Skip to main content

गोष्ट एका लग्नाची ...

लेखक पियुशा यांनी बुधवार, 09/11/2016 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट एका लग्नाची ... निंबाच्या सावलीत म्हातारबा म्हंजी माझं आजोबा , गावातल १-२ भावकीतील पांढरे टकुरे मी सोत्ता न माझा एक मित्र अशे आम्ही ४-५ जण यष्टीची वाट पाहत थांबलो होतो ,आता का बर? असा प्रश्न पडलंच तुम्हाला. तर म्याच सांगतो पैलेच, तर तर .. आम्ही चाल्लो होतो पोरगी पहायला !!!! माझ्याचसाठी :) त्यात आमच्या गावातल्या यष्टीचा कारभार बेभरवशी, आली तर आली नई तर नई. माझा तर डोळाच नई लागला रातभर जेव्हा आज्यानी सांगितलं , " पम्या उद्या आपल्याला पोरगी पाह्याला जायची बरं का तुह्यासाठी" ऐकून मला आधी भ्यावच वाटलं होत. आजवरचा मह्यावाला इतिहास बघता पोरींचं न माझं काय इशेष जमत नव्हतं.

ती....

लेखक Jabberwocky यांनी बुधवार, 09/11/2016 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
ती फुलंराणी, सुगंध वेचणारी. ती स्वच्छंदी, आनंद उधळणारी. चंद्रताऱ्यांचं वेड तिला, ती माझं आभाळ उजळवणारी. ती पणती, अंधार गिळणारी. ती अबोली अबोल, पण मनातले भाव टिपणारी. ती थंड झुळूक वाऱ्याची, नभाला पाझर फोडणारी. ती मोती शिंपल्यातला, ती अथांग सागर प्रेमाचा, ती गुलमोहर, ती रानफुलं, ती सोनाली, ती सोनफुलं..... (Dedicated to my wife)

काटा रुते कुणाला…..भाग ५

लेखक Jabberwocky यांनी बुधवार, 09/11/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
काटा रुते कुणाला…..भाग ४ http://www.misalpav.com/node/37957 सकाळी केंव्हातरी मी जागृती अवस्थेत आलो. घड्याळाकडे पाहिलं सकाळचे 9 वाजले होते. शनिवार असल्यामुळे काही करण्यासारखं नव्हतं. मी पुन्हा तसाच डोळे झाकून पडून राहिलो. जाम थकवा जाणवत होता. शरीराला नसले तरी मनाला श्रम घडले होते हा त्याचाच परिणाम. थोड्यावेळाने आई मला उठवायला आली. तिने तिचा हात माझ्या कपाळावर ठेवला. काय करतेयस? मी म्हणालो. तुझा ताप गेला की नाही पाहत होते. आई पण मला नाहीये ताप. मी अरे आत्ता नाहीये पण गेले दोन दिवस तापाने नुसता फणफणला होतास. आई. काय?

।। भटकंतीची पूर्व तयारी ।।

लेखक योगेश आलेकरी यांनी बुधवार, 09/11/2016 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
।। भटकंतीची पूर्व तयारी ।। प्रागैतिहासिक काळात शेतीचा शोध लागला आणि माणूस भटकंती सोडून स्थिर झाला, पण प्रगत काळात मानवाला पुन्हा भटकंतीचे वेध लागले. या मधल्या काळात भटकंती या विषयामध्येही बरीच स्थित्यंतरे झाली व भटकंती किंबहुना ट्रेकिंग हा शब्द परवलीचा झाला किंवा हा एक छंद म्हणून नावारूपास आला. निसर्गापासून दूर गेलेला मानव या निमित्ताने पुन्हा निसर्गाकडे वाळू लागला, यातून आनंद मिळवू लागला. आता भटकंती करणे म्हणजे डोंगर, दऱ्या, पर्वत, नदी, नाले ,गावे, शहरे, विविध ठिकाणे, प्रांत सर्व सर्व आले.

शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे शीर्षक गीत

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 09/11/2016 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा शिवरुद्र ढोल ताशा पथक फेसबुक पान ढोल-ताशे हा विषय जरी मिपावर ज्वलंत मानला गेला असला तरी काव्य, संगीत या विषयांचं तसं नाही :) या भावनेतून हा धागाप्रपंच. आपल्या शब्दांनी सुरांचा अंगरखा आणि स्वरांचा मुकुट घातलेला बघून अतिशय आनंद होतो.
काव्यरस

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

लेखक ट्रेड मार्क यांनी मंगळवार, 08/11/2016 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे.

अंबरनाथ ते कल्याण-माझा पहिला लोकल प्रवास

लेखक महामाया यांनी मंगळवार, 08/11/2016 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
(रेस-पार्ट-टू) ‘तिकिट...’ ‘दादा जवळ मागच्या डब्यांत आहे...’ ‘फर्स्टक्लास चं आहे कां...?’ ‘सॉरी, मी मध्यप्रदेशातून आलोय, मला माहीत नव्हतं की लोकल मधे देखील फर्स्टक्लास असतो...’ ‘पकडलं गेल्यावर लोक असंच काहीतरी सांगतात...’ ------------- वराती सोबत पुण्याहून परतलो...त्या लग्नाची पार्टी रात्री साडे बारा ला संपली. घरी येऊन झोपलो तर दीड वाजला होता. सकाळी नवरया मुलाच्या मोठ्या भावाने मला उठवलं, म्हणाला-‘चल, राम काकांना स्टेशनपर्यंत सोडून येऊं. तू साइकिलीवर त्यांची सूटकेस ठेवून घे.’ मी तसाच पैंट-शर्ट घालून निघालो. पर्स बैग मधेच राहून गेली (त्यांत रेलवेचा फ्री पास होता).

!! माझ्या सवता !!

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 08/11/2016 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुख आणि दुःख, या दोघी दिव्य कांता, माझ्या एका छताखाली, सवे नांदतात आता !!१!! सुख थांबता थांबेना, दुःख वीरता विरेना, दोघी जन्मांच्या सवती, काही केल्या ही जमेना !!२!! सुख - माझी लडीवाळी, मात्र ऐट तिची भारी, नित्य शालू तिच्या अंगी, लोकांची रांग लागे दारी !!३!! दुःख - माझी अर्धांगिनी, तीच एकटी माझ्या उराशी, तिचा एक साडीचा संसार, जशी स्वतःघरी दासी !!४!! सुख - जेव्हा आली माझ्या घरी, साजरे झाले मोठे सण, वायू गेली माझ्या शिरी, अंगी आले मोठेपण !!५!! दुःख - जेव्हा आली ती नांदाया, काळ होता तो कठीण, धुंदी डोळ्यातली गेली, तेव्हा आले मज जाण !!६!! दोघे प्राणवायू माझे, नच कर्मे त्यांच्या वाचून, असे समान
काव्यरस

डी फॉर डान्सबार (१)

लेखक वरुण मोहिते यांनी मंगळवार, 08/11/2016 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
तर ती मला भेटली. असं कधी झालं नव्हतं.म्हणजे विचार करणारे माझे कित्येक मित्र घाटावरून उतरून यायचे खाली पनवेलला. पण मी नुसता टाईमपास करायचो. पार सोलापूर मोडनिंब पासून ते लातूरच्या पुढे. बारीच्या कहाण्या अजून वेगळ्या, सांगेन ती गम्मत. बाकी असं कसं होऊ शकत असं नेहमी वाटायचं. कारण (तिथे) गेलो तरी माझं माझ्या बायकोवर होणाऱ्या जीवापाड प्रेम.. मी बोलू पण शकणार नाही तिला सोडून कुठल्या मुलीशी, अशी परिस्थिती. पण झालं. थोडे पैसे उडवल्यावर ती मला मॉल मध्ये भेटली. नुसती चॉकलेटचं माझ्या भावाला आवडतात म्हणून २-३ हजारांची घेतलेली. बाकी खरेदी तर विचारू नका. पण मला तेव्हापण चाललं. घे हवा ते.

काटा रुते कुणाला…..भाग ४

लेखक Jabberwocky यांनी मंगळवार, 08/11/2016 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
काटा रुते कुणाला…..भाग ३ http://www.misalpav.com/node/37949 आई नेहमी मला आणि रेवाला अशीच चिडवत असे. तिलाही रेवा फारच आवडत असे. का नाही आवडणार रेवा होतीच तशी. ती ज्यांच्या संपर्कात येत त्या लोकांवर तिच्या व्यक्तित्वाची अशी छापच पडायची. या क्षणी मला रेवाशी बोलायचं नव्हतं पण आईसमोर असल्यामुळे मला तिच्याशी बोलणं भाग होत. मी बाहेरच्या हॉल मध्ये जायला निघालो तशी आई म्हणाली व्यवस्थित बोल तिला. कदाचित आईने ओळखलं असावं कि माझं डोकं बिक काही दुखत नाहीये आणि हे काहीतरी वेगळं दुखणं आहे. मी हो म्हणालो आणि हॉल मध्ये आलो. मी रिसिव्हर कानाला लावला. हॅलो.