खरडफळा (क्रमांक २) वेलकम बॅक.
मिसळपाव बराच मोठा काळ विश्रांती अवस्थेत राहून पुन्हा एकदा नव्या रूपात उभं आहे.
सर्वांना पुन्हा एकदा एकत्र येऊन आता लेखन वाचन आणि मुख्य म्हणजे गप्पा टप्पा करता येतील.
आशाताई आपल्याला सोडून गेल्या. त्यांची गाणी आपल्याला कधीच सोडणार नाहीत. आणि त्यांचा सदैव हसरा चेहरा हीच त्यांची आठवण म्हणून नेहमीच लक्षात राहील.
युद्धात देखील दर दिवसागणिक खूप घडामोडी घडत होत्या.
त्या काळात सर्वांनीच मिपाला मिस केलं असेल.
तर या गप्पांच्या खरडफळा क्रमांक २ वर सर्वांचं स्वागत आहे.
मिपा समोरून पाहताना फक्त विश्रांती अवस्थेत दिसत होतं पण मागे सतत खूप मोठ्या घडामोडी आणि तांत्रिक आव्हानं येत होती.
नीलकांतच्या दिवसरात्र अथक परिश्रमाचं कौतुक आणि कृतज्ञता..
वाचने
198
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
नमस्कार
ही चाचणी आहे.
प्रतिसाद संपादन
प्रतिसाद देता येतोय. उत्तम.
प्रतिसाद देता येतोय. उत्तम.
निलकांत आणी चमूचे अभिनंदन.
सुवेळ सुदिन मिपाईने गोंधळ मांडिला वो ।
ज्ञान साहित्य,रजंनाचा फुलवरा बांधिला वो ।
चंद्र सूर्य जववरी याचा पोत पाजळू दे वो ।
घालुनी गोंधळ माय म्हराटिच वैभव वाढू दे वो ॥ १ ॥
उदो बोला उदो उदो मिपा माउलीचा वो ॥ध्रु०॥
चान, चान .... चान !
सकाळी प्रतिसाद देता येत…
धन्यवाद निलकांत ; खूप कष्ट…