कोरडा स्वर
व्यर्थ धावाधाव झाली, पण खरोखर
जीवना नाराज मी नाही तुझ्यावर
मी किती कोठे दडू पाहुन तुम्हाला
आठवांनो घाव घाला.. या..! मनावर
फेरफटका मारण्याचे टाळते मी
आठवांची वाट झाली खूप खडतर
तू नको घालूस फुंकर , ऐक वाऱ्या
या निखाऱ्याला पुन्हा येईल गहिवर
आपले नाते सुगंधी राहिले ना
पण तरी सजवू फुलांनी आपुले घर
मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने
वेदना पुरवेल डोहाळे परस्पर
फक्त डोळ्यांनीच केले बोलणे अन्
मौन समजावून गेले कोरडा स्वर
शोधसी ‘प्राजू’ खुणांतूनी कुणाला
सांग निर्माल्यात का भेटेल ईश्वर?
- प्राजू
लेखनविषय:
याद्या
5333
प्रतिक्रिया
5
काव्यरस
मिसळपाव
फक्त डोळ्यांनीच केले बोलणे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiiara - Gold (Official Video)_/\_ !!
छान ! आवडली.
मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्परमनाचे व्यथेने गर्भार होणे......... हे फारच सुंदर जमलयंवाह! कविता आवडली.
छान!