Skip to main content

मदत हवी आहे - मायक्रोव्हेव ओवन खरेदी

लेखक अमृत यांनी बुधवार, 27/01/2016 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपावर वा इतरही ठिकाणी बर्याच पाककृती बघुन करण्याची इछा होते पण बरेचदा काही पाकृ मायक्रोव्हेव नसल्याने करता येत नाहीत. तरी नविन मायक्रोव्हेव खरेदी करण्याचा विचार आहे तेव्हा थोडं मार्गदर्शन मिळू शकेल काय. मित्र परीवारात थोडी चर्चा केली असता अगदी टोकाची मतं ऐकायला मिळालीत उदा. कुणी सल्ला दिला की सोलो प्रकारातील घ्यावा तर कुणी कोन्वेक्शन धेण्याचं सुचविलं.मला खालील शंका आहेत १. कोणता प्रकार घ्यावा. सोलो/ग्रील/कन्वेक्शन? २. कंपन्यांची प्राधान्य क्रमवारी ३. मासिक वीजबिलात किती वाढ अपेक्शित आहे? समजा रोज १५मि वापर केल्यास ४. एकंदरीत उपयोगीता व फायदे/तोटे ५. बजेट - १२ हजार पर्यंत ६.

सह्याद्री वाहिनी वरील नाटकांच्या कार्यक्रमाबाबत

लेखक अभिनव यांनी बुधवार, 27/01/2016 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
१. फार पुर्वी सह्याद्री वाहिनीवर रात्री एक नाटक लागले होते. त्यात नीना कुलकर्णी आईच्या भुमीकेत होत्या. त्यात या आईच्या व्यक्तिरेखेचा आपल्या अंध मुलावरील प्रेमापोटी आंधळे होऊन व अती सुरक्षीत ठेवण्यासाठी त्याला त्याची स्पेस न देणे असा काहीसा प्लॉट होता. हे नाटक कोणते आहे? कुठे मिळेल? २. हे आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपुर्वी सह्याद्री वाहिनीवर असेच एक नाटक लागले होते. तुषार दळवी आणि किशोरी शहाणे होते त्यात.

चंद्रास्तं! - शिवनारायण चँडरपॉल निवृत्त!

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 27/01/2016 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर चंद्रास्तं झाला! कधी ना कधी तरी हे होणारच होतं म्हणा! तशी चिन्हं तर गेल्या वर्षभरापासून दिसत होती. पण तरीही कुठेतरी असं वाटत होतं की हे चंद्राला लागलेलं तात्पुरतं ग्रहण आहे. आजवर अनेकदा अशा छाया-प्रकाशाच्या खेळातून तो तावून-सुलाखून बाहेर पडला होता. त्याला ते अजिबात अशक्यं नव्हतं! प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आजूबाजूला फडफडणार्‍या मिणमिणत्या दिव्यांच्या तुलनेत ग्रहण लागलेला चंद्र कधीही श्रेयस्कर, कारण कधी ना कधी तरी तो छायेतून बाहेर येऊन पुन्हा एकदा तो पूर्ण तेजाने तळपून उठेल अशी किमान आशा तरी करता येते! काळ ही अशी एक गोष्टं आहे जी कधीही कोणासाठी थांबत नाही.

विज्ञान लेखमाला : २ : स्पेस जंक

लेखक Keanu यांनी मंगळवार, 26/01/2016 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
१२ मार्च २००९, पृथ्वीवर नेहमीचाच दिवस. मागच्या पानावरून आयुष्य पुढे चालू. पण दूर.. थेट अवकाशात वेगळंच घडत होतं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अंतराळवीर दैनंदिन दिनक्रमात गुंतलेले असताना, अचानक कंट्रोल रूममधून संदेश आला - "We are having red conjunction!" जे घडतं होतं, घडणार होतं, ती धोक्याची नांदी होती. Red Conjunction - अंतराळात निरुद्देशीय, दिशहीन वेगाने फिरत असलेले धातूचे तुकडे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर आदळले असते, तर त्यातून होणारी हानी अपरिमित होती. Red Conjunction अर्थातच स्पेस जंक - अंतरिक्षातला कचरा. ### दुसरं महायुद्ध संपलं आणि शीतयुद्धाची नांदी झाली.

आपण किती हसतो!

लेखक सुमेध रानडे यांनी मंगळवार, 26/01/2016 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
रोज आपण पुष्कळ हसतो, कधी योग्य कधी वायफळ हसतो. आईच्या भोळ्या प्रश्नावर प्रेमाने हसतो, बाबांच्या लहानशा चुकांवर जोमाने हसतो. मित्रांच्या घोळक्यात एकत्र हसतो, मोबाइल मधे बघून दिवसरात्र हसतो. साहेबाच्या जोकवर टाळी मारुन हसतो, आणि नंतर साहेबावरंच मागे चोरुन हसतो. कधी मोठ्याने तर कधी हळुवार हसतो, एकाच विनोदावर शतवार हसतो. कधी उशिराने तर कधी तात्काळ हसतो, कधी निरागस कधी खट्याळ हसतो. निर्लज्ज होऊन कोणाच्या तोंडावर हसतो, कधी तोंड लपवूनही अनावर हसतो. कधी मोजून मापून कधी मुक्त हसतो, कधी गालातल्या गालात लुप्त हसतो. नावडीच्या व्यक्तीवर पोटभर हसतो, स्वतःवरच्या टिकेवर मात्र वरवर हसतो. कोणाला तरी चि

पॉपकॉर्न ची गरज आहे का?

लेखक सुरवंट यांनी मंगळवार, 26/01/2016 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
पॉपकॉर्न ची गरज आहे का? पॉपकॉर्न म्हणजे 'मक्याच्या लाह्या' असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. लाह्या म्हणजे यात वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे असे सगळेच खमंग दाणे अध्याहृत आहेत. सोबतीला कोक, पेप्सी, वेफर्स असे वेस्टर्न प्रोडक्ट अॉप्शनल आहेत . पॉपकॉर्न गरज पडते(च) का? आणी का पडते? - पहिली गोष्ट म्हणजे खवैय्यांच्या तोंडाला आलेली सपक चव. कित्येक दिवसांत वशाड खायला न मिळाल्याने आलेली हतबलता. रोजचे वरणभात खाऊन चालू झालेले अपचन. यावर ऊतारा म्हणून हे लोक पॉपकॉर्नच्या 'आहारी' जातात. पॉपकॉर्न खाणारे लोक आळशी असतात असा एक समाजमान्य ग्रह रुढ झाल्याचे ऐकिवात आहे.

एका सूर सम्राज्ञीला विनम्र अभिवादन

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 26/01/2016 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
सुमन कल्याणपूर ............ एक अनभिषिक्त सूरसम्राज्ञी. आपल्या अवीट स्वरांनी गेली अनेक दशके भारतीय मनांवर राज्य करणाऱ्या सुमनताई म्हणजे संगीताच्या सम्राज्ञीच! उद्या २७ जानेवारीला त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ! "समाधी घेऊन जाई ज्ञानदेव सोहळा अपूर्व जाहला गे माये " या त्यांनी गायलेल्या गीताने माझ्या बालपणात मला त्यांच्या आवाजाची ओळख झाली.

नवीन सल्लागार व व्यवस्थापक

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 26/01/2016 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना. आज मिसळपाव संबंधीत दोन महत्वाच्या घोषणा करीत आहोत. काही मिपाकरांचे खाते शिस्तभंगामुळे काही काळासाठी गोठवले होते त्यांची खाती आज पुन्हा सक्रिय करीत आहोत. मिपाच्या सल्लागार मंडळात यापुढे प्रा.डॉ. दिलीप बिरूटे, पैसा, आणि आनंदयात्री सहभागी होत आहेत. यांच्या मार्गदर्शनाचा मिपाला आता पर्यंत फायदा झालाय. यापुढील काळात यांच्या सहकार्याने मिपाची प्रगती होईल अशी आशा आहे. यापुढील सहा महिन्यांसाठी मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार प्रशांत यांचेकडे असतील. मिपाच्या संबंधीत कुठलाही व्यवस्थापकीय, धोरणात्मक निर्णय प्रशांत घेतील.

शोषण नाही कोठें ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 26/01/2016 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
शोषण नाही कोठें ? (उर्फ समतेच्या चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या !)
अजून एक प्रश्न म्हणजे शोषण नाही कुठे? आपण आपल्या घरी मरमर काम करणाऱ्या स्त्रियांना किती पगार देतो? रजा देतो? आपण स्वतः जेवढं काम करतो तेवढा पगार आपल्याला हक्क म्हणून हवा असतो पण या अशा स्त्रियांना आपण तसा पगार देतो का? ते सोडा. घरात काम करणाऱ्या आणि खस्ता काढणाऱ्या गृहिणीला काय मिळतं? शोषण तिथेही आहेच. लैंगिक संदर्भ आले की शोषण होतं असं थोडंच आहे? आणि जर हे एवढं सगळं शोषण आपण चालवून घेतो, तर मग पोर्नोग्राफिक फिल्म्समधलं सो काॅल्ड शोषणही आपल्याला चाललं पाहिजे.

रात्र

लेखक आनंदमयी यांनी मंगळवार, 26/01/2016 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
दूरात चंद्रमाचा मधुरम्यसा महाल फिरती सभोवताली तारांगणे विशाल निष्पाप कोवळ्या ह्या गोष्टीत दंगलेली चैतन्य शैशवाचे उधळीत रात्र आली ... तो स्पर्श पावसाळी तो चिंब देह ओला तो केवडा सुगंधी केसात माळलेला तो मोरपीस वेडा भिरभीर होय गाली हळुवार मालवूनी नक्षत्र, रात्र आली ... स्वप्नील लोचनात साचून चंद्रतारे गगनात घे भरारी, जिंकून घे दिशा रे तारुण्य ध्येयवेडे लेवून आज भाळी वाटा नव्या यशाच्या शोधीत रात्र आली ... थकल्या सुन्या दिशा ह्या अन वाट संपलेली आता छटा सुखाची अंतात गुंफलेली अंकूरण्या नव्याने झडुदेत जीर्ण वेली चाहूल शेवटाची मिरवीत रात्र आली... © अदिती जोशी unaadpaus.blogspot.com
काव्यरस