रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी
विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी
मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी
झोपायाला जमीन, अंबर पांघरायला
कसली खिडकी! कसला मजला!
वा ओंकारा, क्या बात है! वरील ओळी आवडल्या...
तात्या.
बाकी सर्व कडवी इतकी घट्ट बांधलेली आहेत, की शेवटचे कडवे कवीने मुद्दामून सैल सोडले आहे (चुकून नव्हे) असे वाटते. पण का?
परतपरत प्रयत्न करून मी घसरून असेच वाचतो :
रिक्तहस्त मी एकभुक्त मी
विषय- वंचना- व्यसनमुक्त मी
देव, दानवहि, आणि भक्त मी
पाठी भू, नभ पांघरायाला
कसली खिडकी! कसला मजला!
पण बाकी कडवी तालबद्ध रचणारा ॐकार हे कडवेही त्याच तालात सहज बसवू शकला असता. मग ते जसे आहे तसे बसवण्यात काही विशेष काव्यमय दृष्टी आहे काय?
पहिल्या ३ कडव्यांत लय साधल्याने कविता ओघवती होते. शेवटच्या कडव्यात त्याला लगाम घातला आहे. शेवटचे कडवे हे पहिल्या तीन कडव्यांशी विसंगती दर्शवते.
पहिले कडवे - कॅन्सर अथव तत्सम व्याधीने त्रस्त झालेल्या रुग्णाशी संबंधित.
दुसरे कडवे - जगण्यातला साधेपणा हरवून बसलेल्या प्रवृत्तीचे द्योतक.
तिसरे कडवे - तर्जनिनासिकान्याय करणार्याचे वर्णन.
चौथ्या कडव्यात फारकत घेऊन विषय, वंचना, व्यसन (पहिली ३ कडवी ) यापासून लांब असणार्या; देव, दानव, भक्ती अशा संकल्पनांत न रमणार्या ; पैसा, भूक आणि भोग यांनी न डळमळणार्या आणि विश्वात सर्वत्र संचार करणार्या प्रवृत्तीचे निवेदन आहे. ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. 'कसली खिडकी, कसला मजला' यातून प्रकट होणारा निष्काळजीपणा जरी नेहमीचा असला तरी वर्णन केलेली वृत्ती आढळणे कठीण!
वा ओंकारा!
ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू.
खुलासा लै भारी केला आहेस बाबा..!
आता पुन्हा एक डाव तुझ्या खुलाश्याबरहुकूम कविता वाचून पाहतो..
तात्या.
वा!
ॐकार खूपच
मस्त शेवट
चार मजल्यांची अनेक खिडक्यांची
छान
छान कविता - शेवटचे कडवे?
लय...
वा ओंकारा!