रांजण खळगी
पुण्यापासून अंदाजे 80 किमी वर आहे अहमदनगर जिल्हयातील टाकळी हाजी व निघोज हे गाव. आणी ह्या दोन गावांच्या दरम्यान आहेत आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक रित्या तयार झालेली खळगी (रांजण खळगी) ज्याची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहेत. बरीच वर्ष जाऊ जाऊ करत होतो पण इथे जाणे काही होत न्हवते. शेवटी मे महिन्यात अचानक एके दिवशी गेलो बघायला.
शेकडो वर्षे कुकडी नदीच्या पाण्यातून येणारे दगड गोटे ह्या नदीपात्रातील बसाल्ट खडकावरून 'वर्तुळाकार पद्धतीने' फिरल्याने ही सर्व खळगी तयार झाली असावीत असा भूगर्भ शास्त्रन्यांचा कयास आहे. ही क्रिया सतत चालूच असल्याने खळग्यान्चा आकार वाढतच चालला आहे.
मिसळपाव