चला, शिकू या ओरिगामी – भाग २ – डोंगर-दरी, मूलभूत आकार
|| श्री गुरवे नम: ||
चला, शिकू या ओरिगामी – भाग १ - कागदपुराण
पुढील भागात ओरिगामीच्या मूलभूत घड्या (basic creases) आणि मूलभूत आकार (base) शिकू या.
चला, शिकू या ओरिगामी – भाग २ – डोंगर-दरी, मूलभूत आकार
व्हिडिओ लेखमाला
डिस्क्लेमर : या आणि यापुढील सर्व भागांमधल्या व्हिडिओंमध्ये दाखवलेल्या सर्व ओरि-कलाकृती अनेक शतकांपासून प्रचलित असलेल्या पारंपरिक (Traditional) कलाकृती असून त्यांचे अभिकल्पक (Designers) अज्ञात आहेत. या सर्व ओरि-कलाकृतींचे अभिकल्प (Design), त्या तयार करण्याचं आरेखन (Line Diagramming) आणि ते बनवण्याचे व्हिडिओ बनवून ते कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध करणं संपूर्ण जगभर पूर्णत: स्वामित्व हक्कविहीन (प्रताधिकारमुक्त) आहेत. ज्या कलाकृती तयार करण्याचे व्हिडिओ बनवून ते मिपावर वा महाजालावर वा अन्यत्र प्रकाशित केल्यामुळे कोणाचेही कसल्याही प्रकारचे स्वामित्व हक्क भंग होणार नाहीत, अशाच कलाकृती व्हिडिओ बनवण्यासाठी निवडल्या आहेत. अर्थातच, या लेखमालेसाठी मी बनवलेले सर्व व्हिडिओसुद्धा प्रताधिकारमुक्त आहेत. (माझेच व्हिडिओ अन्यत्र वापरून माझ्यावरच वाग्ङमयचौर्याचा आरोप होऊ शकतो, म्हणून माझ्या बाजूने हे स्पष्टीकरण.) भाग १मध्ये आपण ‘कामी’चे - कागदाचे विविध प्रकार पाहिले. आता या भागात ‘ओरू’चे – घड्यांचे प्रकार, त्यांच्या खुणा आणि त्या घड्यांपासून तयार होणारे अतिशय महत्त्वाचे दोन मूलभूत आकार (प्रिलिमिनरी आणि वॉटरबाँब बेस) शिकू या. चौरसाकार रफ कागद घेऊन बसला आहात ना? चला तर, सुरुवात करू. डोंगर-दरी - दोन ‘घड्यां’चा डाव, याला ओरिगामी ऐसे नाव... दरी घडी (Valley crease) आणि डोंगर घडी (Mountain crease)
https://youtu.be/aUB7VqVDaXY काही सोपे मूलभूत आकार - बुक फोल्ड कबर्ड फोल्ड हाउस फोल्ड ब्लिंट्झ बेस काइट बेस
https://youtu.be/NLCZYkBwVuc आता याच घड्या घालून ओरिगामीतले अतिशय महत्त्वाचे दोन मूलभूत आकार (Base) तयार करू या. प्रिलिमिनरी – पांढर्या बाजूवर दोन्ही बुक फोल्ड्स आणि दोन्ही कर्णरेषांवर डोंगर घड्या. तयार झाल्यावर मूळ कागदाच्या एक चतुर्थांश चौरस, रंगीत बाजू बाहेर येईल. वॉटरबाँब बेस - पांढर्या बाजूवर दोन्ही कर्णरेषांवर दरी घड्या आणि दोन्ही बुक फोल्ड्स डोंगर घड्या. तयार झाल्यावर मूळ कागदाच्या अर्धा समद्विभुज काटकोन त्रिकोन, रंगीत बाजू बाहेर येईल.
https://youtu.be/iDqRR6udcqo या मूलभूत घड्या आणि मूलभूत आकार वापरून पुढील भागांत काही सोप्या ओरि-कलाकृती बनवू या. प्रिलिमिनरी आणि वॉटरबाँब या दोघांवर प्रभुत्व मिळवल्यावर तुम्हाला ओरिगामी अगदी सहज जमेल, याची खातरी असू द्या. (क्रमश:)
In reply to ओरिगामी by जयन्त बा शिम्पि
In reply to ओरिगामी by जयन्त बा शिम्पि
In reply to ओरिगामी by जयन्त बा शिम्पि
In reply to _/\_ by अजया
In reply to हा पण भाग मस्त! by पैसा
मस्तं चालली आहे मलिका.