(पुण्याजवळच्या एका रम्य रिसॉर्टची सदस्यांना ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.)
परवा सकाळी वॉटस-अपवर अभिनंदनाचा मेसेज वाचला आणि कळलं की आज लग्नाचा वाढदिवस आहे. अधुनिक युगाला धन्यवाद देत म्हटलं, चला थोडक्यात वाचलो ! अर्धांगिनी नेहेमी प्रमाणे `बघू कधी लक्षात येतंय' अशा मूडमधे स्वयंपाकघरात काही तरी टिपी करत होती. तिला म्हटलं,
`आज तुला एक मस्त ऑफर आहे'.
`काय?'
`चल स्प्लेंडर कंट्रीला जाऊ'.
इतक्या स्पाँटेनियस ऑफरला तितकीच उत्साहवर्धक दाद मिळण्याची शक्यता वैवाहिक जीवनात तशी कमीच . पण तिचे अनेकविध सांसारिक प्रश्न, बुद्धिबळाच्या एंडगेमासारखे फटाफट सोडवून, शेवटी होकाराची विजयश्री खेचून आणली. वि.आ.बुवा नामक एका विनोदी लेखकानं म्हटलंय की रमणी जेंव्हा नको नको म्हणते तेंव्हा तिच्या मनात होकार असतो. अशा थोर विचारांचा मुबलक साठा असल्यानं प्रयत्नात कसूर होत नाही आणि गहन वाटणारे प्रश्नसुद्धा सहज सुटतात. थोडक्यात काय तर एका तासात बुकींग मिळवण्यापासून ते पार कपडे वाळत घालण्यापर्यंत सगळी कामं संपवून गाडीला स्टार्टर मारला. तेवढ्यात जिच्या दर्शनानं मी कायम कृतकृत्य होतो ती रोटीमेकर, साधना लेनमधे शिरत होती. पत्नीनं चेहेर्यावरचा आनंद लपवत अत्यंत गंभीरपणे, आम्हाला कसं अचानक निघावं लागतंय वगैरे सांगून तिला साद्यंत सूचना दिल्या आणि दार उघडून आत बसली. एसी चालू करत तिला म्हटलं
`आयुष्यात असे क्षण अत्यंत दुर्मिळ. आत्ता या क्षणी तुझी जी चित्तदशा आहे त्याला काय म्हणतात माहितीये?'
`काय '?
`निर्वेध चित्तदशा! थोडक्यात, काही क्षण का होईना, तुमचे सगळे प्रश्न सुटलेले असतात. आता घरचे सगळे विचार सोडून तू फक्त सहलीची मजा घे'
आपली मदिरा, आपली मदनिका आणि प्रणय या तीन गोष्टी एकत्र केल्या की हीच दुनिया जन्नत होते असा अनुभव असल्यानं मधे थांबून मदिराकुपी घेतली. आणि असा सगळा माहौल जमवून, पुढच्या एका तासात डेस्टीनेशनला पोहोचलो. तिथे सुहास्यवदनानं निलेश स्वागताला उभा होता.
‘वेल कम टू स्प्लेंडर कंट्री सर !’
स्प्लेंडर कंट्री क्लब हे आर्किटेक्ट इक्बाल चैनीचं अत्यंत मोहक डिजाईन आहे. डोंगराचा एक अतीप्रशस्त प्रभाग घेऊन त्यावर त्यानं फोर लेअर्ड अरेंजमंट केलीये. सुरूवतीला प्रवेश आणि रिसेप्शन, मग काही पायर्या उतरल्यावर अॅडवेंचर स्पोर्ट, तिथून खाली गेल्यावर डायनिंग आणि बेबी पूल, त्याच्या खालच्या लेवलला आकाशाशी संवाद साधणारा दिमाखदार स्विमींग पूल आणि बरोबर खडकवासला धरणाच्या बॅक-वॉटर लेवलला, गेम एरिया. गेम एरियात सिंग-अलाँग कराओके सिस्टम, टेबल-टेनीस, पूल टेबल, कॅरम आणि निवांत बसायला अनेक जागा आणि पहुडायला हॅमॉक्स आहेत. संपूर्ण क्लबचा कोपरान कोपरा वेगवेगळ्या झाडांच्या मोहक लॅंडस्केप्सनी बहरलेला आहे. अगदी सिक्योरिटी गेट पासून ते पार गेम एरिया पर्यंत एकेक स्पॉट निव्वळ जीवघेणा केला आहे. तुम्ही वेळेचं भान शून्य केलंत तर एकेका ठिकाणी तासंतास बसता येईल असा रम्य परिसर आहे.
रिसेप्शनमधून आत आल्यावर दिसणारा नज़ारा
इक्बाल चैनीच्या मोहक डिजाईनची झलक
डायनिंग एरियातून दिसणारं, निवांत पहुडलेलं खडकवासला बॅक वॉटर आणि दूरवर पसरलेले डोंगर. इथे जेवणानंतर किती तरी वेळ आम्ही नुसते शांत बसून असायचो.
अकाशात बादल आणि पाण्याच्या बिछान्यावर आपण असा; आपल्याला आकाशाशी समरूप करणारा स्वीमींग पूल
प्रशस्त प्ले एरिया. इथल्या सिंग अलाँग सिस्टमवर गातांना जो काय माहौल तयार होतो तो अवर्णनीय आहे.
क्लब समोरच्या इस्टेटमधे संपूर्ण डोंगरावर, एक्स्प्रेस हायवेच्या तोडीचा सात किलोमिटर रस्ता आहे. या रस्त्यावर फिरायला जाणं म्हणजे अद्वितीय मॉर्निंग वॉक...किंवा मग चितचोर चित्रपटासारखा इव्हिनिंग प्लेझर
मॉर्निंग वॉकला वहाणारं सुखद वारं. एकाबाजूला डोंगर, दुसर्या बाजूला अथांग पाणी आणि आजूबाजूला चौफेर मोकळं आकाश.
रूम्स क्लबच्या विरूद्ध दिशेला, पण समोरच अत्यंत निवांत वातावरणात आहेत. रूममधे तुम्हाला गर्द वनराईत असल्याचा फिल येतो. तिकडे नेणारा पाथ वे.
रूमच्या बाहेर असा सिटाऊट आहे. इथे सकाळ-संध्याकाळ कॉफी किंवा मदिरास्वाद घेत किती वेळ बसलोयं याचा हिशेब नाही.
दिवसाच्या कोणत्याही वेळी, तुम्हाला एकमेकात मिसळून जायला लावणारी ही रूम !
दुसर्या दिवशी सकाळी कॉफी आणि भन्नाट मॉर्निंग वॉक झाल्यावर पुन्हा कॉफी राऊंडसाठी सिटाऊटमधे बसलो होतो.
`पियू, वन मोर ऑफर फॉर यू'
`आता काय?'
`वी विल एक्स्टेंड द स्टे फॉर वन मोर डे !'
पुन्हा तिच्या निष्कारणाच्या नकारांचं निराकरण करणं आलं. एका मिनीटात आई आणि मुलाला फोन करून सगळं व्यवस्थित चालू असल्याची खात्री करून घेतली, त्यांना प्लान सांगितला आणि फोन तिच्याकडे दिला! जुजबी प्रश्नोत्तरांच्या संवादा नंतर तीनं सुहास्य होकार दिला आणि उभयतांनी स्वर्ग उपभोगायला पुन्हा नव्यानं सुरूवात केली.

वाचने
6148
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही जाहिरात आहे का...
अति सुंदर!छान ओळख!
जाण्यापूर्वी
हेवन हेवन तो हाच असावा!
मला पाण्याचे फोटो आवडले.
'बळी' हा बराच सौम्य शब्द
In reply to मला पाण्याचे फोटो आवडले. by यशोधरा
उत्तम ठिकाण दिसतंय. धन्यवाद..
रंग उडालेले एन्टरन्स गेट
रंग उडालेले एन्टरन्स गेट
तुम्ही छिद्रान्वेशी दिसता.
In reply to रंग उडालेले एन्टरन्स गेट by अभ्या..
रंग उडालेले एन्टरन्स गेट
गेटच्या आत काय असेल अशी
रंग उडालेले एन्टरन्स गेट
अरे किती रंग उडवशील?
In reply to रंग उडालेले एन्टरन्स गेट by अभ्या..
सुंदर ठीकाणाची तेव्हडीच सुंदर
क्या बात है संक्षी.
आस्वाद घेणं काय असतं हे
In reply to क्या बात है संक्षी. by प्रचेतस
आपल्या मताशी सहमत आहे.
In reply to आस्वाद घेणं काय असतं हे by म्हसोबा
चांगलाय की!
In reply to आस्वाद घेणं काय असतं हे by म्हसोबा
म्हणून तर फुकटात खूप छान
In reply to चांगलाय की! by अनिरुद्ध.वैद्य
:D
In reply to म्हणून तर फुकटात खूप छान by प्रचेतस
आणि हे हॉटेल वाले तर दुरची
In reply to म्हणून तर फुकटात खूप छान by प्रचेतस
अगदी अगदी.
In reply to आणि हे हॉटेल वाले तर दुरची by प्रसाद गोडबोले
क्या बात हैं विवेकजी.
धन्यवाद !
In reply to क्या बात हैं विवेकजी. by म्हसोबा
अच्छा हे ठिकाण?
जुनी आठवण
इन्फिनिटी पूल !
In reply to जुनी आठवण by श्रीरंग_जोशी
स्प्लेंडर कंट्री आवडलेल्यांसाठी आणखी काही फोटो
सुंदर फोटो संक्षी सर !
सुंदर रिसॉर्ट, सुंदर फोटो !
अधिक माहिती वाचली. जागेबद्दल
@ गवि
In reply to अधिक माहिती वाचली. जागेबद्दल by गवि
स्प्लेंडर कंट्रीला गेले आहे.
दोघांनीच वीकडेला जावं
In reply to स्प्लेंडर कंट्रीला गेले आहे. by पिलीयन रायडर
सुंदर फोटो.