(पडुन आहे नोट अजुनी)
लेखनविषय:
काव्यरस
पडुन आहे नोट अजुनी, राजसा थकलास का रे?
एवढ्यातच रांग सोडुन, तू असा बसलास का रे?
अजुनही सरल्या न गड्ड्या, त्या हजारापाचशेंच्या
अजुन बँका सरल्या कुठे रे, हाय तू हरलास का रे?
सांग, नोटा शोधणाऱ्या पंटरांना काय सांगू?
उगवले एजंट सारे, आणि तू निजलास का रे?
बघ तुला दिसतील नंतर मॉरिशसच्या चोरवाटा
गोरगरिबांच्या अकाउंटांस वापरलास का रे?
उसळती खोक्यांत साऱ्या पाचशेच्या बंद नोटा
आयटीच्या रेडला तू आज घाबरलास का रे?
- स्वामी संकेतानंद
वाचने
9391
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
लोल विडंबन! आवडले!
Sandy
असंवेदनाशील बुर्झ्वा कवी कुठला! तुमचे दिल्लीश्वर मुख्यमंत्री बघ लोकांच्या दु:खाने कसे कळवळत आहेत ते! नाहीतर तू!! =))
In reply to असंवेदनाशील by पैसा
स्वाम्याला दिल्लीत तिकिट देणार नाहीत "आप"ला समजून.
बाकी विडंबन, मस्तच
स्वगतः(बुवा कसे नाही आले अजून धाग्यावर)
In reply to त्यामुळेच by नाखु
आम्हीच पार्टी काढणार आहोत. तुम्हाला तिकीट पाहिजे तर हळूच सांगा आधी.
In reply to आम्हीच पार्टी काढणार आहोत by पैसा
सगळे डोनेशन online भरायचे. ;)
In reply to सगळे डोनेशन online भरायचे. ;) by स्वामी संकेतानंद
म्हणजे नोटांचा प्रश्नच नाय!
मस्त जमलीये...
स्वामी तिन्ही जगाचा नोटेविना भिकारी!
मीटर गंडलं, अन्यथा उत्तम.
In reply to मीटर गंडलं, अन्यथा उत्तम. by सूड
एका जागी 2 मात्रा जास्त पडल्याचे लक्षातच आले नव्हते. :D
In reply to मीटर गंडलं, अन्यथा उत्तम. by सूड
आणि चौथ्या कडव्यात यतिभंग झाल्याचे माहित आहे, त्याला चांगला पर्याय शोधतोय.
In reply to मीटर गंडलं, अन्यथा उत्तम. by सूड
मीटर गंडलं असलं की चुकीचं रिडींग दाखवत असेल ना?
खतरनाक :)))
एक्दम आवडली
स्वाम्याची निरीक्षणशक्तीची कमाल नोटा बंद झाल्यापासून चौफेर उधळली आहे बाबौ!! स्वाम्या, हलकट तुझ्या नोटा बदलून घे मेल्या नाहीतर नुसत्या कवितेच्या रेवड्या पाडत बसशील अन मग वेळेवर भिकारबंबू हातात चंबू होईल.
विडंबन एक्क्क नंबर झालंय!
फक्त दोन बदल सुचवावेसे वाटतात.
'पडुन आहे 'कॅश' अजुनि' म्हटलंत तर विडंबन, मूळ काव्यातल्या स्वरांशीही अधिक जवळीक साधेल.
आणि पहिल्या कडव्यातल्या दुसर्या ओळीचा पूर्वार्ध 'अजुन बँकाही न सरल्या' असं म्हटलंत तर मीटरमधे अधिक चांगलं बसेल.
बाकी कडक!
In reply to विडंबन एक्क्क नंबर झालंय! by वेल्लाभट
धन्यवाद. नोट, कॅश दोन्ही मीटरमध्ये असले तरी कॅश जास्त चपखल होईल हे बरोबर आहे. माझ्या डोक्यात तेव्हा हे आलेच नव्हते. नोटा रद्द केल्याने नोट हाच शब्द डोक्यात होता.
आणि मीटरचा घोटाळा लक्षात आणून दिल्याबद्दल पण विशेष आभार. तिथे 2 मात्रा जास्त पडल्या हे लक्षातच आले नव्हते. दोन्ही बदल स्वीकारण्यात येत आहेत.
=)) =)) =))
मस्त. मजा आली.
-दिलीप बिरुटे
जबर विडंबन !!!!!
=)))
मस्त जमलंय विडंबन.
स्वामिज्जी महान आहेत. कुठल्या दिवशी कोणती नोट काढतील? नेम नै. ! =))
In reply to स्वामिज्जी महान आहेत. by अत्रुप्त आत्मा
आले आले...
गुर्जी आले!
=))
स्वाम्या तु हजारची नोट आहेस!!!
In reply to स्वाम्या तु हजारची नोट आहेस!! by प्रीत-मोहर
दोन हजाराची नोट म्हटले तरच कॉंम्प्लिमेंट होईल, हजाराची नोट बाद झालीय आता :)
=))=))
बाबाजी की जय हो...
बाबाजी की जय हो...
मस्त रे स्वाम्या.
मस्त
लोल विडंबन !
ही कविता मला वॉट्स्प वर "मिसळपाव" वरुन साभार म्हणुन आलीय ;)
In reply to स्वामु by इरसाल
माझं नाव होतं की नव्हतं खाली? ;)
कारण मलाही आज सकाळी कायप्पावर आली, पण नावासह आली. :D
In reply to माझं नाव होतं की नव्हतं खाली? by स्वामी संकेतानंद
नाही नाव नव्हतं कळवलय तसं.
मिटरचं जमवा थोडं. मजा येत नाही अन्यथा वाचायला. कवितेची/गाण्याची मूळ गेयता हरवायला नको.
In reply to विडंबन छान by आदिजोशी
फेसबुकवर केलेत ते बदल. दुसरा शेर वेल्लभटांनी सांगितल्याप्रमाणे बदलला. चौथ्यातील यतीभंगाचं अजून काही केलेलं नाही.
In reply to फेसबुकवर केलेत ते बदल. दुसरा by स्वामी संकेतानंद
पण तोपर्यंत हे विडंबन त्याच्या जुन्या स्वरूपातच वायरल झाले च्यायला. :( :( आता काही फायनल बदल करून आपल्यापुरते ठेवावे लागेल.
मस्तं जमलंय विडंबन =))
मलाही व्हतस अप वर आली तुमच्या नावासकट आणि खाली मिसळ पाव ची लिंक ही आहे.
मीटर गडबड आणि यतिभंगामुळे मात्र मिठाचा खडा... :(
पाककृतीत किंचित बदल करुन कशी दिसती आहे ते सांगा स्वामीजी!
पडुन आहे नोट अजुनी, राजसा थकलास का रे?
एवढ्यातच रांग मोडुन, तू असा फिरलास का रे?
अजुनही सरल्या न गड्ड्या, बघ हजारापाचशेंच्या
अजुनही बँका न हरल्या, हाय! तू हरलास का रे?
सांग, नोटा शोधणाऱ्या पंटरांना काय सांगू?
उगवले एजंट सारे, आणि तू लपलास का रे?
बघ तुला दिसतील आता मॉरिशसच्या चोरवाटा
रंकखाती वापराया तू असा टपलास का रे?
दडपल्या खोक्यांत साऱ्या पाचशेच्या बंद नोटा
रेडला तू आयटीच्या आज घाबरलास का रे?
(शेफ्)रंगा
In reply to छान झालंय विडंबन! by चतुरंग
रंकखाती वापराया तू असा टपलास का रे?
जमले जमले, मस्त.
धन्यवाद.
दुसऱ्यात तुम्ही आणि वेल्लभट दोघांनी केलेले बदल उत्तम आहेत. कोणतेही वापरता येईल फायनल व्हर्जनला!
विडंबन crowd funding मध्ये लिहायला पाहिजे, दहा डोके लागतील तर भन्नाट जमत जातील.
In reply to रंकखाती वापराया तू असा टपलास by स्वामी संकेतानंद
crwod sourcing
मस्त कविता.wa वर फिरतेय नावासह आहे.
लोल!