पॅपिलॉन - हे हेनरी शॅरीयर (Henri Charrière नोव्हें. १६, १९०६ ते जुलै २९, १९७३) याचे टोपण नाव.
पॅपिलॉन हे त्याने लिहीलेली आत्मकथा आहे. तो फ्रान्स मध्ये गुन्हेगारांचा 'डॉन' होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला न केलेल्या खुनाबद्द्ल जन्मठेपेची शिक्षेसाठी त्याला फ्रेंन्च न्यू गियाना ला हलवीण्यात आले. त्याला आपल्या प्रेमळ बायको आणि वडीलांना सोडावे लागले.
तो भक्कम शरीर असलेला आणि प्रबळ ईचछाशक्ती असणारा होता.
न्यू गियाना ला त्याने सुटकेसाठी पळुन जाण्याचा प्रयत्न केले. काही दिवसांनी तो पकडला गेला. या सुटकेसाठी तो अनेक मैल समुद्र प्रवास केला. अनेक हाल सोसले.
त्यास एके वेळी रेड-ईंन्डीयन टोळी ने आपलेसे केले होते. दोन रेड-ईंन्डीयन भगीनी त्यास नवरा मानू लागल्या. त्या त्यापासून गर्भवती झाल्या. तो काही आता कैदी नव्हता. तो तेथे आरामात राहीला असता. पण केवळ सुड घेण्यासाठी तो ती प्रेमळ टोळी सोडतो.
पुन्हा तो पोलीसांना सापडतो. असे त्याने एकूण ९ प्रयत्न केले. अखेर तो आपली सुटका करतो आणि तो व्हेनेझुएला येथे स्थिर होतो. त्याच्या दुसर्या आत्मकथेत तो असे सांगतो की (बनकॉ -Banco)- तो तेथे अनेक व्यवसाय करतो. पण शेवटी भूकंपात ते सर्व जाते.
जुलै २९, १९७३ मध्ये तो घश्याच्या कर्करोगाने तो मरतो. त्यास फ्रान्स मध्ये दफन केले जाते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेखन हे काही माझे पुस्तक परीक्षण नाही. ते मला पडलेल्या प्रश्नांची पार्श्वभूमी आहे.
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
२) पुढे त्रिनीनाद मधे सुध्धा तो स्थिर होतो. एका भारतीय मुलीच्या तो खुप जवळ जातो. तीच्या बापाची पण त्यांनी लग्न करावे ही ईच्छा असते. तो तेथे सुध्दा स्थिरस्थावर होवु शकला असता. पण तो तेथे टिकत नाही.
३) तो त्याच्या बापाला / प्रिय बायको ला काहीच निरोप/ पत्र का लिहीत नाही ?
४) तो फ्रान्स ला सेट्ल होण्यासाठी का प्रयत्न का करत नाही?
५) एवढे करुन त्यास व्हेनेझुएला काही मानवलेले नाही.
६) त्यास त्याच्या आत्मकथेबद्द्ल आणि निघालेल्या चित्रपटाबद्द्ल (Papillon (1973) Directed by - Franklin J. Schaffner) खुप पैसा मिळाला. पण तो पैसा काही त्याचा उद्देश नव्हता.
७) तो ज्या कारणासाठी वारंवार पळुन जायचा, (वकील, न्यायाधीश, पोलिस यांचा सुड घेण्यासाठी ) ते त्याने खरे केले का?
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते.
९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का?
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
जाणकार यावर प्रकाश टाकतील तर त्यांना आधीच धन्यवाद!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रेफरन्सेस :-
१) पॅपिलॉन - हेनरी शॅरीयर - अनूवाद - रवींन्द्र गूर्र्जर, श्रीराम बुक एजन्सी, पुणे. (रु. ३००/-)
२) आंतर्जालः -http://en.wikipedia.org/wiki/Henri_Charri%C3%A8re आणि ईतर धागे.
३) http://en.wikipedia.org/wiki/Banco_(novel)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
12677
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही कथा माहितीच नव्हती.
.
In reply to ही कथा माहितीच नव्हती. by प्राजु
चित्रपट पाहाच एकदा.
In reply to ही कथा माहितीच नव्हती. by प्राजु
चित्रपट टूकार होता
In reply to चित्रपट पाहाच एकदा. by अन्वय
गमतीशीर
हेच प्रश्न मलाही आहेत
In reply to गमतीशीर by पॅपिलॉन
.
मी हा
स्टिव्ह मॅकलिन हा माझा खुप आवडता नट.
In reply to मी हा by अविनाशकुलकर्णी
मत
पपिलान
काही उत्तरे
हो, पण आधिच्या...
आता ही त्या माणसाची कथा
पॅपीलॉन हे माझे एक आवडते
१) सर्वात प्रथम तो सुटतो
पॅपिलॉन
पॅपिलॉन पुस्तक छानच आहे.
पटते आहे.
In reply to पॅपिलॉन पुस्तक छानच आहे. by रेवती
पॅपिलॉनचा दुसरा भाग 'बॅंको'
टाका लवकर टाका वाट बघतोय.....
In reply to पॅपिलॉनचा दुसरा भाग 'बॅंको' by पाषाणभेद
प्रकाटाआ
'Revenge is the purest emotion' - Mahabharata
प्यापीलान
+१
...
+१
In reply to ... by आशु जोग
आदूबाळ, तुम्ही नर्मदा
In reply to +१ by आदूबाळ
वाचतो. धन्यवाद.
In reply to आदूबाळ, तुम्ही नर्मदा by यशोधरा
Spoiler Alert
१) सर्वात प्रथम तो सुटतो