कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी
खळबळणारे मृगजळ घ्यावे
चकोरचंचू मधून मधुरसे
चंद्रामृत चाखत रिचवावे
छायाग्रह राहू केतूच्या
कुंडलीत पापग्रह व्हावे
मिथक कथांच्या दग्धभूमीचे
औटघटीचे राज्य मिळावे
निळ्याशारशा मान सरोवरी
राजहंस होऊन विहरावे
नीर-क्षीर विवेका विसरून
हंस-गान शेवटचे गावे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
160
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह वा
क्या बात है! खूप आवडली अगदी गझल आहे ही...
दिक्-कालाच्या पलीकडे मग एक …
दिक्-कालाच्या पलीकडे मग
एक 'स्व' चे बेट असावे
जिथे न उरले द्वैत कसले
तिथेच आपण हरवून जावे
सुंदर कविता
आवडली. अजून लिहा.