नव्याने ...
बांधले आहेत आम्ही दोर जगण्याशी नव्याने
रोज घेतो जन्म आम्ही वैर मरणाशी नव्याने
कोरड्या डोळ्यात येथे आग नित्याचीच आहे
जोडले नाते जगाने यार सरणाशी नव्याने
भाकरी किंवा कट्यारी काय निवडावे कळेना
जोडती संबंध दोघी उदरभरणाशी नव्याने
जिंकण्याचे भास होती रोज लढताना स्वत:शी
नाळ जुडता वास्तवाशी, मैत्र हरण्याशी नव्याने
रोज रस्ते शोधतो, वाटा नव्या धुंडाळतो मी
ओळखी होतात तेव्हा मग हरवण्याशी नव्याने
विशाल
काव्यरस
मिसळपाव
“फक्त येते ती आईची आठवण.वाटतं आई असती तर….”
कसलाही विचार न करता मी फळाकडे आकर्षित होत असतो.एखाद्या अननसाच्या तुकड्याला चाऊन खाताना कदाचीत त्यातून निघणार्या गोड स्वादिष्ठ रसाची चिकट धार माझ्या हनुवटीवरून ओघळत असताना वाटणारा आनंद त्याचं कारण असावं.एखाद्या पूर्ण पिकलेल्या लालसर-पिवळसर देवगडच्या हापूस आंब्याल्या पाहून, त्याला नाकाकडे घेऊन,त्याच्या वासाचा दीर्घ श्वास घेऊन,अधीर झाल्याने,त्या आंब्याच्या कापून शिरा न काढता तो तसाच चोखून खाताना,घळघळून निघालेला अमृततुल