Skip to main content

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ४

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 22/01/2016 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग | दुसरा भाग | तिसरा भाग या सगळ्या धावत्या कथेला एक साइडट्रॅकही होता. अजून पुढे.... ----------------------------------------------------------------------------------------------- क्रमशः

तो........

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 22/01/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
उदासल्या अंबरी तो कधीचा दाटलेला आसवांत होई रिता परी उरी साचलेला........ लाख अडवू पाही तो या आठवांच्या लाटां ज्या डिवचूनी जाती त्या उध्वस्त तटाला........ उन्हे पेटवूनी गेली त्याची गाफिल स्वप्ने आता उरले ना काही ह्या रात्रीस जाळण्याला..... उतरती सांज बोले सावर रे वेडया ना तिचा दोष काही होता तुच फसलेला......... ती येईल माघारी तुझ्यासाठी एकदातरी का आस ही वैरी झुलवी त्या जिवाला..... बहरला गुलमोहर जेव्हा तिच्या अंगणात निरोपाच्या फुलांनी होता मग तोही सजलेला.........

आरसा हरवेल तेव्हा ये ..

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 22/01/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
आरसा हरवेल तेव्हा ये (चेहरा गवसेल तेव्हा ये) केवढी गर्दी तुझ्याभवती.. एकटे वाटेल तेव्हा ये पोकळी आहे जशी येथे ही तिथे दाटेल तेव्हा ये दाह सोसावा कसा तुजला हा ऋतू बदलेल तेव्हा ये वाहती आहेच ही दुनिया पण कधी आटेल तेव्हा ये.. डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

१०० स्मार्ट सिटी आव्हाने की स्मार्ट नेत्यांची कसोटी

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 22/01/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
कालच म्हणजे २१/१/२०१६ ला चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात स्मार्ट सिटी आव्हाने या विषयावर रोटरी क्लब आयोजीत शिशीर व्याखानमाला यात एक परिसंवाद झाला. आज काल प्रचार नाही तर सर्व व्यर्थ या तत्वावर मोठे वक्ते येऊनही रामकृष्ण मोरे सभागृह अर्धे भरेल इतकी गर्दी दिसली नाही. जे कोणी होते ते सर्व निवृत्त आणि वेळ घालवायचे साधन म्हणुन आलेले. तरुणाई मोजकीच दिसत होती. या परिसंवादात श्री अभय फिरोदीया.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ५ : हेमकुंड साहिब

लेखक आकाश खोत यांनी शुक्रवार, 22/01/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ आदल्या दिवशी वॅलीमध्ये पोहचायला आम्हाला उशीर झाला. मग उशिरामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप कमी वेळ वॅलीचा आनंद लुटता आला. आज वॅलीसाठी ठेवलेला दुसरा (जादा) आणि शेवटचा दिवस होता. त्यामुळे आम्ही आज काहीही करून लवकर पोहचुन जास्तीत जास्त वेळ वॅलीमध्ये काढण्याचं ठरवलं होतं. पण निसर्गाच्या मनात तसं काही नव्हतं. मी आणि अरूप आधी तयार झालो. बाकीच्यांना अजून वेळ लागेल आणि पुन्हा उशीर होईल असं वाटत होतं.

माहिती हवी - माथेरान

लेखक लीना घोसाळ्कर यांनी शुक्रवार, 22/01/2016 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. थोडी माहिती हवी होती. माथेरान ला कुटुंब सहल काढण्याचा विचार चालू आहे. आम्ही 20 ते 25 जण आहोत. शनिवारी जायचे आहे आणी रविवार पुन्हा परत फिरायचे आहे. तिथे राहण्याच्या, खाण्या-पिण्याच्या सोयीबद्दल माहिती हवी आहे. कृपया मदत करा.

एकटेपणाच्या कविता

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 22/01/2016 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
1.. सगळीकडून कोसळतय आभाळ एकटेपणाचे अन ते दडलेत झाडाआड अजाणतेपणाची झूल पांघरून, मी उदासगीत गात प्रकाशकवडसे टिपत रस्ता कापतो जावून येऊन काय त्या सावलीची सोबत. तसं सारं शरीरच भेगाळलयं उन्मादी लस स्त्रवतेयं सगळीकडून, झडत जाणारे सारे अवयव अन् मनाने खचलेला मी सारं सारं सामावून जाव ह्या कराल अंधारात अन् जाणीव उरावी काही नसण्याची. तिनं देलेला डाग आजही चरचरतो मनात जेव्हा काहूर उठते फेसाळण्याचे, ती ढसाढसा रडलीपण होती मला पदराआड घेवून कुशीत असून नसल्याचं ते एकटेपण आजही उठवते झोपेतून, घामेजला मी दचकून पांघरुणात शिरतो, आजूबाजूला कुणीच नसतं ती सुध्दा. विजयकुमार.........

थँक यू मिस्टर ड्रॅगन – 5वा अंतिम भाग

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 21/01/2016 22:59 या दिवशी प्रकाशित केले.

थँक यू मिस्टर ड्रॅगन – अंतिम

दहशतवादी कारवायांमध्ये चिमुरडीही बळी पडत आहे. पाकमधील भूमी स्वकीयांच्या रक्तानेच न्हावून निघत आहे. पेराल तेच उगवते, या न्यायाने पाकने आजवर हिंदुस्थानात ज्या कारवाया घडवून आणल्या, त्याची फळी आता तेथील जनता भोगत आहे. म्हणूनच जनमत क्षुब्ध आहे. पाकमधील अंतर्गत परिस्थितीवर विस्ताराने भाष्य करण्याचे कारण असे होते की, काश्मीरप्रश्न तर पाकला सोडवायचा आहे, पण त्यासाठीचे ठोस कारण काय? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होणार आहे.

थँक यू मिस्टर ड्रॅगन – ४

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 21/01/2016 22:28 या दिवशी प्रकाशित केले.

थँक यू मिस्टर ड्रॅगन – ४

1 एकही गोळी न झाडता तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवला, तर तो जास्त महत्त्वाचा असतो. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकमध्ये ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्या तेथील बदलत्या जनमताची साक्ष देणाऱ्या आहेत. ‘आम्ही आमच्या भूमीवरून कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही, हा पाकचा बचाव देशाची मान खाली घालायला लावणारा आहे. पाकनी आपली विश्वासार्हता पूर्णतः गमावलेली आहे.

'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 21/01/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
धागा शीर्षकातील 'सर्व'-समावेशक हा शब्द सर्व बॅकग्राऊंडचे -कोणत्याही जाती-धर्म-वंशाचे- लोक एकत्र सहभागी होऊ शकतील या अर्थाने वापरला आहे, (सेक्युलर हा शब्द फारच बदनाम झाल्यामुळे तो शब्द टाळला). जसे की वाढदिवस आहे वाढदिवसास निमंत्रितांवर जाती धर्माची पुटे राहत नाहीत. (पंतप्रधान मोदीतर आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीसाठी वाढदिवसाची वेळ वाअरून घेतात) नवीन वर्षाची सुरवात साजरे करणे (जगातल्या कोणत्याही कॅलेंडर नुसार) वस्तुतः निधर्मी असावे. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे सण सुद्धा निधर्मी असतात. फ्रेंडशीप डे सारखी कल्पना सुद्धा एक चांगली कल्पना आहे.