Skip to main content

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी

Published on बुधवार, 15/04/2026

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी
खळबळणारे मृगजळ घ्यावे
चकोरचंचू मधून मधुरसे
चंद्रामृत चाखत रिचवावे

छायाग्रह राहू केतूच्या
कुंडलीत पापग्रह व्हावे
मिथक कथांच्या दग्धभूमीचे
औटघटीचे राज्य मिळावे

निळ्याशारशा मान सरोवरी
राजहंस होऊन विहरावे
नीर-क्षीर विवेका विसरून
हंस-गान शेवटचे गावे


याद्या 89
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया