Skip to main content

तमिळनाडूचा मुख्यमंत्री कोण

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 08/05/2026 17:03 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या तामिळनाडूमध्ये नेहमीचे डी एम के आणि ए आय ए डी एम के हे दोन पक्ष आळीपाळीने पूर्वी सत्तेत होते ते आता तमिळ मतदारांनी कडेला बसवले आहेत. त्यांनी अभिनेता असणारा आणि आता राजकारणी बनलेला विजय चंद्रशेखर जोसेफ याच्या तमिळग वेट्री कळगम या पक्षाला तब्बल 108 जागा देऊन सर्वाधिक संख्येचा पक्ष बनवले आहे. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करायचे असेल तर किमान 118 जागा ताब्यात असणे आवश्यक आहे. म्हणजे विजेच्या पक्षाला जर सत्ता स्थापन करायचे असेल विजय जोसेफ ला जर मुख्यमंत्री व्हायचे असेल तर अजून दहा जागांची गरज आहे. डी एम के किंवा ए आय ए डी एम के हे दोघे मिळून जरी एकत्र आले तरी देखील 118 जागा होत नाहीत. काँग्रेस पक्षाने स्वतःच्यास्वतःच्यास्वतःच्या फुटकळ पाच जागा घेऊन विजयला समर्थन दिले आहे. DMK) — 59 जागा (AIADMK/ADMK) — 47 जागा हे दोघे मिळूनही 118 जागा होत नाहीत. भाजपाला केवळ एक जागा मिळाली आहे ती कदाचित निर्णयक ठरेल असे वाटते आहे. कर्नाटकच्या 2018 च्या निवडणुकीमध्ये सत्तेसाठी 112 जागा आवश्यक असताना देखील येडीयुराप्पा यांच्या पक्षाने 104 जागा जिंकलेले असून सुद्धा त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलवण्यात आले होते. परंतु तामिळनाडूमध्ये दहा जागा कमी असून राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी विजयला आमंत्रण दिलेले नाही 118 जागा असल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असे तमिळनाडूचे राज्यपालांनी सांगितले आहे.

राज्यपाल हे भाजपचे असल्यामुळे आणि विजय हा ख्रिश्चन असल्यामुळे त्याला सत्ता स्थापन करू देत नाहीत असे काही जणांचे म्हणणे आहे. विजय हा ख्रिश्चनांच्या एकगठ्ठा मतदानावर निवडून आलेला आहे त्याने प्रचार यात्रेदरम्यान येशू ख्रिस्ताचा फोटो ही नाचवला होता. ख्रिश्चन धर्म प्रसारक संस्थांनी विजयला मिळनाडूमध्ये जिंकण्यासाठी भरपूर पैसा ओतला असेही म्हटले जात आहे. शिवाय पोप वारल्यानंतर त्याने श्रद्धांजली देखील वाहिले आहे. त्यामुळे हा तमिळनाडूमध्ये विजय यापुढे छुपा मिशनरी म्हणून काम करेल असेही बोलले जात आहे. यामुळे देखील कदाचित त्याला सत्ता स्थापन करू देत नसावेत. डी एम के हा पक्ष हा हिंदूद्वेष्टा पक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. विजय हा ख्रिश्चन आहे तरीदेखील दगडापेक्षा वीट मऊ असे विजय बाबतीत म्हणावे लागेल.

 तमिळनाडूमध्ये डीएमके आणि ए आय ए डी एम के या दोन राजकीय पक्षांची सत्ता अलटून पालटून तामिळनाडूमध्ये आतापर्यंत येत होती. लोक याला वैतागले असावेत. आणि म्हणून त्यांनी या अभिनेत्याच्या पक्षाला मतदान दिले असावे. तसाही तमिळनाडू व्यक्ति पूजक म्हणून प्रसिद्ध आहेच. पण यामुळे राजकारणाचा कसलाही अनुभव नसलेला विजय जर मुख्यमंत्री झाला त्यांनी सत्ता स्थापन केली तर तो किती सक्षमपणे राज्य करू शकेल हा प्रश्न आहे. कारण आज तामिळनाडू हे महाराष्ट्र नंतर दुसरा सर्वाधिक जीडीपी असणार राज्य आहे. विजयने ही रँकिंग खाली आणले नाही म्हणजे मिळवले.

  विजयने या आधी भाजप बद्दल काही प्रमाणात गरळ ओकलेली आहे. त्यामुळे तो भाजपसोबत जाईल असे वाटत नाही द्राविडीयन पक्ष म्हणजे डीएमके आणि एटीएम के यांच्याबरोबरही तो जाण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेस बरोबर गेला तरी अजूनही पाच जागा कमी पडत आहेत. मग आता तामिळनाडूच्या राजकारणात काय होईल हे बघणे रंजक ठरेल.


वाचने 252
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

विजय यांच्यामागे बहुमत गोळा होत आहे असे दिसते. त्यांचे स्वत:चे १०८ आमदार आहेत. कॉग्रेसने आधीच पाठिंबा दिला होता (५ आमदार). आता डावे पक्ष (४ आमदार) आणि व्हीसीके (२ आमदार) यांनीही पाठिंबा दिला आहे. आता विजय यांच्याकडे ११९ आमदारांचे समर्थन असून त्यांना बहुमताचे समर्थन आहे. त्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावाही केला आहे. बहुदा आता त्यांनाच राज्यपाल सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतील आणि शपथ देतील.


काँग्रेस पक्षाने स्वतःच्यास्वतःच्यास्वतःच्या फुटकळ पाच जागा घेऊन विजयला समर्थन दिले आहे. भाजपाला केवळ एक जागा मिळाली आहे ती कदाचित निर्णयक ठरेल असे वाटते आहे.

कॉग्रेसच्या पाच जागा फुटकळ आणि भाजपाची एक जागा मात्र निर्णायक...

परंतु तामिळनाडूमध्ये दहा जागा कमी असून राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी विजयला आमंत्रण दिलेले नाही 118 जागा असल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असे तमिळनाडूचे राज्यपालांनी सांगितले आहे.

तुमच्या कर्तव्यानुसार आमंत्रण द्या, नियम सगळ्यांना माहीत आहे तो शिकवू नका,

विजय हा ख्रिश्चनांच्या एकगठ्ठा मतदानावर निवडून आलेला आहे त्याने प्रचार यात्रेदरम्यान येशू ख्रिस्ताचा फोटो ही नाचवला होता.

कशावरून? ह्यापुढे धार्मिक चिन्हे फोटो नाचवले जाणार नाहियेत का कुठलेच? कुठला पक्ष धार्मिक चित्रे आणि घोषणा साठी प्रसिध्द आहे? ख्रिस्ती लोक भारतीय मतदार नाहियेत का? त्या फोटोत गणपती पण आहे. 

शिवाय पोप वारल्यानंतर त्याने श्रद्धांजली देखील वाहिले आहे त्यामुळे हा तमिळनाडूमध्ये विजय यापुढे छुपा मिशनरी म्हणून काम करेल असेही बोलले जात आहे.

पोप वारल्यावर परमपित्यानेदेखील "करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचा दीपस्तंभ" अशी श्रध्दांजली वाहिलेली आहे ती खोटी होती का? राष्ट्रपती स्वत: उपस्थित होत्या व्हैटिकनला म्हणजे हा गुन्हा नसावा. किंवा एव्हाना मिशनरी झाले असावे.

.यामुळे देखील कदाचित त्याला सत्ता स्थापन करू देत नसावेत

वॉव...काय हे राज्यपाल म्हणून कर्तव्यपालन....

डी एम के हा पक्ष हा हिंदूद्वेष्टा पक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. विजय हा ख्रिश्चन आहे तरीदेखील दगडापेक्षा वीट मऊ असे विजय बाबतीत म्हणावे लागेल.

तुम्ही कोणाचे द्वेष्टे म्हणून हा लेख लिहिला आहे?

तसाही तमिळनाडू व्यक्ति पूजक म्हणून प्रसिद्ध आहेच. पण यामुळे राजकारणाचा कसलाही अनुभव नसलेला विजय जर मुख्यमंत्री झाला त्यांनी सत्ता स्थापन केली तर तो किती सक्षमपणे राज्य करू शकेल हा प्रश्न आहे. कारण आज तामिळनाडू हे महाराष्ट्र नंतर दुसरा सर्वाधिक जीडीपी असणार राज्य आहे.

दोन्ही वाक्यातला अंत:विरोध लक्षात येतोय का तुम्हाला स्वत:लाच? 

विजयने या आधी भाजप बद्दल काही प्रमाणात गरळ ओकलेली आहे.

भाजपवर इतरांनी केलेली टीका म्हणजे ओकलेली गरळ आणि भाज्प्यांनी इतरावर केलेली टीका म्हणजे प्रेमाने घेतलेले मुके असतात काय? मग हा लेख म्हणजेच एक ओकलेली गरळ आहे असे का म्हणू नये? 


In reply to by अभ्या..

भाजपला तामिळनाडू मध्ये फारसे स्थान कधीच नव्हते. त्यामुळे त्यांची एक जागा निवडून आली ती सुद्धा निर्णय ठरते आहे काँग्रेस हा बऱ्याच वर्षांपासून तामिळनाडूमध्ये आहे. कधीकाळी तो डीएमके बरोबर सत्तेत सुद्धा होता. 1967 पूर्वी तर तामिळनाडूमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्या तुलनेत आज मिळालेल्या पाच जागा फुटकळच म्हटल्या पाहिजेत.

 

मी हिंदुत्वाचा समर्थक म्हणून डी एम के आणि हा नवीन आलेला विजय यांच्या विरोधात लेख लिहिला आहे असे समजू शकता. गरज ओकली असे म्हणालात तरीही चालेल. :)


The Amma Makkal Munnetra Kazhagam (AMMK) is a regional political party in Tamil Nadu, India, founded by T. T. V. Dhinakaran on March 15, 2018, as a breakaway faction of the AIADMK. The party, headquartered in Chennai, centers its ideology on the legacy of J. Jayalalithaa, focusing on social justice and grassroots development. [1, 2]
Key Details as of May 2026:
  • Leader: T. T. V. Dhinakaran (General Secretary).
  • Status: In January 2026, the party joined the National Democratic Alliance (NDA) to contest the Tamil Nadu Assembly elections.
  • 2026 Election Outcome: The party saw S. Kamaraj win the Mannargudi seat by a narrow margin, according to.
  • Alliance Dynamics: Following the 2026 results, the party's single MLA was approached by the Tamilaga Vettri Kazhagam (TVK) amid a government formation stalemate. [1, 3, 4, 5]
The party is often seen as a significant player in splitting votes within the AIADMK alliance, affecting electoral outcomes in specific regions. The party's principles emphasize equitable resource distribution and the empowerment of marginalized communities.

मोठा पक्ष म्हणून मुमं बनण्याची परवांगी राज्यपालांकडे मागायला पाहिजे होती. तर राज्यपालांना ती पाळावीच लागली असती. 

सुप्रीम कोर्टाचे निर्णय “मोठा पक्ष” किंवा “बहुमताची आघाडी” असाच निर्णय करत आले आहेत.

बहुधा आघाडी या संकल्पनेवर सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे गेले असावेत. 


मला वाटते इथे काँग्रेसने पाठींबा देण्याचा झटपट निर्णय घेऊन बाजी मारली असावी.

 

त्यांच्याच सल्याने आघाडी म्हणून सरकार स्थापनेबाबत अनिश्चितता निर्माण करता आली असावी. भाजप विरोधी आघाडीतील लोकं एकत्र करण्यासाठी त्यामुळे वेळ मिळाला. काँग्रेसने चांगली चाल रचली असंच म्हणायला लागेल.

 

कर्नाटकात पण कुमारस्वामींना मुमं पद देण्यात अशीच तत्परता दाखवून बाजी मारली होती.

 

२०१४ ला फडणवीस सरकारला बाहेरून पाठींबा देऊन शरद पवारांनी चांगली खेळी केली होती.

असो.

 


In reply to by शाम भागवत

भाजप विरोधी आघाडीतील लोकं एकत्र करण्यासाठी त्यामुळे वेळ मिळाला.

 

हे इतर राज्यात चालून जाईल पण तामिळनाडूमध्ये कसे चालेल? भाजपचा एकच आमदार आहे तिथे. मग भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा अजेंडा निदान तामिळनाडूत तरी असू शकणार नाही. भाजप आघाडी म्हणाल तर तामिळनाडूत अशा आघाड्यांना फार अर्थ नसतो. दोघेही कॉग्रेस आणि भाजप द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांबरोबर कधीनाकधी राहिले आहेत. आणि त्या आघाड्यांमध्ये त्या दोन पक्षांना फार किंमत असते असेही नाही.


जोसेफ विजयच होइल मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे नाही का झाले ?

आणि चक्क अडीच वर्षे 

सांभाळली खुर्ची 

करोनाचा कसोटी काळ ही सांभाळला 

(आयला या वरुन आठवलं  कोरोना स्टार राजेश टोपे एकदम कुठं अद्रुष्य झाले ? )

सत्ता म्हटलं की सर्वजण होतात तडजोडीला तयार 

जोसेफ विजयच होइल मुख्यमंत्री