च केले
In reply to तो अर्धा स्टार नक्की कशासाठी by टवाळ कार्टा
राव ?
In reply to राव पदरचे पैसे खर्च केले by समीर_happy go lucky
श्लेष अलंकार
In reply to राव ? by कपिलमुनी
खिक्क....मला मिपावर्च्या
In reply to राव ? by कपिलमुनी
खिक्क
In reply to राव पदरचे पैसे खर्च केले by समीर_happy go lucky
अन या वेळेस त्याने संगीतासाठी
आणी हो..
In reply to अन या वेळेस त्याने संगीतासाठी by भाऊंचे भाऊ
रविंद्र जडेजाने रणजी मधे दोन
In reply to आणी हो.. by भाऊंचे भाऊ
और ये लगते लगते बचा सिक्सर...
In reply to रविंद्र जडेजाने रणजी मधे दोन by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
१३ १३ १३ सुरूर =))
In reply to अन या वेळेस त्याने संगीतासाठी by भाऊंचे भाऊ
=))
In reply to १३ १३ १३ सुरूर =)) by टवाळ कार्टा
हैला...म्हैत नव्हते मला
In reply to =)) by भाऊंचे भाऊ
निषेध मंजूर आणि दुर्लक्षित
In reply to अन या वेळेस त्याने संगीतासाठी by भाऊंचे भाऊ
मी पण हिमेश रेशम्मियाचा फ्याण
In reply to अन या वेळेस त्याने संगीतासाठी by भाऊंचे भाऊ
डोकं दुखून भणभण पायो
गेल्या आठ दहा दिवसात कट्यार,
एकसे एक उत्तम कलाकृती?
हुर्र
हि म्हण कि काय?? समजल नाही
In reply to हुर्र by याॅर्कर
ते एक गाणं आहे समजा... थिरकता
In reply to हि म्हण कि काय?? समजल नाही by समीर_happy go lucky
गढूळाचं नाय हो. कल्लूळाचं
In reply to हुर्र by याॅर्कर
आजकाल सलमानचे सिनेने पाहणे
सिनेनेच्या जागी सिनेमे असे
In reply to आजकाल सलमानचे सिनेने पाहणे by कविता१९७८
मुळात तुम्ही तो सिनेमा बघायला
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
In reply to मुळात तुम्ही तो सिनेमा बघायला by आनन्दा
याच चित्रपटात आज उनसे मिलना
(No subject)