Skip to main content

सामूहिक अधः पात

लेखक sudhirvdeshmukh यांनी रविवार, 27/08/2017 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
#सामुहीक_अध:पात एक काळ होता साधेपणा, विरक्ती, सभ्य भाषा व उदात्त विचारसरनी ही संतांची लक्षणे समजल्या जायची. आता त्याची जागा भपकेबाजी, पैश्याचे कीळसवाने प्रदर्शन, उग्र भाषा याने घेतली आहे. असे का झाले ? साधी, सरळ राहणी जगणाऱ्या व्यक्तीला पूर्वी समाजात मान होता. आताच्या काळात आपल्या समाजाचे सामुहिक स्खलन झालेले आहे. कुठल्याही मार्गाने धनाढ्य झालेल्या ऐतखाहू माणसाला समाजात जो पर्यन्त डोक्यावर घेतल्या जाईल तोपर्यन्त फक्त 'पैसा' हाच या समाजाचा धर्म राहील. अश्या अध:पात झालेल्या समाजात आदर्श म्हणून स्वीकारावे अशी लोकं अपवादानाचेच निर्माण होतील. आपले आदर्श जर चुकीचे असतील तर ती चूक आपली आहे.

ही

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 27/08/2017 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
ही नवनिर्मितीची अदभुत प्रयोजनकता ही उध्वस्ततेच्या दुख-या पाऊलवाटा ही हैवानाची क्रुर वासना ही मनोमिलनाची हळुवार संवेदना ही नग्न सत्यातील गुप्तता ही गुप्ततेतील गलिच्छ नग्नता ही आनंदपुर्तीचा हळुवार हुंकार ही बुजबुजलेल्या बाजारांचा भडिमार ही पुजनिय लिंगरुपी अवतार ही ब्रह्मचर्याचा अनोखा अविष्कार
काव्यरस

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक २ : क्ष

लेखक तुषार काळभोर यांनी रविवार, 27/08/2017 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
क्ष. माझा चौथीपासूनचा मित्र. खरं तर तो आमच्या वर्गात आहे, हे सातवीला गेल्यावर कळलं आणि आठवीला आमची ओळख चांगली झाली. मित्र म्हणावा इतपत. हडपसरला एका झोपडपट्टीत पत्र्याच्या दोन खोल्यांचं घर. घरात आई, वडील आणि क्षचे दोन भाऊ. आई दोन-चार घरी घरकाम करायची. वडील लोकसेवा हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर पोतं टाकून चपला व बूट शिवायचा व्यवसाय करायचे. मोठ्या भावाने सहावी-सातवीनंतर शाळा सोडलेली, तो एका गवंड्याच्या हाताखाली जायचा. आमच्या शाळेत चौथीच्या व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं खूप महत्त्व असायचं.

भारतीय भाषांनी इंग्रजीला उधार दिलेले शब्द

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 27/08/2017 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मुलगी शाळेत जाऊ लागल्या पासून तिची मराठी फार बदलली. म्हणजे खराब झाली असे नाही तर मराठी शारदेने तिच्या जिभेवर बहुधा “नाच क्लास” ( हा तिचाच शब्द ) काढला आहे आणि तो सध्या जोरात सुरु आहे त्यामुळे हिडसवून-तिडसवून (म्हणजे तुम्हाला वाटेल ‘हिडीस फिडीस करून’ नाही ह्याचा अर्थ आहे जोर जोरात हलवून दोन किंवा दोन पेक्षा अधिक गोष्टी एकमेकात “मिक्षळणे”), पाडवणे, मस्करी खाणेअसले शब्द तिच्या टाकसाळीत प्रत्यही तयार होत असतात.

बाप्पाचा नैवेद्यः काजू मोदक आणि काजूकतली

लेखक अनन्न्या यांनी रविवार, 27/08/2017 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
काजू मोदक गणपतीसाठी खास सोपी आवडती झटपट आणि घरी केल्यामुळे खूपच स्वस्त अशी रेसिपी! साहित्य: एक वाटी काजूगर, अर्धी वाटी साखर, पाव वाटी पाणी, वेलची पावडर, अर्धा चमचा तूप, मोदक साचा कृती: काजूगर मिक्सरला थांबून थांबून फिरवावे, आणि पावडर करावी. सलग फिरवले तर तेल सुटेल पण पावडर बारीक होणार नाही. कढईत अर्धा चमचा तूप घ्यावे. गॅस मंद ठेवावा. आता त्यात साखर आणि पाव वाटी पाणी घालून साखर विरघळेपर्यंत ढवळत राहावे. साखर पूर्ण विरघळली की काजू पावडर मिसळावी. पाच मिनिटे शिजवावे. वेलची पावडर घालावी. गोळा होऊ लागला की खाली उतरून घोटावे.

ऑल इस वेल बाप्पा~~~~

लेखक Swapnaa यांनी शनिवार, 26/08/2017 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
ऑल इस वेल बाप्पा~~~~ बस थोडीशी माणुसकी, आपलेपणा, वेळ, दक्षता कमी पडतोय.... शहरांतल्या सगळ्यांसाठी : "काँक्रिटच्या जंगलात कमी झाली निसर्गाची छाया, २,३ बीएचके च्या भिंतींत आटली नात्यांची माया" , खेडे गांवातल्या सगळ्यांसाठी : "घरांत हवं AC, दारापुढें चार चाकी स्वछता गृहाशी, त्यांना घेणं देणं च नाही" , सध्याच्या युवांसाठी : "सगळ्यांच्या नजरेत आम्ही दोघं राजाराणी, मात्र आमच्या खोलीत रमतो स्वतःच्या च भ्रमणध्वनीत" , बालवर्गासाठी : "पटांगणावरचे नको खेळ चायनीज वस्तूंचे वेड, सणावारांना खायला भेळ कसलाच नाही ताळमेळ" , तरीही बाप्पा तू आलास की, सगळे एकदम सेंड कर
काव्यरस

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक १ : माझा मी जन्मलो फिरुनी!

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 26/08/2017 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मी जन्मलो फिरुनी! लेखक : माम्लेदारचा पन्खा नमस्कार मंडळी... श्रीगणेश लेखमालेचा हा विषय तसा वेगळाच असल्यामुळे आपल्यापैकी अनेकांनी त्याला नापसंती दर्शवली होती. पण माझं मन मात्र तो वाचून पुन्हा एकदा नकोशा वाटणाऱ्या भूतकाळात गेले, कारण विषयाचं नाव माझ्या ह्या घटनेला अगदी यथायोग्यच आहे म्हणून हा लेखनप्रपंच... फार मागे नाही जायला लागणार आपल्याला... याच वर्षीचा जानेवारी महिना! घरात नवीन पाहुणा येणार म्हणून बायकोच्या डोहाळेजेवणाची जवळपास सगळी तयारी होत आली होती. सातवा महिना लागल्यावर कार्यक्रम करायचा, हे नक्की ठरवलं होतं.