अश्मवैभव... जयपूर , ओर्छा , ग्वालियर लेखांक २.......
चला...
नोव्हे. २०१६ दुपारचे २. ओलाने पुणे स्थानकासाठी प्रस्थान. १५२० ला पुणे जयपूर एस्क्प्रेसचे प्रस्थान. रात्रीची न येणारी झोप रेल्वेत. सकाळी जाग आल्यावर बाहेर पहातो ते रतलाम स्थानक आलेले. गाडी पुन्हा मार्ग क्रमित दौडतेय. आता बाहेर एक मजा दिसू लागलेय. मधेच सिमेन्टच्या कारखान्याचा पसारा. मधेच शेती. आपण कुठेतरी पातळ दगडांच्या सहवासात आलो आहोत याची जाणीव जशी दक्षिणेत शहाबाद ,बागलकोट भागात होऊ लागते इथे तेच. पण तिथला रंग वेगळा इथला वेगळा. इथे बदामीसर रंगाच्या फरशांची पाच पाच फूट उंचीची कुंपणे शेताभोवती. एका स्लाईसचा रंग दुसरीहून भिन्न.
मिसळपाव