Skip to main content

माहिती हवी आहे.

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 21/12/2015 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र मैत्रीणीनो, वर्ष अखेर दक्षिण मुम्बईत फिरण्या चा बेत आखला आहे. काही माहिति हवी आहे. १. नेहमिच्या ( गेट वे, घारापुरी) ठिकाणाव्यतिरिक्त काहि हटके ठिकाणे अस्ल्यास माहिति द्या. २. फोर्ट परिसरातिल खादाडी. ३. घारापुरी बोट ची तिकीटे आन्लाइन मिळ्तात? ओनलाइन काढणे आवश्यक आहे? ४. ठाणे स्टेशनवर क्लोक रूम आहे का? याविषयी माहिती हवी आहे. धन्यवाद.

माहिती हवी आहे.

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 21/12/2015 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र मैत्रीणीनो, वर्ष अखेर दक्षिण मुम्बईत फिरण्या चा बेत आखला आहे. काही माहिति हवी आहे. १. नेहमिच्या ( गेट वे, घारापुरी) ठिकाणाव्यतिरिक्त काहि हटके ठिकाणे अस्ल्यास माहिति द्या. २. फोर्ट परिसरातिल खादाडी. ३. घारापुरी बोट ची तिकीटे आन्लाइन मिळ्तात? ओनलाइन काढणे आवश्यक आहे? ४. ठाणे स्टेशनवर क्लोक रूम आहे का? याविषयी माहिती हवी आहे. धन्यवाद.

घोस्टहंटर-५

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 21/12/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
"लेट मी अवेक!" "नाऊ!!!!" मनिष झोपेतून दचकून जागा झाला! 'ती!' "का त्रास देतेय मला?" "आमचं नातं कधीच संपलं,डेथ व्हॅलीमध्ये!" "का तिला परत यायचय?" ह्या विचारासरशी मनिषच्या अंगावर सरसरुन काटा आला! "अशक्य!!!!!" ----------------------- "हेलो आर.एम!" मनिषने समोर बसलेल्या व्यक्तीला अभिवादन केले. "हॅलो सन."ती व्यक्ति म्हणाली. "मनिष तू इथे येण्यास कारणही जबरदस्त असलं पाहिजे." "जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला भेटण्यासाठी लोक कुठलीही कारण शोधतील." "पण तू वेगळा आहेस,मनिष!" "नाही मी वेगळा नाही." "हो तू आहेस." "बरं मला तुमच्या लायब्ररीत एंट्री मिळेल?" "त्यात फक्त दोन व्यक्तींना एंट्री आहे." "कोण?" मनिषने व

यत्नशीलांची कधीही हार होत नाही

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 21/12/2015 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
लाटांना घाबरून नौका पार होत नाही यत्नशीलांची कधीही हार होत नाही छोटीशी मुंगी दाणा घेऊन चालत असते चढते भींतींवर, शत शतदा घसरत असते मनातील विश्वास नसांत साहस भरतो चढून पडणे, पडून चढणे, व्यर्थ होत नाही अखेरीस तिची मेहनत वाया जात नाही यत्नशीलांची कधीही हार होत नाही पाणबुडे समुद्रात डुबकी घेत असतात खोलवर बुडी घेऊनही रिकामे परततात तिथे मोती सहज का सापडत नाहीत ह्या आश्चर्यानेच उत्साह दुप्पट होतो मूठ नेहमीच काही रिकामी राहत नाही यत्नशीलांची कधीही हार होत नाही अपयश आव्हान आहे, स्वीकार करा काय कमी राहिली शोधा, सुधार करा यश मिळत नाही, तोवर झोप सोडा संघर्षाचे क्षेत्र सोडून, तुम्ही पळू नका काही केल्यावि
काव्यरस

रॉकेट मॅन

लेखक निखिलचं शाईपेन यांनी सोमवार, 21/12/2015 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
एकशे वीस माईल्स, म्हणजे १२० इन टू १.६, माईल्स आणि कि.मी.च गणित मांडायची सवय जाण्याचं तसं काही कारण नाही. परत किलोमीटरमध्ये लांबच्या गोष्टी आणीच लांब वाटतात. असो, नासा, केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा - अंतर जवळपास दोनशे किलोमीटर. अरे वोह एडविन ऑल्ड्रिन आ रहे हैं, बुक साईनिंग हैं। आओगे क्या आप ? सुबह साडे नौ से साडे दस तक टाईम लिखा हैं । अगदी परवाच प्रशांतने विचारलं होतं, आणि हो, नक्की म्हणून, लगेच प्लॅनही झाला होता. सुबह जल्दी निकलते हैं, सेपरेट कार्स. सिधे वही मिलेंगे । डन ! मी गाडी बाहेर काढली तेव्हा सकाळचे साडेसात वाजून गेले होते. गुगल मॅप्स पोहोचायची वेळ ९.२५ दाखवत होता.

प्रसन्न सकाळ

लेखक जातवेद यांनी रविवार, 20/12/2015 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ होती वाचत होतो पेपर, हातामध्ये चहाचा कप ग्यालरी माझी चार फुटाची माती भरल्या मडक्यांचे जग एका मडक्यात होती तुळस रांगोळीला केलेला आळस गतलग्नाच्या बांगड्याही तशाच नुकतीच आलेली न्हाउनी उन्हात दुसर्‍या मधील अबोली तर खास खेळवीत होती ओल्या दवास थोडीशी गच्ची बाहेर झुकून रोखवीत होती अगणित श्वास हाय एक होते कोरफड तशात ना रूप सुगंध गणनाही कशात घेतसे कधिमधी आजारी असता औषध म्हणून केवळ लावावयास चौथ्यात असे गोकर्णाची वेल खच्च संपूर्ण गच्चीवर पसरलेली फुले टपोरी दर कोंबानजिक काही परडीत काही राहू दिलेली संपला चहा वाचून झाला पेपर पाण्याचा बंब सोडी गरम हवा उठतच होतो शोधीत कपडा-पंचा आतून आवाज वाजले किती

(नाट्य लिबर्टी)

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 20/12/2015 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
जगावं की मरावं हा एकंच सवाल आहे !! कुणी मिसळ देता का मिसळ ? हो मिसळ... मामलेदाराची चालेल... फडतरेची चालेल..वैद्याची चालेल.. प्रभांची पण चालेल. एका मिसळप्रेमीला तुफानाला कुणी मिसळ देतं का ?मिसळ... एक तुफान … कांद्या वाचून …. तर्री वाचून …. मिसळेच्या मायेवाचून …देवाच्या मिसळी वाचून … गावा गावातून हॉटेलात हिंडते आहे … मिसळ चापताना जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडतं आहे … कुणी मिसळ देता का रे ??? मिसळ ?..तर्रीवाली मिसळ..असा तवंग हवा तेलाचा तर्री वर....पावाच्या लाद्या हव्या.लिंबाच्या फोडी हव्यात...ग्लास भर ताक हवं.....पहिल्या घासात ठसका हवा..मिसळ..हो मिसळ .....कुणी मिसळ देता का रे ???

स्प्लेंडर कंट्री : दि अल्टीमेट डेस्टिनेशन

लेखक विवेक ठाकूर यांनी रविवार, 20/12/2015 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
(पुण्याजवळच्या एका रम्य रिसॉर्टची सदस्यांना ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.) परवा सकाळी वॉटस-अपवर अभिनंदनाचा मेसेज वाचला आणि कळलं की आज लग्नाचा वाढदिवस आहे. अधुनिक युगाला धन्यवाद देत म्हटलं, चला थोडक्यात वाचलो ! अर्धांगिनी नेहेमी प्रमाणे `बघू कधी लक्षात येतंय' अशा मूडमधे स्वयंपाकघरात काही तरी टिपी करत होती. तिला म्हटलं, `आज तुला एक मस्त ऑफर आहे'. `काय?' `चल स्प्लेंडर कंट्रीला जाऊ'. इतक्या स्पाँटेनियस ऑफरला तितकीच उत्साहवर्धक दाद मिळण्याची शक्यता वैवाहिक जीवनात तशी कमीच . पण तिचे अनेकविध सांसारिक प्रश्न, बुद्धिबळाच्या एंडगेमासारखे फटाफट सोडवून, शेवटी होकाराची विजयश्री खेचून आणली.

सिंहलव्दीपाची सहल : १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 20/12/2015 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================= सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...

विश्वाचे आर्त - भाग ७ - 'अ'चेतनापासून 'स'चेतनापर्यंत

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 19/12/2015 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
'नावात काय आहे? गुलाब कुठल्याही नावाने तितकाच सुंदर दिसेल.' असे शेक्स्पीयर म्हणून गेला आहे. पण नावांमध्ये बरेच काही असते. आपण संकल्पनांना नावे देण्यासाठी शब्द वापरतो. या शब्दांचा आपल्या विचारांवर, त्यांच्या मांडणीवर आणि त्यामुळेच आपल्याला जग कसे दिसते यावर प्रचंड परिणाम होतो. आपल्याला पडणारे प्रश्न आपण भाषेतच मांडतो, आणि त्या प्रश्नांच्या आकलनावर आणि आपल्या उत्तर शोधण्याच्या पद्धतीवर शब्दांच्या मर्यादा पडतात. त्यामुळे अनेक संकल्पना त्यांना दिलेल्या नावांच्या खोक्यांत बंदिस्त होतात.