Skip to main content

भूलभुलय्या

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 15/04/2026 21:47 या दिवशी प्रकाशित केले.

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी
खळबळणारे मृगजळ घ्यावे
चकोरचंचू मधून मधुरसे
चंद्रामृत चाखत रिचवावे

छायाग्रह राहू केतूच्या
कुंडलीत पापग्रह व्हावे
मिथक कथांच्या दग्धभूमीचे
औटघटीचे राज्य मिळावे

निळ्याशारशा मान सरोवरी
राजहंस होऊन विहरावे
नीर-क्षीर विवेका विसरून
हंस-गान शेवटचे गावे

क्रीप्टोकरन्सी - भूलभुलय्या

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 17/01/2019 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
काल सहजच बिटकॉईनची किम्मत पाहिली. 1 Bitcoin equals 2,56,380.08 Indian Rupee २००८-१० मधे जेंव्हा बिटकॉईन ही संकल्पना बाल्यावस्थेत होती त्या वेळेस मार्च २०१० मधे ५० यूएस डी मधे १०००० बिटकॉईन उपलब्ध होत. मात्र कोणी खरेदीदार उपलब्ध होत नव्हता. मे २०१० मधे एक व्यवहार केला गेला त्यात एका बिटकॉईन ची किम्मत .००३ डॉलर इतकी आली. बिटकॉईन मधे व्यवहार सुरू झाले.