✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कुठली खिडकी? कितवा मजला?

ॐ — ॐकार, Fri, 02/08/2008 - 08:32

प्रतिक्रिया द्या
5883 वाचन

💬 प्रतिसाद (8)

वा!

विसोबा खेचर
Fri, 02/08/2008 - 17:21 नवीन
रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी झोपायाला जमीन, अंबर पांघरायला कसली खिडकी! कसला मजला! वा ओंकारा, क्या बात है! वरील ओळी आवडल्या... तात्या.
  • Log in or register to post comments

ॐकार खूपच

प्राजु
Fri, 02/08/2008 - 18:45 नवीन
ॐकार खूपच छान.. शेवटचे कडवे खास जमले आहे.... - प्राजु
  • Log in or register to post comments

मस्त शेवट

सुवर्णमयी
Fri, 02/08/2008 - 22:32 नवीन
कविता खूप आवडली. सोनाली
  • Log in or register to post comments

चार मजल्यांची अनेक खिडक्यांची

चित्तरंजन भट
गुरुवार, 02/14/2008 - 16:51 नवीन
वा!! कवितेतील सर्वच मजले आणि खिडक्या फार आवडल्या. त्यातील मिस्किलपणा विशेष.
  • Log in or register to post comments

छान

नंदन
गुरुवार, 02/14/2008 - 19:09 नवीन
कविता आवडली. शब्दांनी धरलेल्या खाटा आणि शेवटचे कडवे खासच. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

छान कविता - शेवटचे कडवे?

धनंजय
गुरुवार, 02/14/2008 - 19:34 नवीन
बाकी सर्व कडवी इतकी घट्ट बांधलेली आहेत, की शेवटचे कडवे कवीने मुद्दामून सैल सोडले आहे (चुकून नव्हे) असे वाटते. पण का? परतपरत प्रयत्न करून मी घसरून असेच वाचतो : रिक्तहस्त मी एकभुक्त मी विषय- वंचना- व्यसनमुक्त मी देव, दानवहि, आणि भक्त मी पाठी भू, नभ पांघरायाला कसली खिडकी! कसला मजला! पण बाकी कडवी तालबद्ध रचणारा ॐकार हे कडवेही त्याच तालात सहज बसवू शकला असता. मग ते जसे आहे तसे बसवण्यात काही विशेष काव्यमय दृष्टी आहे काय?
  • Log in or register to post comments

लय...

ॐकार
Tue, 02/19/2008 - 17:56 नवीन
पहिल्या ३ कडव्यांत लय साधल्याने कविता ओघवती होते. शेवटच्या कडव्यात त्याला लगाम घातला आहे. शेवटचे कडवे हे पहिल्या तीन कडव्यांशी विसंगती दर्शवते. पहिले कडवे - कॅन्सर अथव तत्सम व्याधीने त्रस्त झालेल्या रुग्णाशी संबंधित. दुसरे कडवे - जगण्यातला साधेपणा हरवून बसलेल्या प्रवृत्तीचे द्योतक. तिसरे कडवे - तर्जनिनासिकान्याय करणार्‍याचे वर्णन. चौथ्या कडव्यात फारकत घेऊन विषय, वंचना, व्यसन (पहिली ३ कडवी ) यापासून लांब असणार्‍या; देव, दानव, भक्ती अशा संकल्पनांत न रमणार्‍या ; पैसा, भूक आणि भोग यांनी न डळमळणार्‍या आणि विश्वात सर्वत्र संचार करणार्‍या प्रवृत्तीचे निवेदन आहे. ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. 'कसली खिडकी, कसला मजला' यातून प्रकट होणारा निष्काळजीपणा जरी नेहमीचा असला तरी वर्णन केलेली वृत्ती आढळणे कठीण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

वा ओंकारा!

विसोबा खेचर
Tue, 02/19/2008 - 18:02 नवीन
वा ओंकारा! ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. खुलासा लै भारी केला आहेस बाबा..! आता पुन्हा एक डाव तुझ्या खुलाश्याबरहुकूम कविता वाचून पाहतो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा