Skip to main content

नवीन सल्लागार व व्यवस्थापक

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 26/01/2016 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना. आज मिसळपाव संबंधीत दोन महत्वाच्या घोषणा करीत आहोत. काही मिपाकरांचे खाते शिस्तभंगामुळे काही काळासाठी गोठवले होते त्यांची खाती आज पुन्हा सक्रिय करीत आहोत. मिपाच्या सल्लागार मंडळात यापुढे प्रा.डॉ. दिलीप बिरूटे, पैसा, आणि आनंदयात्री सहभागी होत आहेत. यांच्या मार्गदर्शनाचा मिपाला आता पर्यंत फायदा झालाय. यापुढील काळात यांच्या सहकार्याने मिपाची प्रगती होईल अशी आशा आहे. यापुढील सहा महिन्यांसाठी मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार प्रशांत यांचेकडे असतील. मिपाच्या संबंधीत कुठलाही व्यवस्थापकीय, धोरणात्मक निर्णय प्रशांत घेतील. नीलकांत येत्या सहा महिन्यांसाठी कामातून रजा घेतोय. - नीलकांत

वाचने 29246
प्रतिक्रिया 69

प्रतिक्रिया

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व पदाधिकार्‍यांना शुभेच्छा! नविन माहिती बद्दल धन्यवाद.

नवीन सल्लागार व व्यवस्थापकांचे अभिनंदन. सदस्यांना परत घेतल्याचा सर्वाधिक आनंद.

In reply to by प्रचेतस

अगदी मनातले. वल्ली मनकवडे आहेत काय याची चौकशी करणे आले. सर्वांना कायम सहकार्य आहे आणि राहिलही.. आनंदीत नाखु

In reply to by सस्नेह

+३

In reply to by प्रचेतस

सदस्यांना परत घेतल्याचा सर्वाधिक आनंद.
ह्याच्याशी पण सहमत. दुरावा संपून जवळीक निर्माण झाली हे महत्त्वाचे. आता लवकरच खरडवही आणि व्यनी ह्यांच्यातील अंतर देखील 'पूर्वीसारखेच' मिटेल अशी आशा करतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ओह्ह... परा....नको नको रे असं "अन्तर" मिटवायला सांगूस्स!!!... आता कुम्पणानेच्च शेत खाल्लं, तर आम्ही पामरांनी कुणाच्या तोन्डाकडे बघायचं? आणि आमची प्रायव्हसी मग आता "प्रायव्हसी" उरणारच नाही रे! अर्रे.. असं अन्तर मिटलं, तर आपण पूर्वी सारख्या व्यनि'तून गुलुगुलु गप्पा कश्या मारणार? आणि आपले सिक्रेट्स कसे शेअर करणार? श्शी बाब्बा.... आता की नै, आप्ल्याला कोड लैन्ग्वैज मध्येच्च्च्च खरडावं लागणार्र!!!!! ;)

सल्लागार व व्यवस्थापक यांचे अभिनंदन व त्यांना हार्दिक शुभेच्छा

गोठवलेली खाती पुनश्च ऊन केल्याबद्दल नीलकांत यांचे आभार. नवीन सल्लागार मंडळास शुभेच्छा. -गा.पै.

... त्यांची खाती आज पुन्हा सक्रिय करीत आहोत क्या बात! भेलकम बॅक :) सल्लागार आणि व्यवस्थापकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

In reply to by नाव आडनाव

अजूनही गोठवलेल्या खात्यांपैकी एक / दोन जणांचं प्रोफाईल चेक केल्या नंतर "You are not authorized to access this page." असा मेसेज येतोय. कोणकोणत्या सदस्यांचं खातं सक्रीय झालंय?

... त्यांची खाती आज पुन्हा सक्रिय करीत आहोत क्या बात! भेलकम बॅक :) सल्लागार आणि व्यवस्थापकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

व्यवस्थापक व सल्लागार मंडळाला शुभेच्छा! गोठवलेले आयडी वितळवल्याबद्दल धन्यवाद! नवीन रसधारा त्यातून प्रवाहित व्हाव्यात हीच इच्छा!! धन्यवाद, Sandy

सल्लागार मंडळांचे नक्की कार्यक्षेत्र काय असते?

In reply to by जव्हेरगंज

एका जिल्ह्यातील तालुक्यांचा आणि त्यांच्या हद्दीतील नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभारावर लक्ष ठेवायचं आणि जिल्हाधिका-यांनी अहवाल मागितला की बंद लिफाफ्यात अहवाल सादर करायचा. नागरिकांना काय सोयी सुविधा द्यायच्या, नवीन योजना राबवायच्या असल्यास मतं व्यक्त करणे, विचारल्यास तड़ीपार करणा-यांची नावं सांगणे, काहींवर चाप्टर केस दाखल करण्याची शिफारस करणे, थोडक्यात तालुका आणि गावपातळीवर चांगल वातावरण कसं राहील हे पाहणे, काही विचारल्यास सल्ला देणे. अजुन बरंच काही. प्रसंग पडल्यास डबल ब्यारलचा उपयोग करणे. इ. इ. खरं तर हाती शस्त्र न घेता युक्तीच्या चार गोष्टी सांगणे हे सल्लागाराचं काम असतं. -दिलीप बिरुटे (सल्ला देऊन गार करणारा ) :)

नवीन सल्लागार व व्यवस्थापकांचे अभिनंदन. सदस्यांना परत घेतल्याचे वाचून आनंद झाला.

गोठवलेली नेमकी कोणत्या सभासदाची खाती वितळवण्यात आली कृपया त्यांची नावे द्य्वावीत बरे होइल. बॅटमॅन यांचे ही त्यात नाव आहे का ?

In reply to by सतिश गावडे

तो दुसरा आयडी खूपच शांत होता पण. ;) बादवे, त्ये दमामि बेणं पण नै दिसलं मधल्या काळात.! परत येणारे का आता मग ?

Somehow had feeling that today banned members will come back. Good News! Welcome Back!

अभिनंदन आणि शुभेच्छा! स्वाती

सल्लागारांचे आणि नवीन व्यवस्थापकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा ! टका आणि बॅटमन , वेलकम बॅक.

सर्व मिपाकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना. सल्लागारांचे अभिनंदन. !!! आता आमचे सरसुद्धा पुन्हा एकदा लिहिते होणार तर. बॅटमन सर हो.

माइ मोड ऑन. हल्ली ज्योती व दिलीप चा दंगा खुपच वाढला होता. आता नविन जबाबदारी मुळे दोघांनाही दंगामस्ती करता येणार नाही असे आमचे 'हे'म्हणाले. माइ मोड ऑफ.

In reply to by मितभाषी

अग्ग मायडे, अग्ग लब्बाडे, कुठे लपली आहेस? तू आल्याशिवाय खरा दंगा कसा सुरू होणार?

नवनियुक्त सल्लागार व व्यवस्थापकांचे त्यांच्या नव्या भूमिकेत स्वागत आहे. परतलेल्या मिपाकरांचेही स्वागत आहे. या प्रकारची कारवाई करण्याची वेळ कमीत कमी वेळा व्यवस्थापनावर येवो ही सदिच्छा!!

स्वागत आनंद शुभेच्छा

नीलकांत आणि इतर मित्र मैत्रिणींना धन्यवाद! प्रशांतला भरपूर शुभेच्छा!