Skip to main content

वस्तरा हरवला आहे म्हणून

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 05/09/2017 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
माझा वस्तरा हरवला आहे म्हणून उगाच रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये तसंही चंद्राला भिंगातून पाहताना मला ओतावे लागते घागरभर पाणी मग छाटलेली काठी घेऊन हाकारावी लागतात गाढवं मैलोनमैल बघून घेईन मी एकेकाला ज्यांनी पळवले आहेत माझे रद्दीचे पेपर पेन्सिलीला टोक करून माझी शेवींग क्रीम पळवली आहे ज्यांनी कॅलेंडरवर लिहिलीय मी त्यांची तारीख आता चाललोच आहे तर जरा फाट्यावर जाऊन येतो बाकी वस्तरा हरवला आहे म्हणून रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये -रानातला वेडा
लेखनविषय:

वाचने 4653
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

बर झाल राव तुमचा वस्तरा हरवला, चंद्राच्या पृष्ठ्भागावर ससा जाउन बसला, ट्रंप तात्यांना टोचली पराणी ढोनुल्याने गायली गोडगोड गाणी, पैजारबुवा,

=)) =)) बरं झालं, हरवला आहे तुमचा वस्तरा । नाहीतर झाली असती बिनपाण्याने खराखरा ॥

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बरं झालं, हरवला आहे तुमचा वस्तरा । नाहीतर झाली असती बिनपाण्याने खराखरा ॥
अन घरची अस्तुरी ठसक्यात म्हणली असती, टराटरा आन फराफरा

छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया. Marathi kavita

इतकी चंपी चकोट,तर सापडला तर काय? अखिल मिपा हंगामी (पावसाळी ) काव्य साथ नियंत्रण संघ,व वाचक वाचले तरच वाचाल समिती संयुक्त प्रकल्प