Skip to main content

गोष्ट एका लग्नाची ...भाग -२

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 15/11/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट एका लग्नाची ..... गोष्ट एका लग्नाची ... भाग - २ बस्ता न खस्ता... लगीन घर म्हनजी आठवडेबाजार पेक्षा कमी नसतंय ,कोण काय बोलतय काय सांगतय कैच ताळमेळ नसतोय काम करणारे ४-५ न उंटावरून शेळ्या हाकणारे बाकी समदे :) सकाळी सकाळी २ जीभडे दारासमूर येऊन उभे राहिले आज बस्ता मह्यावाला :) रातीपासून बाया- बापड्यांची कलकल ऐकून माझं डोकं ठणाणा वाजत होत."निस्ता पसारा करून ठेवलाय घरभर , बबन्या ,अरे गोधड्यांच्या वळकुट्या कर की पाहत काय बसलाय , न तुमी दोघी जरा कौशीला मदत करा का निस्त्या हिंडताल इथून तिथं न तिथून हिथं!

लग्न कशासाठी

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 15/11/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीच्या काळी एकदा लग्न झाले की ते आयुष्यभर टिकवावे लागत असे. लग्न ही संस्था वास्तविक जीवनातल्या काही गरजा भागवण्यासाठी निर्माण झाली, अनेक गरजांपैकी महत्त्वाची एक गरज शारीरीक होती. पण हे लक्षात न घेता लग्न हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला गेला. एखाद्याचे लग्नच झाले नसेल तर त्याच्याबद्दल फार विचित्र मते व्यक्त केली जातात, याच्यात काहीतरी कमतरता असली पाहीजे असे बोलले जाते. स्त्रियांना तर बिन लग्नाचे राहण्याची परवानगीच नाही. "आई" होण्या मधेच तिच्या जन्माचे सार्थक आहे. आता आई ही जगातली सर्वात महान गोष्ट आहे. आई होण्यासाठी आधी कुणाची पत्नी झाले पाहीजे.

पाश्शेहजाराच्या गोष्टी: २. नोट

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 15/11/2016 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टी तशी थंडी अजून जोरदार पडत नसली तरी नोव्हेबरमध्ये सकाळी सहाची वेळ म्हणजे थंडीची वेळ. नाशिककडं जाणा-या एसटी बसमधले प्रवासी खिडक्या बंद करून बसले होते आणि बरेचसे झोपेत होते. सोमवार सकाळची बस म्हणजे दोन दिवस पुण्यात येऊन परत जाणारे कॉलेजचे विद्यार्थी, काही बँकवाले आणि कंपनीत काम करणारे काही नोकरदार लोक, काही सरकारी कर्मचारी. त्यांच्या बसायच्या जागाही ठरलेल्या. बसचे चालक-वाहक ठरलेले त्यामुळे तसे सगळे चेह-याने एकमेकांना ओळखतात, काही नावानिशीही ओळखतात हे “ते आले बघा पाटील साहेब, चल आता” असं वाहक चालकाला म्हणाला त्यावरून लक्षात आलं.

...मग असे द्या पैसे!

लेखक निनाद यांनी मंगळवार, 15/11/2016 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या. तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे!

कट्टा

लेखक अभिजित कुमावत यांनी सोमवार, 14/11/2016 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
कट्टा हा शब्द बहुतेक करुन पुणेरिच. कट्टा जिथे अनेक मित्र एकमेकांना भेटतात. जिथे अनेक नवीन मित्र भेटतात, अनेक व्यक्ती भेटतात. कट्टा म्हणजे एक ठिकाण जिथे सगळ्यांना काही वेळ घालवावा असे वाटते. ईथे बऱ्याच चर्चा रंगतात. कुठलाही विषय पाहिजे असा नाही, बास सोबात कोणीतरी असावे एवढच. कट्टा म्हणजे अशी कुठली जागा fix नाही. एखाद hotel, टपरी, cafe, चौक, पार, ground, अगदीच देऊळ सुद्धा. सर्व मित्रांना योग्य अणि सोईस्कर वाटणारि एक जागा. एक मात्र नक्की कट्याची सवय ज्याला लागते त्याला ती सवय सहजा सहजी काही सोडता येत नाही. कट्टा ही जागाच अशी. इथले विषय सन्दर्भ धरून असतीलच अस नाही.

कल्पनेचे महेर

लेखक कवि मानव यांनी सोमवार, 14/11/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही रात्री, मी झोपलोच नाही, उजेड लोचनांचे, कधी संपलेच नाही, हे देह फार क्षीणले, जाड पापण्या तरी ही, ते....स्वप्न दिसले, जे पाहिलेच नाही !!१!! त्या लक्ख प्रकाशात, गूढ अंधार होते, कल्पनेचे ते महेर, बहुत दार होते, दर्या, पर्वतांना ओलांडून पोचलो तर, ते शब्द कानी पडले, जे ऐकलेच नाही !!२!! ती पाहुनी पुण्यभूमी, मी जाहलो कृतार्थ, सहवास दिग्गजांचा, सह शारदेची साथ, कर जोडता तयांना, जी लागली समाधी, असे काव्य सुचले, जे वाटेलच (लिहिलेच) नाही !!३!!
काव्यरस

वस्तू

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 14/11/2016 17:13 या दिवशी प्रकाशित केले.

गट्टे के चावल : खास मारवाडी पेशकश

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 14/11/2016 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
अस्मादिकांचे सासर मारवाड प्रांत राजस्थान येथे असून जातिवंत खवय्ये लोकांचा हा भाग आम्हाला साहजिकच एकदम आवडतो, त्यात जावईबुआ (स्थानिक भाषेत पावणेसा) म्हणजे आम्ही जरा जास्त स्पेशल असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर नाश्त्याला प्याज कचौरी अन काजूकतली असले मजबूत आयटम ते डिनरला खास मारवाडी गट्टे के चावल अन कढी हे प्रकार व्हाया लंच मध्ये तुपात पोहणारी दलाबाटी-चुरमा, बिकानेरी भुजिया सब्जी, पापड सब्जी असे सगळे असते. मारवाडी + जैन संस्कृती त्यातही १२ महिने कांदा लसूण न खाणारे बहुसंख्य लोक आजूबाजूला असणे ह्यामुळे मारवाडी जेवणात कांदा लसूण अजिबातच नसतो किंवा फार कमी असतो.

(पडुन आहे नोट अजुनी)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 14/11/2016 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
पडुन आहे नोट अजुनी, राजसा थकलास का रे? एवढ्यातच रांग सोडुन, तू असा बसलास का रे? अजुनही सरल्या न गड्ड्या, त्या हजारापाचशेंच्या अजुन बँका सरल्या कुठे रे, हाय तू हरलास का रे? सांग, नोटा शोधणाऱ्या पंटरांना काय सांगू? उगवले एजंट सारे, आणि तू निजलास का रे? बघ तुला दिसतील नंतर मॉरिशसच्या चोरवाटा गोरगरिबांच्या अकाउंटांस वापरलास का रे? उसळती खोक्यांत साऱ्या पाचशेच्या बंद नोटा आयटीच्या रेडला तू आज घाबरलास का रे? - स्वामी संकेतानंद

मनाच्या खिशात...

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 14/11/2016 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थकांच्या देशात सर्वत्र मंगल वातावरण आहे, प्रत्येक माणूस अतिशय आनंदात आहे, देशप्रेमाची लाट आहे, विजयाचा जयघोष आहे! विरोधकांच्या देशात लुटालूट, दंगे, अराजक माजलय, लोक मरत आहेत, पोरं उपाशी, रुग्ण रस्त्यावर आहेत, सर्वत्र फक्त आक्रोश आहे! आपण आपलं चाचपून बघावं, खिशात किती कॅश आहे, मनात किती संतोष आहे, किती असंतोष आहे!
काव्यरस