Skip to main content

टिटवी, म्हातारी आणि भुजंग

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 03/12/2015 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
तळ्याकाठच्या झोपडीतील म्हातारीचे विहळणे तळ्यावरच्या धुक्याच्या शालीला कापत टिटवीच्या घरट्यात तरंग निर्माण करत होते. भररात्री टिटवीचा भयाण भेसूर सूर अशुभाचे सूर आळवायला लागला. अशुभाच्या सावटाने चंद्र ढगाआड लपला, टिटवीची पिल्ले खाणारा भुजंग अस्वस्थ झाला, टिटवीच्या आकांताने, टिटवीच्या पिल्लांच्या स्पर्शाने विटाळलेली त्याची जीभ, जास्तच वळवळायला लागली. कातडीखालच्या सळसळीने भर थंडीतही भुजंगाचा विस्तव केला, विस्ताळलेला भुजंग, वा-याला चिरत, धुक्याला ग्रासत झोपडीच्या दिशेने सरसावला. टिटवीचा आक्रोश, म्हातारीचे विहळणे थांबले तरच थांबाणार होता. एकाच फुत्कारी दंशाने विहळ्णे कायमचे विरून गेले धूक्यात..

शब्द

लेखक विश्वव्यापी यांनी बुधवार, 02/12/2015 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार , शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार शब्दांनी केले शब्दांना साकार , शब्दांनीच दिला शब्दांना आकार शब्दांची घरटी , शब्दांचा संसार , शब्दांनीच केला शब्दांचा संहार शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी..

धूसर जगात.....!

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 02/12/2015 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
धुकं फार पडलयं. झाडांचे शेंडे त्यातून वरती डोकावतायत. गर्द हिरव्या डोंगरावर हे पांढरट धुकं अधुन मधून पसरलेलं. मी डोंगराच्या माथ्यावर ऊभा आहे. अगदी ऊंच. खाली पसरत गेलेल्या दऱ्याखोऱ्या मी निरखून बघतो. लांबवर पसरलेल्या डोंगररांगा आणि त्यातील धबधबे पाहून मी हरवून जातो. एखादी वाऱ्याची झुळुक अंगावर शहारे ऊमटवून जाते.हा डोंगर चढताना माझी फारशी दमछाम झालेली नसते. या आल्हादायक वातावरणात मी एका दगडामागे लपतो. आणि दूर एखाद्या पायथ्याशी झाडांची हालचाल नजरेने टिपतो. माझ्या हातात रायफल असते. आणि तिचा निशाणा त्या हालचालींवर असतो. एक डोळा बारीक करुन मी नेम धरतो. मला फारसं काही दिसत नाही.

माझा आवडता प्राणी

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी बुधवार, 02/12/2015 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझा आवडता प्राणी फोर्थ च्या टिचरानी मुलींचे एसएज् वाचायला घेतले.विषय होता.माझा आवडता प्राणी .कुणी मांजरावर लिहिलं होतं, एक दोघीनि घोड्यावरहि लिहीलं होतं ,पण बहुतेकिंचा आवडता प्राणी अर्थातच होता कुत्रा.चौथीच्या मुली भाषा विषयाच्या या प्रकारात मोठ्यांची मदत घेतात,हे त्याना नवीन नव्हतं. मात्र मनोगत स्वत: विद्यार्थीनीचं असावं असा त्यांचा आग्रह असे.अनयाचा निबंध तिनं तिच्या शेजारच्या दीदी च्या साहाय्यानं लिहिला होता.तो कुत्र्यावरच होता.तो त्याना खूपच भावला होता.तिनं लिहिलं होतं------------ माझा आवडता प्राणी---- "माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. आमच्या घरी आम्ही एक कुत्रा पाळला आहे.

बॉन्ड जेम्स बॉन्ड -'स्पेक्टर'

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 02/12/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
बॉण्ड चा जनक इयान फ्लेमिंगने बॉण्ड कसा असावा हे त्याच्या पहिल्याच ' कॅसिनो रॉयल' या कादंबारीत दिली होती. त्याचे डोळे नीळे असावे आणि केस मागे बांधलेले असावे असा बॉण्ड त्याने रंगवला होता. काळाप्रमाणे त्यातही बदल झालेत. तसं पाहयाला गेलं 'स्पेक्टर' ब्रिटिश अभिनेता' डॅनियल क्रेग' याचा चौथा चित्रपट पुढच्या चित्रपटात कोणी नवीनच बॉण्ड दाखवणार आहेत म्हणे, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. बॉण्ड चित्रपट म्हणून स्पेक्टर हा ' कॅसिनो रॉयल' आणि 'स्कायफॉल' इतका खास नसला तरी या चित्रपटांचा पुढचा भाग म्हटले तरी चालेल.

कलेजी

लेखक जागु यांनी बुधवार, 02/12/2015 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पाव किलो कलेजी २ मोठे कांदे चिरून ४-५ लसुण पाकळ्या ठेचून २ चमचे आल-लसुण पेस्ट अर्धा लिंबाचा रस (नसला तरी चालेल) पाव चमचा हिंग १ चमचा हळद २ चमचे मसाला किंवा १ चमचा लाल तिखट १ चमचा गरम मसाला २ मोठे चमचे तेल थोडीशी कोथिंबीर चिरून चवीनुसार मिठ पाककृती : प्रथम कलेजी कापून स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला आल-लसुण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून ठेवावा. भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा बदामी रंग येईपर्यंत तळावा. त्यात हिंग, हळद, मसाला घालून कलेजी परतवावी. आता भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेऊन वाफेवर मिडीयम गॅसवर कलेजी शिजू द्यावी. मधून मधून परतावी.

नाखऱ्या

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 02/12/2015 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
नाखऱ्या आमच्यासाठी हिरो होता. होताच तो देखणा . गोरा, उंच, धारदार नाक, डोळे , कुरळे केस.. आणि आम्ही एकजात बावळट. आधी आपल्या थोबड्याबद्दल काय वाटायचं नाही पण सातवी आठवीपासून ते खूपच टोचायला लागलं . आपले केस भलतेच बारीक आहेत, तेल लावलं की एकदम चम्या दिसतो असे अनेक शोध लागू लागले. आणि या सर्व शोधांचा मापदंड होता नाखऱ्या. नाखऱ्या आमच्या जवळच राहत असे . त्याचे वडील बँकेत होते आणि आई प्राथमिक शाळेत शिक्षिका. सुशिक्षित कुटुंब. आमच्या घरी सकाळच्या वेळी भाजीवाल्या येत असत. त्या आधी घरोघर जाऊन भाज्या विकीत आणि नंतर बाजारात विकायला बसत. पण त्या नाखऱ्याच्या घरासमोरून कधी जात नसत.

नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 02/12/2015 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
हरिश्चंद्रगड म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरी . कधीही जा गडावर १००-१५० लोक सापडणारच .ठाणे,पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारा हा गड म्हणजे माळशेज घाटाचा मुकुट मणीच म्हणायला हवा.हरिश्चंद्र गडावर जाणाऱ्या अनेक वाटा आहेत.

सोबत ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 02/12/2015 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"साssलाss ! ही रात्र नेहमी काळीच का असते बे?" वैतागलेल्या सुन्याने एकदाचे तोंड उघडले. "अबे पहाट गुलाबी असते ना, म्हणुन रात्र काळी..., हाकानाका!" पक्या खुसखुसला..... "गपे, उगाच फालतू जोक्स मारु नकोस. साला इथे बुडाला रग लागलीये बसुन बसुन. तुझा तो वाघ काही येत नाही पाणी प्यायला आज. आ़ज दिसायची शक्यता कमीच वाटतेय मला. बहुतेक निर्जळी अमावस्या दिसतेय त्याची." सुन्या करवादला. सुन्या उर्फ सुनील जगताप आणि पक्या उर्फ प्रकाश देशमाने...... दोन जिवलग मित्र! लहानपणापासुन एकत्र वाढलेले, शिकलेले. सुदैवाने नोकरीही एकाच शहरात आणि अजुन दोघेही बॅचलर्स. त्यामुळे प्रत्येक विकांताला कुठे ना कुठे भटकंती ठरलेली.