मला आलेला अनुभव -१
साधारण ३ वर्षांपूर्वी घडलेली ऐक घटना.
मला त्या दिवशी कंपनीत काही कामानिमित्य लवकर सकाळी जायचे होते. त्यामुळे मी कंपनीच्या नेहमीच्या बससाठी न थांबता बाइकवरून जाण्याचे ठरविले. चिंचवड ते मरकळ असा रूट होता. आदल्या दिवशीच नवीन हेल्मेट आणले होते. ते परिधान करून मी निघालो. ऑटो क्लस्टर च्या चौकात आलो. आता तिथे बरेच बदल झाले आहेत. त्यावेळेस तिथे ट्रॅफिक सिग्नल पण नव्हते. परंतु त्यावेळी समोरून येणारा काटकोनातील रस्ता पूर्ण दिसतं नसे. बाईक चा वेग ७० ते ८० च्या घरात होता. चौकात आलो. समोरून काटकोनी रस्तातून त्याच वेळी एक वेगात मारुती कार चाललेली होती. ... एक क्षणात मनात विचार आला कि थांबावे ..
मिसळपाव