Skip to main content

भूतकाळ सुरु होतो...

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 08/06/2016 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळं आकाश मोकळा तो रस्ता सकाळची वेळ कोवळ्या उन्हाचा तो खेळ सदा सडा प्राजक्ताचा त्यांवर राज्य ते दवाचं कंसात काळजी त्या फुलांची बळी जाई पावली नकळत मागे अंगणात वृंदावनं मुंग्या जणू देती पहारे कधी साखर कधी नारळाचे कधी ताट नैवेद्याचे मागे विहीर दगडी अखंड थंडगार त्यात पाणी काठावर शेवाळं सुंदर जणू सांगे विहिरीची कहाणी गोठ्यात जीव काळे हंबरती तहानेने जोरात साखळी सोडता हळूच वाट जाई थेट हौदात त्यात ठप्प-ठप्प आवाज कधी कैऱ्या कधी नारळ कधी पक्षांचा जीर्ण पानांचा असं शांत ते वादळ अश्या ह्या आठवणी आता झाली ती स्वप्न भूतकाळ सुरु होतो वर्तमान ठेऊन गहाण #सशुश्रीके । ८ जून २०१६
काव्यरस

...आणि मॅनीमल प्ल्यानेटात निवडून येताना .... :( :( :( :) :) :)

लेखक माहितगार यांनी बुधवार, 08/06/2016 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
"आहा लssय भारी, मी उत्तर, दक्षीण, पूर्व आणि पश्चिमच्या मतदारांपासून आभार व्यक्त करण्यास सुरवात करतो. दिस लय महत्वाचे हाएत, मोठ्ठे मोठ्ठे आकडे लागताहेत. :) :) कस्स सांगू तुमच्या पाठींब्यामुळे मला कित्ती म्हणूण अत्यानंद झाला आहे. :) कुण्णीपण विचारही करु शकणार नाही ते तुमच्या पाठींब्यामुळे साध्य होणार हाय. तुम्हाला माहितीए साध्य काय हाय त्ये :) आज राजखारणात नवा इति-हास खेळण्याची वेळ आली हाय. आज राज्या राज्यातून पाठींबा मिळत आहे. कित्ती मस्त वाटतयं कित्ती मस्त वाटतय, :) हो क्की नाही ?

नोकरी : एक सोडणे

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 08/06/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : खाली जे काही लिहिलंय ते गेल्या काही दिवसातले माझे अनुभव आहेत आणि १००% सत्य आहेत. अगदी नावेही बदललेली नाहीएत माणूस जसा जसा मोठा होत जातो, फक्त वयाने नाही , मनाने मानाने आणि पैशाने , तेव्हा स्वतःची काही तत्वे काही नियम स्वतःच तयार करत असतो . समाजाचे नियम असतातच पण काय बरोबर काय चूक याचे , पण प्रत्येकाचा स्वतःचा असा वेगळा हिशोब असतोच. आता तो हिशोब दुसऱ्याला पटतो कि नाही हा नंतरचा मुद्दा. यापूर्वी हा विचार फारसा करायचो नाही , पण गेल्या काही दिवसातले आलेले अनुभव इथे सांगावे वाटले म्हणून हा फाफट पसारा . तर, " बास झालं बाहेरच्या गावात राहायचं नाटक.

ताल व सुसंगती

लेखक वैशाली अर्चिक यांनी बुधवार, 08/06/2016 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाटते लहानपणापासून तालाचे आणि आपले नकळत नाते जुळत असते. बाळाला झोपवताना एका विशिष्ठ लयीत वर खाली होणारी मांडी, अंगाई म्हणताना पाठीवर थोपटताना दिलेला ताल ह्या सर्व गोष्टी बाळाला शांत करतात ह्या त्यातील स्पर्शामुळे व लयीमुळे. बरेचदा मी असे ऐकले आहे की बायकोची झोपमोड होते जर का नवऱ्याने घोरण्याची लय बदलली तर ! काय असतो हा ताल किंवा लय? ज्याला इंग्रजीत आपण rhythm म्हणतो. एका विशिष्ठ वेळेने परत परत होणारी गोष्ट म्हणजे ताल. प्रामुख्याने ह्याचा संबंध आपण फक्त संगीताशीच लावतो. पण असे नाहीये. आपल्या आजूबाजूला हा ताल सगळीकडेच सापडतो. आपल्या छातीत होणारी धडधड ही तालबद्ध असणेच हिताचे असते.

आंबा इडली

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 08/06/2016 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आंबा पाककलाकृतींचा बराच पूर आलाय त्यात माझी ही एक लाट..हमखास यशस्वी कालाकृती. सगळी भाचरुंडं लहान असताना रत्नागिरीला माहेरी गेलं की,न्याहारी ,जेवणात काहीतरी नवं करावं लागायचं.त्याआधी एक ट्रिप आजोळी गुहागरला व्हायचीच.तिथे आंबे महामूर.येताना आंब्या-फणसाची भेट ठरलेलीच. अजूनही माझ्याकडे आजोळाहून आंब्याची पेटी येतेच,गेले तरी आणि नाही गेले तरी. भाचरुंडं माझ्या घरी आली कि मी माहेरी गेले कि माझा खवय्या भाचा मेन्यूकार्ड तयार करत असे,त्यात,सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यांचे बेत ठरवलेले असत.

गिरिस्थानांची सम्राज्ञी ............उधगमंडलम (उटी)

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 07/06/2016 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमची गिरिस्थानांची राणी असलेल्या उटीला भेट देण्याची इच्छा या उन्हाळ्यात पूर्ण झाली.त्याबद्दल संक्षिप्त वृत्तांत देत आहे. काही फोटू जालावरून साभार मैसूर हून बंदीपूर मार्गे निघून आम्ही दुपारी ३ च्या आसपास उटी मध्ये पोहोचलो. बंदीपूर हे कर्नाटकातील व व्याघ्र प्रकल्पाचे ठिकाण आम्ही दुपारी त्या भागात प्रवास करत असलेने आम्हाला फक्त काही सुंदर हरिणांचे दर्शन झाले याशिवाय काही वानरे आणि मोर आणि रान डुक्करे दिसली . बंदीपूर नंतर तामिळनाडू राज्यातील मदुमलाई व्याघ्र प्रकल्पाचा चा भाग सुरु होतो. येथेही आम्हाला काही वानरे (ग्रे लंगूर) दिसली.

खड्डा कोंबडी! (बेगर्स चिकन व्हेरिएशन)

लेखक आनंदी गोपाळ यांनी मंगळवार, 07/06/2016 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
चीनच्या क्विंग डायनॅस्टीच्या काळात म्हणे कुण्या भिकार्‍याने एक कोंबडी चोरली. कोंबडीचा मालक याच्या पाठी लागला म्हणून त्याने ती नदीकाठच्या चिखलात पुरून ठेवली. संध्याकाळी कोंबडीभोवती चिखलाचा गोळा वाळलेला होता, तो याने तसाच कोंबडीसकट जाळात टाकून शेकला. अन नंतर तयार झालेल्या कोंबडीच्या दरवळाने तिकडून जाणारा सम्राट स्वतः आकर्षित झाला, अन त्याने त्या अद्भूत चवीवर खुष होऊन कोंबडी शिजवायची ही पद्धत म्हणे शाही डिश म्हणून जाहीर केली. कोंबडी स्टफ करून, लोटस लीफ मधे गुंडाळून, मग चिखलाचा थर देऊन निखार्‍यात भाजणे ही बेसिक कृती.

न्युयॉर्क शहर व परिसरात मिपाकट्टा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 07/06/2016 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
न्युयॉर्क शहर व परिसरात कोणी मिपाकर आहेत काय ? सद्या न्युयॉर्कमध्ये काही काळ माझे वास्तव्य आहे. शहर व परिसरात मिपाकर असल्यास भेटायला आवडेल. शक्य असल्यास कट्टा करू या. *********************************************

कट्ट्याचा कार्यक्रम

तारीख : १९ जून २०१६. वेळ : सकाळी ११ वाजता. भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ.