उतारा (कथा)
"सर, मी खरच सांगतोय, मी दागिने नाही चोरले"
प्रकाश परत तेच म्हणत होता.
"अरे मग दागिने कुठे गेले?" मी चिडून विचारले.
"सर, हे काम सूर्यकांतच आहे" प्रकाश ठामपणे म्हणाला.
सूर्यकांत गेली चार वर्षे माझा ड्राइवर होता, त्याच्या वर विश्वास होता, तो चोरी करेल असे मला वाटत नव्हते. तो आता इथे नव्हता, त्याचा फोन ही लागत नव्हता.
आम्ही दोन दिवस फार्महाउस वर नव्हतो, तेव्हाच दागिने गायब झाले होते. कपाटात दागिन्यांचा डबा नाही ही गोष्ट ज्योतीच्या लक्षात आली. आमच्या लग्नात ज्योतीच्या आजीनेच तो डबा ज्योतीला दिला होता. ज्योती कधीतरीच तो डबा उघडायची.
मिसळपाव