Skip to main content

रिहॅब चे दिवस भाग ३!!!

लेखक वरुण मोहिते यांनी रविवार, 25/09/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
हडपसर पर्यंत जेव्हा पोचलो तेव्हा जाग आली घरचे दिसत होते ऍम्ब्युलन्स मधून मला आता. मागे गाडीत होते पण बोलायला शुद्ध नव्हती.काही बोलू शकलो नाही. त्या हॉस्पिटलचे २ लोकं आली हाताला पकडल आणि वर नेलं . घरच्यांनी घाईगडबडीत पॅक केलेली बॅग घेऊनही एक जण मागे येत होता.मला एका रूम मध्ये बसवलं..समोर जमलेले ८-१० लोक..मला पाहायला.कोण नवीन बकरा बनला ह्यात सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो.कोणीतरी जेवायचं ताट आणलं .दोन घास खाऊन मी ताट फेकल.अर्वाच्य शिव्या तर चालूच होत्या डॉक्टरांपासून सगळ्यांना.

झपाटलेला ट्रेक

लेखक योगेश आलेकरी यांनी शनिवार, 24/09/2016 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
झपाटलेला ट्रेक जून चा पहिला आठवडा चालू होता. उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु होणार होता. तसे बदलही वातावरणात जाणवत होते. नुकतेच मला वरिष्ठानी नोकरीच्या बंधनातून मुक्त केल्यामुळे वेळ च वेळ होता. भटकायची जणू पर्वणीच. २ दिवस मस्त सह्याद्रीत व्यथित करायचे मनसुबे आखले गेले. डोंगर रंग ठरली. तैलबैला-सवाष्णी घाट- धोंडसे मार्गे सुधागड. ठरलं. जोडीला कोणी मिळालंच नाही, म्हणून नियोजनात बदल नाही. शनिवारी सकाळी सकाळीच मुंबईहुन तैलबैला कडे निघालो, गाडी भांबुर्डयाची होती तिकीट काढताना मूड बदलला व सरळ घनगड ला गेलो.

कास पठार - टोपली कारवी ने बहरले !!!

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शनिवार, 24/09/2016 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
भटकंती दिनांक : 23/09/2016 कुठून आणि कसे : पुण्यावरून बाईक ने सकाळी 7 ला निघालो परत घरी संध्याकाळी 5 ला पोहोचलो. कास पठार बद्दल सर्वानाच माहिती आहे. त्यात नवीन सांगण्यासारखे काही नाही. तुमच्या पैकी काही जण दोन ते तीन वेळा तरी जाऊन आले असतील. पण माझी हि पहिलेच वेळ होती. टी. वि वरील सारख्या त्याच त्याच बातम्या बघून (कास पठार बहरले, कास पठार फुलले) म्हटलं चला आपण एकदा तरी जाऊन यावं. तिथे गेल्यावर काही गोष्टी खटकल्या त्या इथे नमूद करत आहे. 1) पार्किंग व्यवस्था चुकीच्या ठिकाणी आहे. पार्किंग हे प्रवेश करताना गेट जवळ पाहिजे होते.

आमसुलाची चटणी

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 24/09/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक मिपाकर गुरूजी म्हणाले होते जर आपण बाप्पाचे नैवेद्य देतो तर पितृपंधरवड्यात वेगवेगळ्या स्पेशल रेसिपी का नाही देत? मी काल जी चिबडाची कोशिंबीर दिली होती ती आमच्या कोकणात पक्षासाठी केली जाते. तशीच ज्याच्याशिवाय श्राध्द पक्ष पूर्ण होत नाही अशी ही आमसुलाची चटणी! खरंतर आमसुलाची चटणी अतिशय चविष्ट असते, ती इतरवेळी का करत नाहीत कोण जाणे.

ईती स्थितप्रज्ञ लक्षणं – स्थितप्रज्ञम - इदं न मम !!

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी शनिवार, 24/09/2016 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
स्थितप्रज्ञ म्हणजे काय याची अनेक लक्षणं वेळोवेळी संत-महात्म्यांनी सांगून ठेवलेलीच आहेत. आता मी सांगतो (म्हणजे मला पहा फुलं वहा). तर.. जसा जसा मानव “डार्विन काकांनी” म्हंटल त्या प्रमाणे उत्क्रांत का काय ते होत गेला , तशी तशी त्यातली स्थितप्रज्ञ लक्षणं पण बहुदा बदलायला लागली. सबब , कलीयुगातले स्थितप्रद्न्य म्हणजे एक वेगळी जमातच आहे महाराजा !!
चेहऱ्यावरी मंद भावे , निवांतपणे जो कान खाजवे , ना कोणाशी हेवे दावे , तो एक स्थितप्रद्न्य !!
ई.स. २०१६ संत ज्याक (ग्रंथ-ज्याकाई मधून) (म्हणजे मीच्तो) तर मी आणि असे स्थितप्रज्ञ , आमचं अन यांचं फार जुनं नातं आहे.

घरगुती विजपुरवठा, वापर आणि उपकरणे

लेखक कंजूस यांनी शनिवार, 24/09/2016 10:43 या दिवशी प्रकाशित केले.

राया...

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 24/09/2016 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
राया... मखमली मंचकी पसरली, मखमली काया, नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥ करून बसले मंचकी थाट किती दिवस पाहिली वाट उगवेल आता चैत्री पहाट सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट अत्तराच्या लावल्या या समया नका सोडून जाऊ.... ॥१॥ ल्याले शालू भरजरी देह झाला आज शेवरी ठेवा बाजूला तुम्ही शेला घ्या अलगद कवेत मजला जाईल ज्वानी माझी वाया नका सोडून जाऊ.... ॥२॥ राजेंद्र देवी

परिभ्रमणे कळे कौतुक (भाग १) : रोमांचक रोम

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 23/09/2016 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षांत झालेल्या भटकंतीत मला भावलेली, कॅमेऱ्यातून क्लिकलेली काही दृष्ये या लेखमालिकेत देण्याचा विचार आहे. सुरुवात रोम पासून करतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरात रोम बघायला जायचे ठरल्यावर रोममधील सुप्रसिद्ध ठिकाणांखेरीज काही जुने व्हिलाज , टायबर नदीच्या पलिकडला भाग, जुनी चर्चेस, व्हॅटिकन संग्रहालय , रोममधील जुन्या वस्त्या वगैरे सर्व फिरायला किमान पाच दिवस तरी हवेत असे वाटून airbnb.com मधून रोमच्या मध्यवस्तीतले एक घर आरक्षित करून आम्ही रोमला पहुचलो.

शिंगूळबाबूंची बंबुळभेट

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 23/09/2016 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
"बंबुळ्याला जायची यीश्टी कदी हाय वं?" वायरीची पिशवी हातात घीऊन मी बसलू हुतू. ऊन नुसतं कावत हुतं. येक जीपडं रस्त्यावर नव्हतं. पिपरणीखाली दोन करडं चरत हुती. तिकडंच बघत हुतू. "आत्ताच गीली की तुज्या म्होरनं" भजी तळत त्या आशोक सरापानं सांगितलं. म्हजी ह्यो हाटीलवाला दिसतू आशोक सरापासारखा म्हणूनशान. "आता दिड वाजोस्तोर येश्टी न्हाय रय" आशोक सरापानं यकदम येडझव्यासारखं माज्याकडं बघितलं. मी आपला पिपरणीच्या करडाकडं बघत ऱ्हायलू. तेज्यायचा दाणा येश्टी आपल्या म्होरनं गीली तरी दिसली न्हायी. पाचूट पेटल्यावनी ऊन पोळत हुतं. लय भजी खाव वाटत हुतं. पण न्हायतं खाल्लं. च्या बी लय पीव वाटत हुता. पण न्हाय पिला.