कवठी गरगर फिरत होती. टेबलावरच्या ठोकळ्यासारखी. मांत्रिक तिचा वापर ठोकळ्यासारखाच करत होता. पिंपळाच्या झाडाखाली खरच एक टेबल होता. खुर्चीवर खरंच एक मांत्रिक बसला होता. आणि हातातली कवठी खरंच गरगर फिरवत होता. दुसऱ्या हातात पेन घेऊन समोरच्या जाडजुड पुस्तकात अगम्य रेघोट्या मारत होता. बराच वेळ त्याला पडलेले कोडे सुटत नव्हते.
अचानक समोरच्या वाड्यात एक भयचकीत किंकाळी घुमली. दुसऱ्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या खोलीचा दिवाही लागला. हातात त्रिशूळ घेऊन मांत्रिक ऊठला. आणि सावध एकएक पाऊल टाकत वाड्याकडे चालला. गर्द अधारात त्याला काहीही दिसेना. वाड्याच्या आजुबाजूला घनदाट जंगल होते. रातकीडे किर्रर करत होते. अंदाजानेच एकएक पाऊल पुढे टाकत मांत्रिक वरच्या मजल्यावर पोहोचला. कोपऱ्यातल्या खोलीच्या दिशेने भितभीत चालू लागला. जेव्हा तो खोलीसमोर आला तेव्हा दार करकरत ऊघडले गेले. पांढरी साडी नेसलेली एक बाई थरथर कापत कोपऱ्यात बसली होती. केस मोकळे सोडून जमीनीकडे पहात होती. घाबरतच मांत्रिक आत गेला. आणि तिच्या समोरच्या भिंतीला टेकून खाली बसला. त्याने खोलीभर एक नजर फिरवली. तिथे दुसऱ्या कुणाचाही मागमुस नव्हता. मग त्या बाईचे निरीक्षण करत तसाच बसुन राहिला. कितीतरी वेळ. एक अनाम शांतता खोलीभर भरुन राहिली.
"आलास?" या एक शब्दाने शांतता शेवटी भंग पावली. मांत्रिक क्षणभर हडबडला. मग सावरुन घेत कसाबसा बोलला,
"हे ब..ब..बाई, तू क...क..कोण आहेस? आणि ईथं अशी का ब..ब..बसलीयस?"
"काळडोहातल्या निरब्ध शांतरसाचा स्वाद कधी चाखला आहेस का? सगुणांचे निरव हाकारे ऐकुण जीव विटाळुन गेला" अत्यंत गंभीर सुरमय आवाज त्या खोली घुमला.
"म..म..मला नीट समजत नाहीये, त...त...तुला काय म्हणायचेय ते, जरा व...व...व...व्यवस्थित सांगशील का काय ते?" मांत्रिक अजुन तंतरलेलाच होता. धीर एकवटुन कसाबसा संवाद करत होता.
"अतृप्तांच्या जगात वासनांचे वाभाडे, सोकावला काळ मोडशील काय? हरीत श्वापदं घिरट्या घाली, अविचल तरंग निथळशील काय? काय करतोयस ईथे?"
"हा वाडा भुताने झपाटलाय, त्याचाच शोध घेतोय" शेवटचा प्रश्न स्वतःला समजुन मांत्रिकाने एका दमात खुलासा केला.
"मुर्ख. मुर्ख आहेस तू. समोर बसलेली हडळ तुला दिसत नाही काय?"
"क..क..काय मला तर काही द..द..दिसत नाही" ईकडं तिकडं बघून मांत्रिक आत्मविश्वासानं बोलला . हातातलं त्रिशूळ चापचुन तयारीत बसला.
त्या स्त्रीच्या भेसूर हसण्याच्या कर्णकिंकाळ्या वाडाभर पसरल्या. केसांना हिसडा देऊन तिनं त्याच्याकडं रागानं बघितलं. तिच्या चेहऱ्यावर डोळेच नव्हते.
"त्..त्..त्..त्..तुच आहेस तर ती हडळ" बसल्या जागी मांत्रिक थिजुन गेला. पुढे काय होईल या भितीने त्याला दरदरुन घाम फुटला.
"घाबरु नकोस, तुझ्यासारख्या मुर्ख मांत्रिकाला नेऊन मी माझं हसं करुन घेणार नाही, मी विद्वानाच्या शोधात आहे, तू निघ आता" असं म्हणून ती स्त्री अंतर्धान पावली.
मांत्रिकाला झाल्या प्रकारावर विश्वास बसेना. झपाझप पावले टाकत तो वाड्याबाहेर आला.अन पिंपळाच्या झाडाखाली येऊन खुर्चीवर बसला. एका हाताने कवठी गरगर फिरवली. टेबलावरच्या ठोकळ्यासारखी. अन दुसऱ्या हातात पेन घेऊन समोरच्या पुस्तकात त्याने अगम्य रेघोट्या मारणे सुरु केले. त्या पांढऱ्या साडीतल्या स्त्रीने आपल्याला सोबत का नेले नाही याचे कोडे त्याला काही केल्या सुटेना.
वाचने
10298
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
वातावरण निर्मिती झकास पण....
अरे हो, कवटी पाहिजे.
In reply to वातावरण निर्मिती झकास पण.... by मम्बाजी सर्वज्ञ
हम्म..
नै जम्या. त्या बाईंचं बोलणं
ओक्के!मुपीला भेट द्यायला हवी!
In reply to नै जम्या. त्या बाईंचं बोलणं by आदूबाळ
मुपी चा दर्जा खालावलाय.
In reply to ओक्के!मुपीला भेट द्यायला हवी! by जव्हेरगंज
जव्हेर भौ
:) :) मला वाटले मांत्रिक भौ
तडका! तडका मारायचा विसरलो या
In reply to :) :) मला वाटले मांत्रिक भौ by शिव कन्या
मजा नाय,
मलाही तेच वाटले मांत्रिक भाऊ
हेच लिहायला आलो होतो.
In reply to मलाही तेच वाटले मांत्रिक भाऊ by हेमंत लाटकर
ओक्के!
In reply to हेच लिहायला आलो होतो. by उगा काहितरीच
मुपी
काय????? तुम्हाला मुक्तपीठ
In reply to मुपी by पीशिम्पी
अगदी थर्डक्लास लेखन आहे.
पाटिल थोडं दमानं घ्या हो
In reply to अगदी थर्डक्लास लेखन आहे. by धाकलं पाटील
दमदार कथा???
In reply to पाटिल थोडं दमानं घ्या हो by एक एकटा एकटाच
हा हा हा
In reply to दमदार कथा??? by मांत्रिक
अगदी थर्डक्लास प्रतिसाद आहे.
In reply to अगदी थर्डक्लास लेखन आहे. by धाकलं पाटील
तुमच्या कथांसारखा पॅथेटिक? का
In reply to अगदी थर्डक्लास प्रतिसाद आहे. by चांदणे संदीप
मांत्रिकभाऊ...
In reply to तुमच्या कथांसारखा पॅथेटिक? का by मांत्रिक
तुमच्याकडुन पण इतक्या चीप,
In reply to मांत्रिकभाऊ... by चांदणे संदीप
अरे काय??
In reply to तुमच्याकडुन पण इतक्या चीप, by मांत्रिक
शुभेच्छा भंगारलेखन आवडु!!!
In reply to अरे काय?? by चांदणे संदीप
उद्या संदीप चांदणे नावावर कै
In reply to शुभेच्छा भंगारलेखन आवडु!!! by मांत्रिक
अरे वा! हे भारीय!
In reply to उद्या संदीप चांदणे नावावर कै by मांत्रिक
आयला तुमचा आयडी काय कमी टुकार
In reply to अरे वा! हे भारीय! by चांदणे संदीप
मांत्रिक...
In reply to आयला तुमचा आयडी काय कमी टुकार by मांत्रिक
ओ साहेब. मी बंद करतोय मिपावर
In reply to मांत्रिक... by चांदणे संदीप
काय मांत्रिकभौ?
In reply to शुभेच्छा भंगारलेखन आवडु!!! by मांत्रिक
http://www.misalpav.com/user
In reply to काय मांत्रिकभौ? by चांदणे संदीप
That's good for you!
In reply to http://www.misalpav.com/user by मांत्रिक
ओ साहेब. अहो खाली जव्हेरचा
In reply to That's good for you! by चांदणे संदीप
याचं विडंबन येतंय!!!
इतक्या लौकर आलासपण ;)
In reply to याचं विडंबन येतंय!!! by धाकलं पाटील
@मांत्रिकभाऊ,
धन्यवाद. काय समजायचं ते समजलो
In reply to @मांत्रिकभाऊ, by जव्हेरगंज
संदीप चांदणे व जव्हेरगं?, मी
उल्टा चोर...
In reply to संदीप चांदणे व जव्हेरगं?, मी by मांत्रिक
http://www.misalpav.com
In reply to उल्टा चोर... by चांदणे संदीप