✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पॅपिलॉन - काही अनुत्तरीत प्रश्न

प
पाषाणभेद यांनी
Mon, 02/09/2009 - 19:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12614 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

ही कथा माहितीच नव्हती.

प्राजु
Mon, 02/09/2009 - 20:09 नवीन
चित्रपटही पाहण्यात नाही आला कधी. आता मिळाला तर पाहीन. कथा इंटरेस्टींग दिसते आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 02/09/2009 - 20:13 नवीन
कथा लय म्हंजे लयच भारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

चित्रपट पाहाच एकदा.

अन्वय
Mon, 02/09/2009 - 20:15 नवीन
चित्रपट पाहाच एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

चित्रपट टूकार होता

आत्मशून्य
Wed, 07/13/2011 - 11:26 नवीन
पूस्तक वाचा पण चित्रपट चूकूनही नको. चांगल्या कथेची कशी वाटलावावी याचं उदाहरण म्हणजे पोपीलोन चीत्रपट/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्वय

गमतीशीर

पॅपिलॉन
Mon, 02/09/2009 - 20:21 नवीन
चर्चा प्रस्तावावरील विषय नामसाधर्म्यामुळे अंमळ गमतीशीर वाटला. असो, सध्या गडबडीत आहे. सविस्तर उत्तर लवकरच! फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments

हेच प्रश्न मलाही आहेत

वपाडाव
Mon, 02/14/2011 - 12:39 नवीन
हेच प्रश्न मलाही आहेत ... तुमच्या सविस्तर उत्तराच्या प्रतिक्षेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॅपिलॉन

.

टिउ
Mon, 02/09/2009 - 20:57 नवीन
चित्रपट बघितला नाहिये पण पुस्तक बर्याच वर्षापुर्वी (म्हणजे लहानपणी) वाचलं होतं. पुन्हा पुन्हा पकडला जाउनसुद्धा पॅपिलॉन प्रयत्न सोडत नाही आणि शेवटी यशस्वी होतो. त्याच्या त्या बोटीतल्या सफरी, रेड ईंडियन्स सोबतचं वास्तव्य, मोती शोधायला समुद्रात जाणं हे सगळं सिंदबादच्या सफरींसारखं होतं. लहान मुलांना असलंच वाचायला आवडतं. त्यामुळे बरीच वर्ष हे पुस्तक आमचं आवडतं होतं. असले प्रश्न त्यावेळी पडले नाहीत. आता पुन्हा वाचुन बघेन. गयानाच्या जेलमधे महिनोनमहिने एकटा असतांना त्याच्या डोक्यात कायम सुडाचे विचार असायचे. तासंतास त्या छोट्याश्या खोलीत येरझारे मारत कुणाला कसं ठार करायचं याचे आरखडे तो बनवायचा. पण बाहेर पडल्यावर त्यातला फोलपणा त्याला जाणवतो आणि तो सुड घेत नाही असं काहीतरी आठवतय...
  • Log in or register to post comments

मी हा

अविनाशकुलकर्णी
Mon, 02/09/2009 - 21:33 नवीन
मी हा चित्रपट पाहिला.अतिशय अप्रतिम सिनेमा आहे..स्टिव्ह मॅकलिन व डस्टिन हॉपमन यांचि कामे अप्रतिम आहेत...पॉपीला जेंव्हा अंधर कोठडित ठेवतात त्या वेळी तो जे किडे खावुन जिवंत रहातो ते प्रसंग अतिशय अप्रतिम आहेत..तसेच त्याला जे भास होतात त्याचे चित्रीकरण खुप परीणाम कारक आहेत..महारोग्याकडुन नाव भाड्याने घेवुन सुटकेचा केलेला प्रयत्न..तसेच तो गे जेलर ..त्याने पॉपीच्या मित्रावर केलेला अत्याचार सारेच खुप परिणाम कारक आहे..स्टिव्ह मॅकलिन हा माझा खुप आवडता नट होता..हा सिनेमा खुप बघण्या जोगा आहे..व त्याचि कॅसेट/सी.डी मिळाली तर जरुर बघा....हा विषय वाचल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या.........
  • Log in or register to post comments

स्टिव्ह मॅकलिन हा माझा खुप आवडता नट.

ढ
Tue, 02/10/2009 - 16:47 नवीन
अहो निदान आवडत्या नटाचं नाव तरी माहिती हवं की नको? हा मॅकलिन कुठून काढलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

मत

सिद्धेश
Mon, 02/09/2009 - 22:04 नवीन
मी रविन्द्र गुर्जर यांनी केलेला अनुवाद वाचला आहे. पण त्याच्याशी तुलना केली तर आपल्या तात्याराव सावरकरांचे अंदमानातील जीवन अधिक कठीण आणि आव्हानात्मक होते.
  • Log in or register to post comments

पपिलान

हरकाम्या
Tue, 02/10/2009 - 00:07 नवीन
शिळ्या कधिला उत का आणावा ??
  • Log in or register to post comments

काही उत्तरे

विंजिनेर
Tue, 02/10/2009 - 04:02 नवीन
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते. ९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का? १०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्‍या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
पॅपीलॉन त्याच्या सुटकेनंतर काही वर्षे एक सूड-भावनेने भारलेला असा माणूस होता. त्याला 'आपण स्वतःच्या आयुष्यातल्या वाया गेलेल्या ८ वर्षांचा जाब फ्रान्स मधल्या वकिलाला कधी विचारयतोय..' ह्या प्रश्नाशिवाय काहीही समोर दिसत नव्हते. ह्याच भावनेचा एक भाग म्हणून तो इंडियन जमातीतील मुली, कॅरॅकस मधली इंदिरा ह्यांचा त्याग करुन फ्रान्सच्या दिशेने वाटचाल करत असतो. आपण आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणार्‍या ह्या सर्व लोकांना सोडून जातो आहोत ह्याची त्याला निश्चितच खंत वाटत राहते. अपराधी पणाची भावनाही असतेच. शेवटी तो जेव्हा व्हेनेजुएला मधे स्थायिक होतो तेव्हा त्याच्या होणार्‍या पत्नीचे मन जिंकायच्या प्रयत्नात असताना त्याला सूडामधे असलेल्या विफलेतेची जाणीव होते. त्याच्या पत्नीचे त्याच्यावर असलेले प्रेमच त्याला ह्या भावने पासून परावृत्त करते. हा सगळा मानसिक संघर्ष कादंबरीच्या उत्तरार्धात आहे. (वाचा, बँको: - अनुवाद रविंद्र गुर्जर,बहुदा मॅजेस्टिक प्रकाशन) पण माझ्यामते तो या सर्वांना पुन्हा भेटत नाही. अजून एक म्हणजे पॅपिलॉन हा निर्दोष असतो. ह्याचा विस्तार बँको मधे आला आहे.
  • Log in or register to post comments

हो, पण आधिच्या...

पाषाणभेद
Tue, 02/10/2009 - 16:53 नवीन
"तो जेव्हा व्हेनेजुएला मधे स्थायिक होतो तेव्हा त्याच्या होणार्‍या पत्नीचे मन जिंकायच्या प्रयत्नात असताना त्याला सूडामधे असलेल्या विफलेतेची जाणीव होते. त्याच्या पत्नीचे त्याच्यावर असलेले प्रेमच त्याला ह्या भावने पासून परावृत्त करते." हो, पण त्याच्या आधिच्या आयुष्यात त्याला हे प्रेम मिळाले होतेच की . -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

आता ही त्या माणसाची कथा

सविता
Tue, 02/15/2011 - 11:12 नवीन
आता ही त्या माणसाची कथा आहे... खरी खुरी घडलेली... तेव्हा त्याच्या मनात काय काय विचार आले होते...त्याने काय केले...का केले. हे सांगायला आता तो जिवंत नाही... मग आपण फक्त तर्क करून काय उपयोग? दुर्दम्य इच्छाशक्ती...त्यावर अशक्य वाटणार्‍या गोष्टी करणे... हेच त्या पुस्तकातून घेण्यासारखे आहे!
  • Log in or register to post comments

पॅपीलॉन हे माझे एक आवडते

गणेशा
Tue, 02/15/2011 - 14:58 नवीन
पॅपीलॉन हे माझे एक आवडते पुस्तक ... खुप सुंदर आहे. बँको अजुन वाचले नाहिये.. .. परिक्षण ही केले होते मी याचे देयिन नंतर .. जमल्यास तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो ..
  • Log in or register to post comments

१) सर्वात प्रथम तो सुटतो

गणेशा
Tue, 02/15/2011 - 15:15 नवीन
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
--> माणुस हा स्वतंत्रता प्रिय प्राणि आहे.. रेड- इंडियन्स मधील काळ खुप छान लिहिलेला आहे, तुम्हाला जो प्रश्न पडला तसाच मला ही पडला होता. कोणीही तेथे असते तर तेथेच मजा उपभोगत राहिले असते असे मला ही वाटले होते, अगदी मी जरी असतो तरी तेथुन पुढे कश्यासाठी निघुन जायचे हे वाटलेच असते, पण तेथेही पॅपिलॉन चे मन जास्त रमले होते असे माणता येणार नाही, तो माणसिक रित्या गुंतला हे मान्य, पण त्या २ बायका आणि बाहेरील मुक्त जग यामधेय कदाचीत त्याला बाहेरील मुक्त जग जास्त समाधान कारक आणि स्वतंत्रतेची नवी दिशा वाटली असावी ८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते. --> शांत , अनिभिज्ञ जीणे जगणे हा माणसाचा स्वभाव नसतो .... त्याला नेहमी प्रकाशझोतात जगणे आवडते... कायम पैसा मिळाला.. कायम जेवन मिळाले .. सोबत एक मुलगी मिळाली म्हणुन आयुष्यभर कोणी त्रयस्थ ठिकाणी अलिप्त इतर जगापासुन लपुन राहु शकत नाही.. आणि हाच एक मुद्दा आहे तो रेड - इंडियन टोळीत न्गिघुन गेला ते.
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्‍या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
हे २-३ प्र्शन्च पॅपिलॉन च्या पहिल्या पुस्तकाप्रमाणे आहे असे वाटते त्याचा पुढचा भाग अजुन वाचला नाही म्हणुन जास्त लिहु श्कलो नाही. परंतु तो इतरांचा आदर करीत असला तरी तो भावनेच्या आहारी न जाणारा होता म्हणुन त्याचे निर्णय कसे ही असले तरी त्याने स्वता घेतले .. रेड इंडियन्स बायका कीतीही प्रेमळ असल्या तरी त्यांना वाईट हेतुने वागनुक न देता तो सरळ निघतो तेथुन जायला.. भावनांचा आदर तर आहेच पण आहारी पणा नाही.. बाकी त्याने योग्य केले का.. असे नको करायला होते .. हे शब्दबद्द असणार्या आत्मवृतावरुन वाटते.. प्रत्येक्षात एक एक दिवस कसले कसले विचार येत असतील .. बायका दुर समुद्रावर गेल्या तर काय विचार येत असतील असे बारीक सारीक विचार हे जीवन प्रत्यक्षात जगतानाच येतात .. आणि ते शब्दबद्द करणे अवघद गेले असेन.. तरीही पुस्तक अप्रतिम .. सिनेमा आहे यावर हे माहितीच नव्हते मला अजुनतरी
  • Log in or register to post comments

पॅपिलॉन

स्वाती दिनेश
Tue, 02/15/2011 - 15:35 नवीन
पॅपिलॉनची पारायणे केलीत, त्याचाच दुसरा भाग- बँको . सिनेमा पाहिलेला नाही, आता वरचे प्रतिसाद वाचून बघावासा वाटतो आहे. पाभेंना पडलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न मलाही होते, रेड इंडियन टोळीत शांत जीवन तो जगू शकला असता पण मला वाटतं त्याच्यातला साहसी भटक्या बाहेर आला असावा आणि त्यामुळे टोळी सोडून तो परत मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडला असावा, स्वाती
  • Log in or register to post comments

पॅपिलॉन पुस्तक छानच आहे.

रेवती
Tue, 02/15/2011 - 19:08 नवीन
पॅपिलॉन पुस्तक छानच आहे. सिनेमात ते सगळे संदर्भ चित्रित करणे शक्य नाही हे समजून घेतले. तसा बरा आहे सिनेमा पण पुस्तक वाचताना जी भव्यता अनुभवायला मिळते ती सिनेमा पाहताना अनुभवता येत नाही. तुरुंगात रहात असलेले क्रूर कैदी मात्र पुस्तकाप्रमाणे बरोबर आहेत. वर दिलेले प्रश्न वाचून वाटले की त्याचा स्वभाव एकाच गोष्टीला धरून राहण्याचा नसावा. एकदा जुने आयुष्य सोडल्यावर पुन्हा तेथे गेल्यास पकडले जाण्याची शक्यता जास्त. आपल्या दृष्टीकोनातून वडीलांचे, बायकोचे प्रेम जे आहे तो दृष्टीकोन इतर देशात नाही. कधीही न पाहिलेल्या रेड इंडीयन मुलाबद्दल त्याला नुसते वाईट वाटण्यापलिकडे काही होणार नाही. त्या मुलाला भेटाययला जावे असे वाटेपर्यंत पॅपिलॉनच्या आयुष्ञात बरीच उलथापालथ झालेली असणार. तो आधीपासूनच काही सज्जन माणूस नसतो. फक्त यावेळी न केलेल्या खुनासाठी पकडला जातो एवढेच. अशा लोकांच्या भविष्ञाबद्दल त्यांचे नातेवाईक किती अपेक्षा ठेवत असतील? फारशी नाहीच. जोवर आपल्याबरोबर आहे तोपर्यंत आहे नाहीतर मेला असे समजत असतील.
  • Log in or register to post comments

पटते आहे.

गणेशा
Tue, 02/15/2011 - 20:39 नवीन
पटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पॅपिलॉनचा दुसरा भाग 'बॅंको'

पाषाणभेद
Wed, 02/16/2011 - 10:46 नवीन
पॅपिलॉनचा दुसरा भाग 'बॅंको' वाचलाय. लवकरच लिहीतो (वेळ मिळाल्यास). 'केवळ आपल्यावरील खोट्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने सर्व सुखे नाकारलीत', या एका वाक्यात त्याच्या वागणूकीची तर्‍हा वर्णन केली जावू शकते. दुसर्‍या भागात याचा ठळक पुरावाच मिळतो.
  • Log in or register to post comments

टाका लवकर टाका वाट बघतोय.....

आत्मशून्य
Wed, 07/13/2011 - 11:35 नवीन
बाकी साह्स देव आहे या पॉपीलोन मधील वाक्याने आयूष्याचा फार मोठा कालखंड झपाटला होता.....
केवळ आपल्यावरील खोट्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने सर्व सुखे नाकारलीत
हे पटत नाही त्याने जसं कश्ट भोगले तसे उपभोग घेतलेच फक्त त्यात तो कधी अड्कून राहीला नाही इतकचं. आणी बँकोचा शेवट बरच काही बोलून जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

प्रकाटाआ

आत्मशून्य
Wed, 07/13/2011 - 12:24 नवीन
यावर स्वतंत्र लेख लिहायचा विचार असल्याने प्रतीसाद काढून टाकला आहे.
  • Log in or register to post comments

'Revenge is the purest emotion' - Mahabharata

मालोजीराव
Wed, 07/13/2011 - 14:44 नवीन
तुमच्या सर्व प्रश्नांचं हेच कदाचित उत्तर असावं ! - मालोजीराव
  • Log in or register to post comments

प्यापीलान

अनुरोध
Wed, 07/13/2011 - 14:49 नवीन
माला वटते ही एक उत्तम आत्मकथा आहे. आनि शेवटी कोन कुठे आनन्दात राहु शकतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण आपले विचार मानडावेत पण दुसर्यालाहि त्याचा स्विकार आसवा असा अट्टहास असु नये (हा पन आमचा विचार...) याचे उत्तर कदचित हेन्ररि 'मेरे मन को भाया मै कुत्ता कात के खाया' असेहि देउ शकेल. ;) बाकी कुनाला दुखावन्याचा हेतु नाहि. पुस्तक एकदम आवडले बुवा आपल्याला.
  • Log in or register to post comments

+१

कपिलमुनी
Mon, 04/21/2014 - 12:52 नवीन
लेख अणि प्रतिसाद आवडले
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Mon, 04/21/2014 - 14:41 नवीन
कुठल्याही लहान मुलाला सुद्धा हे पुस्तक वाचल्यावर हेच प्रश्न पडू शकतात मलाही ते पडले होते... भ्रमणगाथेमधेही काही प्रसंग असेच आहेत, नर्मदे हर मधेही हाच प्रकार आहे सत्यतेबद्दल शंका निर्माण होतात
  • Log in or register to post comments

+१

आदूबाळ
Mon, 04/21/2014 - 21:46 नवीन
+१ नर्मदे हर वाचून बरीच वर्षं झाली, पण असे प्रश्न नक्कीच पडल्याचं आठवतंय. कुंट्यांचा भाचा मित्र आहे. त्याला ते प्रश्न जरा भीतभीतच विचारले. त्याने "हे बघ, मामा भंपक आहे. तू त्याच्याशीच बोल" असं सांगून टाकलं. माझी उत्सुकता तेवढी उत्कट नसल्याने त्या भानगडीत पडलो नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

आदूबाळ, तुम्ही नर्मदा

यशोधरा
Tue, 04/22/2014 - 09:18 नवीन
आदूबाळ, तुम्ही नर्मदा परिक्रमा: एक अंतर्यात्रा हे भारती ठाकुरांचे पुस्तक जरुर वाचा. सुरेख पुस्तक आहे. कदाचित तुमेहे वाचलेही असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

वाचतो. धन्यवाद.

आदूबाळ
Tue, 04/22/2014 - 12:23 नवीन
वाचतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

Spoiler Alert

बोबो
Mon, 04/21/2014 - 20:33 नवीन
चांगली चर्चा आहे. पण ज्यांनी पुस्तक वाचले नाही किंवा चित्रपट पहिला नाही त्यांच्यासाठी Spoiler Alert टाकलेत तर बरं होईल
  • Log in or register to post comments

१) सर्वात प्रथम तो सुटतो

आत्मशून्य
Tue, 04/22/2014 - 02:08 नवीन
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
इट इज लुजर्स अटीट्युड. इट्स नॉट अबॉट लव एंड फ्रिडम. इट्स अबोट रिवेंज आफ्टर ऑल.
२) पुढे त्रिनीनाद मधे सुध्धा तो स्थिर होतो..... पण तो तेथे टिकत नाही.
इट इज अ लुजर्स अटीट्युड. हिस अड्वेंचर इस नॉट अबॉट लव एंड फ्रिडम. इट्स अबोट रिवेंज आफ्टर ऑल, इट्स अबोट पनिशींग दा गिल्टी पिपॉल.
३) तो त्याच्या बापाला / प्रिय बायको ला काहीच निरोप/ पत्र का लिहीत नाही ?
निट आठवत नाही, पण बहुदा सिक्योरीटी हेच रिजन आहे.***
४) तो फ्रान्स ला सेट्ल होण्यासाठी का प्रयत्न का करत नाही?
तो तिथे अधिकृत गुन्हेगार आहे म्हणुन.
५) एवढे करुन त्यास व्हेनेझुएला काही मानवलेले नाही.
मनाची शांती मिळत नाही तोपर्यंत अटलांटीसही मानवत नाही.
६) त्यास त्याच्या आत्मकथेबद्द्ल आणि निघालेल्या चित्रपटाबद्द्ल (Papillon (1973) Directed by - Franklin J. Schaffner) खुप पैसा मिळाला. पण तो पैसा काही त्याचा उद्देश नव्हता.
अतिशय दिशाभुल करणारे स्क्रिप्ट, कचरा दिग्दर्शन अभिनय आणी पुस्तकाची प्रचंड तोड्फोड व इसेंन्स गमावलेला तो एक रद्दड चित्रपट आहे. त्यातुन काहीच पैसा मिळाला नसावा.
७) तो ज्या कारणासाठी वारंवार पळुन जायचा, (वकील, न्यायाधीश, पोलिस यांचा सुड घेण्यासाठी ) ते त्याने खरे केले का?
बिंगो. त्याने काही थापा मारल्या आहेत असेच बरेच लोक म्हणतात. (तरीही साहकथा म्हणुन पॉपीलॉन हे सर्वोत्तम असेच वैयक्तीक मत आहे)
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते.
वाटणे आणी जमणे यात एका दिर्घ प्रवासाचे अंतर असते.(त्यातुन काही शिकता आले तरच)
९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का?
गुड क्वेश्चन.
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्‍या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
उद्देशाने तिव्र झपाटलेल्या व्यक्ती प्रेम न्हवे, सहकार्य करणारे लक्शात घेतात. यांच्या पुस्तकात प्रेम हा सगळ्यात शेवटचा चॅप्टर असतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा