चोरले जाणार नाही 'ते'
टागोरांचे नोबल आणि
बिस्मिल्लांची चंदेरी सनई
साहित्य, सुर नी अनुभुतीची
सुरेख सुंदर उबदार दुलई
ही दोन्ही प्रतिकं चोरली गेली!
दोन दिवसांतच विसरतात सगळे
वर्षानुवर्षांची मेहनत, श्रम, अन्
झिजवलेले कैक उन्हाळ-पावसाळे
चोराकडून ही चिन्हं विकत घेणारे,
असणारच पूज्य संस्कृती त्यांना
पण त्या चिजांमधून निर्मितीचा आत्मा
गवसणारच नाही कधी त्यांना
काव्यरस
राज की समाज....... कारण?(कथा भाग 2)
"आठ दिवस झाले तुझी आई देवळात गेली नसेल इतक्या भक्तिभावाने त्या संस्थेत जाते आहे. उदय... हे काही खर नाही पोरा. त्या भवानीला आट्यात घ्यायलाच हवी. पण यावेळी थोड़ वेगळा गेम करावा लागेल. तयारीची दिसती आहे टवळी." दुपारच्या जेवणानंतर आण्णा उदयशी बोलत होते.
"उचलु का तिला? ब-याच दिवसात नविन काही नाही पाहिल." उदयने नेहेमीप्रमाणे मुक्ताफळ उधळली.
"भाड्या मी काय विचार करतोय आणि तू काय बोलतो आहेस. उदय अरे जरा काम-धंद्याला लाग. पालिकेच्या निवडणुका आठ महिन्यावर आल्यात. गावाच राजकारण आता तू बघायच. मी पंचक्रोशीच बघतो आहे गेली तीन वर्ष. गावसुद्धा मीच सांभाळायच का?
जपानच्या राजधानीची सफर
जपानच्या राजधानीची सफर
Japan Tokyo
सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'.
'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली.आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे पुस्तकाला पारितोषिक
माझ्या अनुवादाला,
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.
इष्ट जनांस आमंत्रण आहेच.
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.
इष्ट जनांस आमंत्रण आहेच.
बाहेर करायच्या उठाठेवी
नमस्कार मिपाकर्स आणि पाककृतीतले मान्यवर लेखक/लेखिका! __/\__
घरात किचनमध्ये करायच्या लुडबुडी सोडून जेव्हा बाहेर कॅम्पिंग वगैरे ठिकाणी जेवण बनवायची वेळ येते तेव्हा खूपच लिमिटेड पर्याय उपलब्ध असतात किंवा मांसाहारी पदार्थ सोडल्यास पर्याय सामान्य असतात असे माझे मत आहे.
कॅशलेस
‘देशभक्ताची व्याख्या’ या ब्लॉगचा ताजा कलम:
- डॉ. सुधीर रा. देवरे
1975-77 च्या आसपासचा काळ. तेव्हाही माझ्या लहानपणी आमचं गाव बर्यापैकी कॅशलेस होतं. दुकानात कोणाला काही घ्यायला जायचं असलं की घरातलं धान्य- बाजरी, गहू, नागली, हरभरा, मका असं दुकानात घेऊन जायचं. दुकानदार तो त्याच्या मापाने मोजायचा. माप भरून भरपूर धान्य खाली पडू द्यायचा. आणि त्याच्या हिशोबाने सांगायचा, ‘इतके इतके पैसे झाले. काय देऊ?’ मग रोज लागणार्या जिनसा गुळ, दाळ, चहा, साखर, तेल असं थोडं थोडं खरेदी करायचं.
माणुसकी
ब्लॉग दुवा
आज एका अंध माणसाचा हात धरून त्याला बस स्टॉपपर्यंत जायला मदत केली, बसमधे बसवून दिलं.
हे सांगणं खरंच आवडलं नाही
पण सांगितल्याशिवाय राहवलं नाही
तोच तो प्रवाह तोच तो जमाव
आयुष्य नावाचा धावता बनाव
त्यात एक काठी माझ्या बाजूने वाट शोधत चालत होती
वाटेवरची अवघी गर्दी काठीला त्या टाळत होती
'टक टक' काठीच्या त्या आवाजाची राखण होती
'काय मंदासारखे चालतात लोक' ही अनेकांची अडचण होती
'कुठे जायचंय काका?' आपसुक प्रश्न केला मी
'प्लाझा' म्हणाले आणि त्यांचा लगेच हात धरला मी
गेलेही असते आपले आपण, त्यांना नव्हती भीड त्याची
काव्यरस
मिसळपाव