लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी रविवार, 11/12/2016 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा
फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर
मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..!
लेखकचित्रगुप्तयांनी रविवार, 11/12/2016 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कधी सुंदर, मनमोहक -- "मृदु मंजुळ कोमळ" तर कधी " भव्य अद्भुत विशाळ" अश्या, विविध रसांचा अविष्कार करणाऱ्या प्रतिमा बघण्यासाठी हा धागा आहे. . यात वाचण्यासारखे फारसे काही असेल- नसेल, पण बघण्यातून आनंद मिळेल, मनोरंजन होईल, थोडीशी माहितीत भर पडेल अशी आशा आहे. वाचकांनीही विषयानुरूप आपापली भर इथे टाकली, तर सोन्याहून पिवळे.
तर आगामी भागांतून इथे काय काय बघायला मिळेल, याची एक झलक या 'नांदी' मधून देतो आहे.
१.
लेखकप्राजुयांनी शनिवार, 10/12/2016 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
व्यर्थ धावाधाव झाली, पण खरोखर
जीवना नाराज मी नाही तुझ्यावर
मी किती कोठे दडू पाहुन तुम्हाला
आठवांनो घाव घाला.. या..! मनावर
फेरफटका मारण्याचे टाळते मी
आठवांची वाट झाली खूप खडतर
तू नको घालूस फुंकर , ऐक वाऱ्या
या निखाऱ्याला पुन्हा येईल गहिवर
आपले नाते सुगंधी राहिले ना
पण तरी सजवू फुलांनी आपुले घर
मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने
वेदना पुरवेल डोहाळे परस्पर
फक्त डोळ्यांनीच केले बोलणे अन्
मौन समजावून गेले कोरडा स्वर
शोधसी ‘प्राजू’ खुणांतूनी कुणाला
सांग निर्माल्यात का भेटेल ईश्वर?
- प्राजू
लेखकअबोली२१५यांनी शनिवार, 10/12/2016 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
या फोन नंतर मी माझ्या नवऱ्याशी बोलली काय वाटतंय तुला. तर तो बोलला कि Mr. परेश फक्त आणि फक्त पैसे आणा एवढच बोलत होता. त्याने मला समजेल असं काहीही सांगितलं नाही आहे. त्याला पैशाची घाई लागलीय. मला पटायला लागलं होत. या वर तुझ्या मित्र राजकारणात आहे त्याला Mr. परेशी माहिती काढायला सांग असं सुचवलं. मी त्याला सांगितलं कि तो लोढा ग्रुप मध्ये civil engineer आहे , आणि तो आपल्या गल्लीतच्या जवळच राहतो. यावर नवऱ्याने शांत राहणे पसंत केलं ;)
काही काही ऑफिस मध्ये सॅलरी स्लिप देत नाहीत त्या काही ऑफिस मधल माझं ऑफिस आहे.
लेखकअबोली२१५यांनी शनिवार, 10/12/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
मोदींची घोषणा केली आणि इकडे मी लोन कस करायचं याचाच विचार करत होती.
मी ऑफिस मध्ये काय कारण द्याच आणि कि जेणे करून मला ऑफिस मधून लोनसाठी आवश्यक पेपर देतील. मी एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलली या दरम्यान माझा नवरा घरी आला होता आणि मी त्याला या मीटिंग बद्दल सांगितलं. पहिले त्याने मला सांगितलं कि यापेक्षा तू स्वतःच चालू कर या ३. ५०लाखात तुझ स्वतःच आस्सेट्स असतील ज्या तुला दिसतील कॉम्पुटर खुर्ची टेबले वैगरे आणि जर तुझा व्यवसाय बंद झाला तर तू हे सगळं विकून काही प्रमाणात पैसे परत मिळवू शकतेस, पण ज्या गोष्टी दिसणार नाहीत त्यावर मी कसा विश्वास ठेऊ... बरोबरच होत त्याच पण मला करायचच होतच.
लेखकविवेकपटाईतयांनी शुक्रवार, 09/12/2016 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्याच्या प्रेमात
पडली राधा बाबरी
काळ्या रंगात रंगुनी
यमुनाही झाली काळी.
द्वारकेचा राजा आला
सुदामच्या द्वारी
काळी लक्ष्मी झाली
जनखात्यात पांढरी.
यमुनेच्या काठी
अवसेच्या राती
स्वार्थाच्या बाजारी
मैत्री अशी रंगली.
द्वारकेचा राजा = काळा पैसे वाला
सुदाम = गरीब माणूस
दिल्ली यमुनेच्या काठावर आहे.
लेखकअबोली२१५यांनी शुक्रवार, 09/12/2016 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्यानंतर त्याने मला सांगितलं कि तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस. यावर मी ३. ५० लाख गुंतवू शकते कारण मी कोणाकडे मागायला जाऊ शकत नव्हती माझे आई बाबा भारत बाहेर होते आणि मी सासू सासऱ्याकडे मागु कसे? जे काही होत ते मला माझ्या जबाबदारीवर उभं कराच होत. मी त्याला माझा पैशाचा प्रॉब्लेम आहे पण मी बिझनेस साठी टाइम मॅनेज करू शकते असं सांगितलं.
लेखकचिनारयांनी शुक्रवार, 09/12/2016 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर गेल्या काही दिवसात आलेले धागे बघता,'जीवन -एक रडगाणे' नामक नवीन दालन सुरु करावे अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो. ह्या दालनात दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांमुळे येणारे फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होईल (मग मिपावर आपण वेगळे काय करतो असा प्रश्न काही दुत्त दुत्त मिपाकरांना पडेलच! त्यांना फाट्यावरून इग्नोर मारावे !). दैनंदिन समस्यांमुळे माणसाच्या मनात उद्भवणारे प्रश्न आणि त्यांची त्याने शोधलेली उत्तरं ह्यावरही उहापोह होईल. सोबतीला मिपातज्ञ आहेतच. तर दालनाच्या बोहनीसाठी आमच्याकडून काही चिल्लर.
प्रश्न १.
लेखकअबोली२१५यांनी शुक्रवार, 09/12/2016 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी
माझ्या जवळच्या मैत्रीण ती एका बिझनेस मध्ये आहे. मला हि त्या बद्दल जरा कुतूहल वाटलं म्हणून ती काय बिझनेस करते ते विचारलं यावर तिने मला ती ऑनलाईन बिझनेस पोर्टल वर बिझनेस करते. यावर मी माझी काही प्रतिक्रिया दिली नाही. काही महिन्यांनी बिझनेस ट्रिप करता दुबई ला गेली. त्यानंतर ती मला फोन करायला लागली या वर मी बोलता बोलता सांगितलं कि मला जॉब स्विच कराचा आहे.